पेनफुल की पेनलेस लस चांगली

Submitted by VB on 22 January, 2021 - 11:28

सध्या पेनफुल अन पेनलेस अश्या दोन्ही लसी बाळांसाठी उपलब्ध आहेत. गुगलून बघितले मित्रमंडलात विचारले तरी निर्णय होत नाही आहे की बाळासाठी कोणती लस चांगली.
घरचे सगळे पारंपरिक लसीकरण योग्य म्हणतात पण त्यात बाळाला त्रास खूप होतो, सूज येते, ताप येतो ते बघवणार नाही.
तरी यावर इकडे काही चर्चा झाली असेल तर लिंक द्या तसेच आपले अनुभव देखील लिहा

अजून एक म्हणजे बाळाला दीड महिन्याची लस दिल्यावर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गावी न्यायचे आहे तो पंधरा तासांचा प्रवास त्याला झेपेल का? डॉक बोलले की त्रास नसेल तर हरकत नाही.

तर विचारायचे होते की इथे कुणाला असा अनुभव आहे का इतक्या लहान बाळाला घेऊन लस दिल्यावर प्रवास केल्याचा, असेल तर प्लिज सांगा

धन्यवाद

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

4 वर्षाच्या मुलीचा बाप म्हणून मी सल्ला देतो आहे, जे टेस्टड आहे तेच मुलासाठी वापरा, थोडा त्रास होतो, पण त्यातून देखील ती मुले खूप काही शिकतात, त्रास हा काही तासाचा असतो पारंपारिक लसी मध्ये, नवीन लसचा जो प्रकार तुम्ही सांगत आहात तो मी प्रथमच ऐकत आहे.

डॉक्टरचे मत महत्वाचे, त्यांचा सल्ला आवश्य घ्या.

आमच्या डॉक्टरांनी तरी असं सांगितलं होतं की परिणामकारकतेच्या दृष्टीने दोन्ही लसींमध्ये काही कमीजास्त नाही. दुखतं म्हणून परिणाम चांगला होतो असंही नाही आणि
पेनलेस महाग असते म्हणजे जास्त चांगली असंही नाही.

मी माझ्या मुलीला आत्तापर्यंत सर्व पेनलेस दिल्या आहेत. बऱ्यापैकी महाग आहेत तुलना केली तर. पेनलेसला पण रडतात हो मुलं अगदी हुंदके देऊन. मलाच नको वाटायचं जेंव्हा लस असायची तेंव्हा. बरेच मित्र आहेत ज्यांनी हा पर्याय न निवडता साध्याच दिल्या.

शब्दरसिक धन्यवाद

वावे, मी ही हेच वाचलंय, डॉक्टर म्हणतात तुम्ही ठरवा.
लस महाग असली तरी बाळाला कमी त्रास होणार असेल तर हरकत नाही पण गुणवत्तेत कमी नसावी ही अपेक्षा आहे.
अजून एका ठिकाणी वाचले की पेनलेसम च्या कोणत्यातरी एका इंजेक्शन मध्ये कावीळ ची मात्रा नसते म्हणजे पेनफुल मध्ये जिथे चार घटक असतात तिथे पेनलेसमध्ये फक्त तीन.

आम्हाला डॉ नी एकदा पेनलेस एकदा पेनफुल दिली.त्यांचं म्हणणं असं की पेनलेस करताना त्याचा परिणामांचा टिकाऊपणा कालावधी थोडा कमी होतो.
दोन्हीचे आपापले फायदे.पेनफुल स्वस्त आहे, पण 2 दिवस सौम्य ताप येतो.पेनलेस ने अगदी कमी किंवा शून्य ताप येतो पण किंमत जास्त आणि परिणाम कालावधी मध्ये किंचित फरक(आकडे देत नाहीये कारण आता आठवत नाहीयेय आणि गुगल करायची एनर्जी नाही.)
जी कोणती निवडाल ती डॉ च्या सल्ल्यानुसार द्या आणि नंतर लक्ष ठेवा/ताप आल्यास वेळ आणि काळजी घ्या.
(बाकी बाळाचे पहिले आजार/कानदुखी/दात येणे/ताप हे थोडं वाईट वाटलं तरी आपल्याला सवय होते.अगदी नंतर बेरड पणे औषधे घरात असणाऱ्या मंडळींकडे सोपवून ऑफिसात महत्वाची मीटिंग/कोणाची तरी व्हिजिट अटेंड करणे हेही प्रसंगी केले जाते.)

