मिजास - अलक

Submitted by बिपिनसांगळे on 30 January, 2021 - 10:56

मिजास - अलक

-------------
परश्या डोकं धरून , झाडू बाजूला ठेवून कचऱ्याच्या घाण वास मारणाऱ्या ढिगाजवळ बसला होता . कचऱ्याचे ढीग उपसून उपसून त्याला त्याचं स्वतःचं
आयुष्यच कचरा झाल्यासारखं वाटत होतं . रस्त्याने जाणाऱ्या , चांगले कपडे घालून मिरवणाऱ्या जनतेकडे पाहून , आपण असे फिरू शकत नाही याचं
त्याला नैराश्य आलं होतं .
कचरेवाल्या राधाबाईने जवळ येऊन त्या तरुण पोराच्या पाठीवरून मायेने हात फिरवला व ती म्हणाली , " चांगली कापडं घालनाऱ्या मान्सांपेक्षा आपण
भारी हावोत . आपण हावोत म्हून तर त्यांची मिजास चालतीया ! "

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

यंत्रांचा उपयोग व्हावा. समाजासाठी कोणालाच असा कचरा उपसावा लागू नये Sad हा टेक्नॉलॉजीचा पराभव आहे. यात ग्लोरीफाय करण्यासारखे काही नाही.

सांगळेजी तुम्ही ग्लोरीफाय करताय असे म्हणायचे नाही.