अज्ञातवासी - भाग २३! - रहस्यभेद!

Submitted by अज्ञातवासी on 23 January, 2021 - 12:09

भाग २२ - https://www.maayboli.com/node/77776

"शेखावत. कमाल केलीस."
"दादासाहेब, कमाल महादेवाची. आपण फक्त काम केलं."
"खानसाहेब... तुमची उझी आता भारतात बनणार."
खानसाहेब हसले.
"दादासाहेब, माझी जान या इस्त्रायली मैनेत आहे."
"बघितलं शेखावत. विश्वास नाही खानसाहेबांचा तुमच्या कारागिरीवर."
"तुमचा आहे ना दादासाहेब, मग मला पर्वा नाही. पण, अजूनपर्यंततरी कुणी देशी उझी बनवल्याचं मला ऐकण्यात नाही."
"नाहीच बनवली कुणी. शेखावत, तू सुपरस्टार आहेस आता."
"सुपरस्टार एकच दादासाहेब, राजेश खन्ना."
"मिथुन..." इतक्या वेळ गप्प असलेल्या डिसुझाने तोंड उघडल.
"डिसुझा, मला वाटलं तू केव्हाचा गेलास." दादासाहेब त्याच्याकडे वळून बघत म्हणाले.
"नाही दादासाहेब, शेखावतची जादू बघत होतो."
दादासाहेब हसले.
"बरं, दादासाहेब, RSU सिरीजने नाव द्यायचं ना? राजशेखर शेलार - उझी?"
दादासाहेब विचारात पडले.
"MRS दे."
"काय?"
"MRS. पुढे U नको. फक्त MRS..."
"दादासाहेब MRS कोण?" डिसुझाने तोंड उघडलं.
"नाही कळणार तुला." दादासाहेब हसले...
शेखावतही गालात हसला...
◆◆◆◆
"MRS, खानसाहेब, मोक्ष राजशेखर शेलार... आपल्याच फॅक्टरीतल्या बंदुका आहेत या."
"मोक्षसाहेब,..." खान आश्चर्यचकित झाला. "पण उझी खूप कमी बनतात, आणि प्रत्येक डीलरला एक कोटा असतो. MRS 76 तर खूप जुनी असेल."
"कोटा कोण अलोट करतं खानसाहेब?"
"स्वतः शेखावत."
मोक्ष विचारात गढला.
"डीलरची सगळी माहिती आहे खानसाहेब तुम्हाला?"
"पूर्ण भारतात ३२४ आहेत. जास्तीत जास्त यूपीमध्ये आहेत."
"आपल्याला काढता येईल का, की MRS 76 कुणाला अलोट झाली होती?"
"मला माहितीये ना." खानसाहेब म्हणाले.
"कुणाला???" मोक्षने विचारले.
"राजशेखर शेलारांना..."
मोक्ष सुन्नच झाला.
"खानसाहेब, फॅक्टरीत चक्कर टाकावी लागेल तुम्हाला..." तो थोड्यावेळाने म्हणाला.
खानसाहेबांनी मान डोलावली.
◆◆◆◆◆
"इम्तियाज!!!!"
"अरे खानसाहब आप, आइये ना..."
इम्तियाज खुर्चीवरून उठून उभा राहिला.
"शेखावत दिसत नाही आज." खानसाहेबांनी विचारले.
"मालिक आहेत. दररोज नाही आलं तरी चालतं त्यांना." इम्तियाज हसला.
"बरं इम्तियाज, या उझीचा ट्रिगर जरा जॅम वाटतोय. बघ ना तू एकदा."
इम्तियाजने उझी हातात घेतली.
"असली चीझ है खानसाब. लोडेड नही है पर."
"तुझ्याकडे येताना काय लोडेड घेऊन येऊ? जाताना लोडेड घेऊन जाईन. खानसाहेब हसले."
"जरुर! पण मग तुम्ही चालवलेल्या प्रत्येक गोळीचा हिसाब शेखावतसा घेतील."
"शेखावत असामीच वेगळी आहे रे. उझी बनवून दाखवली त्याने. मलाही आता वाटतं, की उझी नवीनच घ्यावी."
"अहो, आपल्या उझी आता इस्त्राईलपेक्षा चांगल्या बनतात. नवीन MRS 2000 सिरीज तर बेस्ट आहे." इम्तियाज उत्साहाने माहिती पुरवू लागला.
