स्वातंत्र्य

Submitted by चंदन सोनाये on 28 January, 2021 - 09:23

किती भाग्यवान ही आई, जन्मले लाखो वीर,
गांधी, टिळक, भगतसिंग, सुभाषचंद्र अन सावरकर...

मातेचे पांग फेडले, कोणी आयुष्य अर्पुनी,
चरण धुतले कोणी, अपुल्या पवित्र लहुनी..

ध्येय होते स्वातंत्र्याचे, मातेच्या मुक्ततेचे,
नव्हते विचार स्व सुखाचे, होते विचार भारत भू चे...

नव्हती भीती कशाची, कारावास वा फाशीची,
तळमळ होती एकची, मातेस मुक्त करण्याची...

रक्ताच्या थेंबाथेंबात, फुटले स्वातंत्र्याचे धुमारे,
घोंगावत होते देशात, देशभक्तीचे वारे..

स्वातंत्र्य समरात या, बलिदान अपुले देऊनी,
धगधगत ठेविला स्वातंत्र्याग्नी, धन्य ते वीर सेनानी...

© चंदन सोनाये
२६ जानेवारी, २०२१

Group content visibility: 
Use group defaults