netflix आणि prime वर असणारे वेगळे चित्रपट

Submitted by झम्पू दामले on 31 January, 2021 - 11:21

इथे वेबसिरीजवर वेगळा धागा आहेच. पण Netflix, prime आणि इतर OTT प्लॅटफॉर्मवर काही फार सुंदर चित्रपट आहेत. काही चित्रपटांची नावे आधी कधीही ऐकली नाहीत पण पाहिल्यानंतर मनोरंजन पुरेपूर होते. मला वैयक्तिक हॉरर आणि थ्रिलर हा genre आवडतो. त्यात तो चित्रपट शहरात न घडता एखाद्या गावात, जंगलात किंवा निर्मनुष्य रस्त्यावर घडला असेल तर खूपच छान. त्या genre चे काही चित्रपट खाली देत आहे. तुम्हाला पण आवडलेले काही हटके चित्रपट आवडल्यास सांगावेत.
1. Calibre ( Netflix)
दोन अमेरिकन मित्र शिकारीसाठी स्कॉटलांडला मधल्या एका दुर्गम गावात येतात. गावातले लोक फार welcoming नसतात. त्यांच्या कडून तिथे एक अपघात होतो आणि मग अपघात लपवण्याच्या प्रयत्नात ते अजून अडकत जातात.
स्कॉटलंड मधलं वातावरण, गावातल्या लोकांचा थंडपणा, दोघांची अपराधीपणाची भावना हे फार सुरेख पध्दतीने रंगवले आहे. जरूर पहावा.
2. Hush
एक मूकबधिर मुलगी लेखणासाठी घरात एकटीच रहात असते. एक मास्क घातलेला मरेकऱ्याला घरात प्रवेश हवा असतो. तिचा मारेकऱ्यां पासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न फार छान दाखवला आहे. चित्रपट दीड तास प्रेक्षकाना गुंतवून ठेवतो.
3. The Ritual
चार मित्र एका दुर्गम ठिकाणी हायकिंग साठी जातात. शॉर्टकट घेतल्यावर एका जंगलात रस्ता चुकतात. त्या जंगलात एक "काहीतरी" त्यांचीच वाट पाहत असते. चार जणांची अगतिकता, हाताशपणा, भीती फार छान दाखवली आहे.
अशाच थीम वर The Ruins चित्रपट पण छान आहे
4. Dead Birds ( Prime Video)
हा चित्रपट जुना आहे. दरोडेखोरांची टोळी एक बँक लुटून घोड्यांवर सुरक्षित ठिकाणी पोचण्यासाठी प्रवास करत असते. एका जुनाट घरात रात्रीच्या असरायासाठी थांबतात. आणि मग रात्रीतून वेगळाच खेळ सुरू होतो. चित्रपट छान आहे.

अमेरिकन चित्रपटानं मध्ये बऱ्याच वेळेला एक तरुण मुलामुलींचा ग्रुप कुठेतरी प्रवासाला निघतात. एका पेट्रोल पंपावर थांबतात. तिथे कोणीतरी तिर्हाईक व्यक्ती त्यांना पुढे जाऊ नका असे काहीतरी सांगते. पण तो गट ते ऐकत नाही आणि मग त्यांना भेटते भूत/ चोर/ दरोडेखोर/विक्षिप्त खुनी किंवा कोणतातरी प्राणी. अशा स्टोरीलाईन वर असलेले चित्रपट पण मला आवडतात - House of Wax, Texas chainsaw massacre, Hills have Eyes, The wrong turn, Jeepers Creepers, The Pack, The Cabin in woods, The Hostel इत्यादी.
तुमच्या आवडीचे चित्रपट पण सांगा.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हेरेडिटरी हा खूप आवडता भयपट. दुःखी आणि भीतिदायक दोन्ही आहे. हा प्रसिद्ध असला, तरी नक्की वेगळ्या धाटणीचा आहे.

काही काही चित्रपट प्रचंड किळसवाणे आहेत ( Hills have Eyes, Hostel) . पाहताच जाणवते की बनवणारा थोडा विक्षिप्त असणार. अमेरिकन लोकांना विद्रुपीकरण, विक्षिप्तपणा, मानवी शरीराची चिरफाड, रक्त याचे एवढे का आकर्षण असेल?
त्या मनाने ब्रिटिश चित्रपट बरेच सुसह्य असतात.

झम्पू दामले >> वेगळे , हटके वरून समजत नाही. कोणत्या जॉनरमधले चित्रपट किंवा अजून काही क्ल्यू असेल तर कल्पना येईल.