"नाही रे, आपली MRS 1 सिरीज भारी होती सगळ्यात, 100 पर्यंत. पण काय करणार, मला एकही मिळाली नाही. सगळ्यांच्या आधीच वाटण्या." खानसाहेब खोट्या हताशेने म्हणाले.
"हो ना, मलाही पाहिजे होती." इम्तियाज म्हणाला.
"मला तर आता वाटण्याही लक्षात राहिल्या नाही इम्तियाज."
"पहिल्या वीस दादासाहेब, दुसऱ्या वीस शेखावत, नंतर दहा जाधव, पुढच्या वीस पांडे, आणि नंतर पुन्हा दहा शेखावत..."
"नाही, नंतर दहा दादासाहेब ना?"
"नाही," इम्तियाज म्हणाला. "दादासाहेबांनी त्या शेखावतला परत दिल्या होत्या. पहिल्या वीसही सगळ्या भेटवस्तू गेल्या, शेखावतसानी मात्र सगळ्या स्टोरमध्ये जपून ठेवल्यात."
"बरं. असं झालं होय." खानसाहेब उद्गारले.
मात्र त्यांच्या मनातील आनंद लपत नव्हता.
◆◆◆◆◆
खानसाहेबांच्या हवेलीजवळ एका मोठ्या गोडाऊनमध्ये मंद प्रकाश पसरला होता.
"जयशंकर..."
"खानसाहेब, मला काहीच माहिती नाही."
"बरं, ती इलेक्ट्रॉनिक करवत आणा रे," खानसाहेबांनी आवाज दिला.
"खानसाहेब नाही. खरंच नाही माहिती मला."
"स्टोरकिपर तू आहे जयशंकर आणि जयशंकरच्या मर्जीविना मुंगीही स्टोरमधून आत येऊ शकत नाही. मग बंदुका बाहेर कशा गेल्या?"
"खानसाहेब, मला खरच माहिती नाही..."
"आणली करवत? बरं, लक्षपूर्वक, गुढग्याच्या वाटीच्या मधोमध कापा. ओके..."
"नाही खानसाहेब, नाही...."
करवत चालू झाली.
"खानसाहेब सांगतो. सोडा. सोडा मला... सांगतो."
करवत बंद झाली.
"खानसाहेब, त्या बंदुका दादासाहेबांच्या नावावर होत्या, पण?"
"पण काय?"
"या बंदुका कित्येक वर्षे स्टोअरमध्येच होत्या. मी त्यातल्या दोन बंदुका एका माणसाकडे दिल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, माझ्या हयातीत पहिल्यांदा कुणी माणूस फॅक्टरीत येऊन उझी घेऊन गेला."
"कुणाच्या सांगण्यावरून तू इतक्या जुन्या बंदुका दिल्या हरामखोर???" खानसाहेबांचा पारा चढला...
"शेखावतसा..." तो जोरात ओरडला...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त!!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत........

आधी काही भाग रोज आले... नंतर काही दिवसांनी आले... नंतर तुम्ही सांगितले की, दर शनिवारी भाग येतील... मागील दोन भाग१५ दिवसाच्या अंतराने आले... पुढे... Uhoh

हो ना..खूप दिवस गॅप झाला की लिंक तुटून जातेय. 4 5 दिवसाच्या फरकाने भाग आले की वाचायला पण भारी वाटतं

अज्ञात, इतका उशीर नका करू की सगळे 23 भाग विस्मरणात जातील.. आणि पुन्हा सगळे वाचावे लागेल, link लागायला..

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद...
खूप वेळ होतोय, हे खरं आहे. मेबी माझ्या लाईफ मध्ये सध्या जास्तच उलथापालथ होतेय Lol
Need some time... Will be back soon...
Thanks you all for your love and patience... Have a nice day ahead....

Best regards,
Adnyatwasi