निनावं 

Submitted by रिना वाढई on 3 February, 2021 - 01:57

निसटता पतंगाची दोर ,का सुटेना हाताशी

चुकले माझेच कि , चूक ही नशिबाची ....

होता क्षितिजाची पहाट , सोडले मी तुझे ध्यास

तरी शब्दवेडे पुन्हा ,का तुलाच गुंफतात ....

कळे ना झाले आज , का छळतात आभास तुझे

होता गडद आकाशी,जळतात श्वास माझे ,जळतात श्वास माझे....

ओसरत्या पावसांच्या सरी ,भिजले मी एकटीच

नव्हतास तू कधीच ,नसणार तू कधीच .....

गारवा या मनातला , ना कळणार कधी तुला

अबोलके तुझे नयन , का स्पर्शतात या देहाला ....

असह्य झाले आता , नको ना आता दुरावा

थांबून जातील स्पंदने ,विरून जातील आठवणी, विरून जातील आठवणी....

सोडू पाहते नात्यांची पतंग , तरी लोभ का जीवाशी

जोडीले हे कसले बंध ,तुझे माझ्या हृदयाशी....

शोधिले मी माझेच , उमगले आज मला

पुरेल तुझ्या आठवणी ,आयुष्य हे जगायला....

घे जगून तुझे तू , झाले मी वाट परकी

तुझ्या त्या अनमोल आठवणींची ....

बांधून गाठ काळजाशी , चालले मी एकटी , चालले मी एकटी....

Group content visibility: 
Public - accessible to all site users