द प्लॅटफॉर्म .
एक तुरुंग असतो, ज्यात अनेक मजले असतात. हे सगळे मजले एकावर एक असतात, आणि प्रत्येक मजल्यावर दोन कैदी असतात. खोलीच्या मधोमध लिफ्ट साठीचा मोठ्ठा शाफ्ट असतो.

ह्या शाफ्टमधून एक टेबल वरून खाली फिरत असते. सर्वात पहिल्या मजल्यावर तुरुंग व्यवस्थापक हा टेबल अन्न, फळफळावळ, केक्स, दारू ईई. गोष्टींनी खचाखच भरत असतात, आणि खाली पाठवत असतात. मग, दुसऱ्या मजल्यावरील कैदी यातून खातील, काही वेळाने हा टेबल तिसऱ्या मजल्यावर जाईल, अँड सो ऑन.

एका महिन्यानंतर सर्व कैदी रँडमली वेगळ्या मजल्यांवर पाठवले जात असतात. एका महिन्यात तुम्ही ८व्या मजल्यावर असू शकता तर त्यापुढे २१५व्या. (नक्की किती मजले आहेत कैद्यांना माहित नसते !)

अर्थातच, काही मजल्यांनंतर अन्नाचा कण सुद्धा शिल्लक राहत नसतो.
रोचक, पण काही ठिकाणी अत्यंत बीभत्स आणि किळसवाणा सिनेमा.
स्पॅनिश सिनेमा आहे.
OTT - नेटफ्लिक्स

द प्लॅटफॉर्म > त्याचा शेवट गण्डला आहे किंवा मला कळाला नसेल पण सिनेमा भारी आहे.
'बर्निंग' हा कोरियन सिनेमा सुचवेल. तो हारुकी मुराकामी यांच्या कथेवर आधारलेला आहे. मुराकामी माझ्याप्रमाणे असंख्य लोकांच्या ऑल टाइम फेव्हरेट लिस्ट मधला लेखक आहे पण इथे त्यांच्या लिखाणाबद्दल कोणी लिहिलेलं नाही सापडलं काही.

Trollhunter हा norse myhtology वर आधारित असलेला सिनेमा पहिला. तर हे troll जंगलात राहणारे , माणसापासून दूर राहणारी जमात (राक्षसासारखी) मध्ये अधे प्राण्यावर हल्ला करत असते आणि त्यावर नियंत्रण करणारी एक गुप्त सरकारी संस्था असते. पुर्ण सिनेमा हा एखाद्या डोकमेंटरी सारखा घेतला आहे आणि ही ऐकीव गोष्ट खरी आहे किंवा तशी भासवले जाते.. सिनेमाची निर्मिती वेगळ्या धाटणीची आज , vfx सुद्धा खरे एकदम चपखल तेने वापरले आहेत. एकदा पाहू शकता .

नेटफलिक्स वर लव्ह इन पफ नावाचा सिनेमा आहे. छान सुंदर रोमॅण्टिक सिनेमा .. नक्कीच चांगला वेळ जाईल.

The playbook पाच नामांकित प्रशिक्षक आणि त्यांची टीम ला हाताळण्याची पद्धत . ही डोकमेंटरी सुद्धा एकदा पाहण्यासारखी आहे.

चांगला धागा. प्रत्येक मूव्ही समोर त्याचा (genre) लिहीला तर बरं पडेल. हॉरर vs. थ्रिलर etc.

घाबरवणारे चित्रपट ही करमणूक पण आवडते. फक्त घरात कुणी ना कुणी असायला पाहीजे. पण बरेचसे हॉरर शोज किंवा चित्रपट हे ओंगळवाणे , किळसवाणे असतात. त्यातली दृश्ये शिसारी आणतात. रक्त लागलेले चेहरे, त्या घाणेरड्या जखला भय नाही शिसारी आणतात. रक्त बिक्त पाहून यक्क होतं.
क्युट भूतं दाखवायला काय जातं ?