Painless

सरळ सरकारी दवाखान्यात द्या, तिथे पेन लेस मिळत नाही. पण औषधे फ्रेश असतात, नीट ठेवलेली असतात, फुकट असतात.आणि माझ्यासाठी महत्वाचे म्हणजे सरकारने जरुरीचे केलेल्याशिवाय चे कोणतेही जास्तीचे डोस द्यावे लागत नाहीत. पेन लेस दिल्यावरही सगळ्या मुलांना त्रास होतच नाही असे नाही, आणि पेनफुल अतित्रासदायक आहे असेही नाहीच.

पेन लेस लसीबद्दल कधी ऐकले नाहीये
<<<त्यात बाळाला त्रास खूप होतो, सूज येते, ताप येतो ते बघवणार नाही.>>> हे मात्र तितकंसं खरं नाही.
सगळ्याच मुलांना त्रास होतो असं नाहीये, काही मुलांना अजिबात होत नाही , काहींना थोडा होतो..
अवांतर-
सर्दी , ताप , कफ हे मधेमधे सुरू असतेच बाळांचे किमान 3वर्षापर्यंत मग हळू हळू कमी होत जाते. ( बघवणार नाही म्हटलं आहे म्हणून हे लिहितेय की मुलं आजारी पडतातच, पडू द्यावी थोडीफार)

आमच्यावेळी डॉक्टर स्वत:च सांगायचा की अमुकतमुक पेनलेस घ्या किंवा पेनफुल घ्या. थोडक्यात पेनलेसवर खर्च करणे जिथे जरूरी आहे तिथेच करायला लावायचा.
डॉक्टर विश्वासू होता. आमची मुले एकत्र शाळेत शिकणारी. त्यामुळे तो सांगेल तेच करायचो.

माझी पहिली मुलगी होण्याआधी, होताना आणि झाल्यावरही मला प्रचंड त्रास झाला होता त्यामुळे तीच्याबाबतीत आम्ही दोघेही नवरा बायको खूपच हळवे होतो. जेव्हा तिला पहिल्यांदा इंजेक्शन दिले तेव्हा तिला खूप त्रास झाला ( खरे म्हणजे आम्ही जास्तच इमोशनल होतो म्हणून आम्हाला असे वाटले की तिला जास्त त्रास झाला पण ती रात्री झोपेपर्यंत च रडत होती नंतर ती ok झाली) पण त्यानंतरचे सगळे इंजेक्शन (ज्याने ताप येतो ते) मात्र आम्ही तिला पेनलेस च दिले. आम्हाला डॉक्टर ने दोन्ही सारखेच असतात असेच सांगितले होते. ही झाली अकरावर्षापूर्वीची गोष्ट.
तीन वर्षांपूर्वी दुसऱ्या मुलाच्या वेळी मात्र आम्ही त्याला पेनफुल असणारे इंजेक्शन दिले. यावेळेस पेनलेस च्या किमती अडीचपट वाढल्या होत्या. आम्ही ठरविले पाहिले इंजेक्शन पेनफूल देऊ जर त्रास झाला तर पुढील पनलेस देऊया परंतू मुलाला अजिबात त्रास झाला नाही. दहा पंधरा मिनिटे काय रडला असेल तेव्हढेच.

इंजेक्शन दिल्यावर बाळाला घरी आणल्यावर काहीजण बांधून ठेवतात जेणेकरून पाय दुखू नये. मी बाळाला मोकळेच ठेवले होते, पायाची हालचाल झाल्यामुळे पाय आखडत नाही आणि दुखत पण नाही. घरी आल्यावर टोचलेली जागा बर्फाने शेकवावी.

घरी आल्यावर टोचलेली जागा बर्फाने शेकवावी.
>>
हो हे आम्हीही करायचो. माझ्या आवडीचे काम होते हे
बाकी वॅक्सिन पेनलेस असो वा पेनफुल. सुई टोचताना दुखणार असेल तर ते दुखतेच. आणि त्यामुळे पोरं डॉक्टरचा दरवाजा चढतानाच रडायला सुरुवात करतात. त्यावर पहिले उपाय शोधायला हवा.

त्यामुळे पोरं डॉक्टरचा दरवाजा चढतानाच रडायला सुरुवात करतात. त्यावर पहिले उपाय शोधायला हवा.>> तिथल्या आठवणी पेनफुल असतात ना, त्या कश्या घालवणार.
आमचा डॅाक्टर इतक्या पटकन सुई टोचायचा कि ईंजेक्शन देऊन २-४ सेकंदाने बाळ रडायचे.