बरेचसे हॉरर शोज किंवा चित्रपट हे ओंगळवाणे , किळसवाणे असतात. त्यातली दृश्ये शिसारी आणतात. रक्त लागलेले चेहरे, त्या घाणेरड्या जखला भय नाही शिसारी आणतात. रक्त बिक्त पाहून यक्क होतं.>>>++++१११११११

क्युट आणि विनोदी भुतं

१. मारियोमधले ‛बू'ज् - https://youtu.be/RQ_zveEj6aU
२. घाबरवण्याचे काम झाल्यावर भुतं गायब न होता तिथंच थांबली तर काय होईल ? - https://youtu.be/ieHtqG4LsJY

And soon the Darkness ( Amazon Prime) :
दोन अमेरिकन मैत्रिणी सायकल वर अर्जेंटिना फिरण्यास येतात. त्यातली एक मैत्रीण एका ठिकाणा वरून अचानक गायब होते आणि मग सुरू होतो तिचा शोध. स्थानिक लोकांचं विचित्र वागणं, पोलिसांक्सही थंड प्रतिक्रिया या मुळे शोधणाऱ्या मैत्रिणीचं फस्ट्रेशन वाढत जातं. एक स्थानिक तरुण मदत करायचा प्रयत्न करतो. पुढे काय होतं? ती सापडते का? स्थानिक तरुण का मदत करत असतो? तरुणीला गायब करण्यामागे कोण असतं? या प्रश्नांची उत्तरे पाहिजे असतील तर चित्रपट अवश्य बघावा Lol

Duel, Breakdown आणि Wrecker तीनही चित्रपटांचा प्लॉट साधारण सारखाच आहे. प्रवासावर निघालेला नायक / नायिका , एकांत रस्त्यावर एका ट्रक ड्रायव्हर सोबत झालेला पंगा ( Road Rage), ट्रकचा त्यांना मारण्याचा आणि नायक/ नायिकेचा त्यातून वाचण्याचा प्रयत्न. जबरदस्त स्क्रीनप्ले हा तीनही चित्रपटांचा USP आहे. यातला Duel हा बराच जुना आणि Steven Spielberg चा दिग्दर्शक म्हणून बहुदा पहिला चित्रपट आहे.

Seven years in Tibet नावाचा सिनेमा नेटफ्लिक्स वर पाहिला. हा काही नवीन नाहीये, पण मी ह्याबद्दल कधी ऐकलं नव्हतं. मला खूपच आवडला. ज्या काळात तिबेट पूर्ण जगापासून अलिप्त आणि अस्पर्श होता, तिथून तो चीनच्या घशात गेला, त्या काळात तिथे येऊन राहिलेल्या एका ऑस्ट्रियन व्यक्तीच्या दृष्टिकोनातून ही कथा आहे. फारच सुंदर दाखवली आहे. चित्रीकरण खरंच दलाई लामांच्या आश्रमात, ल्हासात वगैरे झालंय की काय अशी शंका येते.

>>>नेटफलिक्स वर लव्ह इन पफ नावाचा सिनेमा आहे.>>> रंगीला.... भारता त आहे का?>>
हो नक्की पाहा भारतातील नेटफ्लिक्स वर आहे .

Another राऊंड पहिला , ऑस्कर ला निवडलेला सिनेमा आहे . चार शिक्षकांची कथा आहे . त्याचा हिरो mads mikkelsen आहे.
तो असला की अभिनयात काही शंकाच घ्यायची नाही. छान आहे . फिल्मamazon वर आहे

सेव्हन इयर्स फार मस्त चित्रपट आहे
इतका प्रचंड काळ घेतलाय चित्रपटात तरिही कुठेही कंटाळवाणा होत नाही
आणि हरर चे स्थितांयर तर फार सुंदर घेतले आहे
आणि दलाई लामांचे काम करणारा मुलगाही

Take Care Good Night(Prime)
एकदा बघायला हरकत नाही..

Horns ( Prime)
डॅनियल रेडक्लीफच्या जबरदस्त अभिनयाने नटलेला एक सुंदर चित्रपाट. हॅरी पॉटर पासून सगळ्या चित्रपटांमधून डॅनियल सतत त्रासलेला आणि दुनियेच्या करस्थानांना वैतागलेल्या भूमिका करत आला आहे. ह्या ही चित्रपटात तो असाच आहे. मैत्रेणीच्या मृत्यूला तो जबाबदार आहे असे सगळे मानत असतात. त्याच्या वर झालेले आरोप खोडून काढण्यासाठीच्या प्रयत्नात तो असतो. ह्या मध्ये अचानक त्याच्या डोक्यावर शिंगे ( Horns) उगवायला लागतात. त्या शिंगांचा काय significance असतो, ते चांगले असतात का वाईट हे समजण्या साठी चित्रपट पहावा. धड हॉरर थ्रिलर ही नाही आणि धड कॉमेडी ही नाही असा काही तरी मधलाच जोनेर आहे.

Pages