1st time आहे तर काळजी वाटते.. पण..
दोन्ही च्या परिणामात फरक नाही. ताप येणे न येणे हे लस कुठली आहे त्यावर अवलंबून आहे. पेनलेस आणि पेनफुल मधल्या त एवढाच फरक आहे की दिल्यानंतर त्या जागी दुखतं, गाठ येते, लाल होऊ शकते ई.
डॉ चा हात हलका नसेल तर कुठलेही सुई टोचताना दुखतेच.
मी दोन्ही मुलांना पेनफुल वाले दिले आहेत. डॉ च म्हणणं की मुलं जरा कणखर होतात..आम्हाला ते पटले.
वरती सावली ने लिहिलय त्याला अनुमोदन..

जे टेस्टड आहे तेच मुलासाठी वापरा, थोडा त्रास होतो, पण त्यातून देखील ती मुले खूप काही शिकतात, त्रास हा काही तासाचा असतो पारंपारिक लसी मध्ये + १२३४५६७

ते लगेच गावाला जायचे ट्रिप च्या तारखा बाळाला सुटेबल अश्या अ‍ॅडजस्ट करा की. आता ते पण फॅमिली मेंबर आहे नं . लशीकरण महत्वाचे आहे.
इंजेक्षन तेव्ढेच दुखेल. बाकी ताप सूज. आता तुम्हाला बाळाचा थोडा डिस्ट्रेस बघायची सहन करायची सवय करून घ्यायला हवी. आईपण आले आहे. बी स्ट्राँग. ऑल द बेस्ट. शिवाय पेडीचा सल्ला महत्वाचा.

सरळ सरकारी दवाखान्यात द्या, तिथे पेन लेस मिळत नाही. पण औषधे फ्रेश असतात, नीट ठेवलेली असतात, फुकट असतात.आणि माझ्यासाठी महत्वाचे म्हणजे सरकारने जरुरीचे केलेल्याशिवाय चे कोणतेही जास्तीचे डोस द्यावे लागत नाहीत. >> +१

आभार सर्वांचे __/||\__

यावेळी नेहमीची लस देऊन बघेन जर जास्त त्रास झाला तर मात्र पुढच्या वेळेपासून पेनलेस.

अमा, आम्ही नेहमी ट्रेनने जातो गावी पण बाळ लहान आहे म्हणून गाडी काढतोय. मलाही तीच भीती वाटते आहे की कसे जमेल पण जायचे ठरले आहे. मला तेच विचारायचे होते की इथे कुणाला असा अनुभव आहे का बाळाला घेऊन लस दिल्यावर प्रवास केल्याचा, असेल तर प्लिज सांगा

लसीकरणात खूप ऑप्शन्स असतात
1. पेनलेस - पेनफूल
2. २-३ लसी एकत्र असणे ज्यामुळे एकावेळी २-३ रोग कव्हर होणे
3. डोसेज सायकल कमी असणे ( बहुतेक कॉन्सट्रेशन जास्त असेल)
4. एकाच रोगाचे जास्त स्ट्रेन्स कव्हर असणे. (उदा. न्युमोकोकल)
जनरली जेवढे जास्त ऑप्शन तेवढे किमतीत वेरीएशन.
आमचे डॉक्टर वरील सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्स्प्लेन करायचे. त्यामुळे आम्ही वरील चारही ऑप्शन ट्राय केलेत.
पेनलेस लस देताना दुखतेच. नंतर मात्र काही त्रास जाणवला नाही.

कुठलीही लस दिली तर डॉना विचारून ठेवा की ताप आला, त्रास झाला तर काय करायचं. यासाठी डॉ तापासाठी औषध आणि इंजेक्शनच्या जागी लावायला काही मलम रेकमेंड करतात.

त्याचप्रमाणे इंजेक्शन देणार्याचा हात हलका असण्यावर अवलंबून असतंच. आमच्या डॉक्टरांच्या सौ ट्रेन्ड नर्स होत्या आणि त्यांचा हात जास्त हलका होता.

बाळ थोडं मोठं झाल्यावर सलाईन लावणे, ॲंटीरेबिज इंजेक्शन वगैरे प्रकार झाले. यातलं काहीही पेनलेस नसतंच.

वर कोणीतरी मेन्शन केले आहेच की महापालिकेच्या हॉस्पिटलमधे (विशेषकरून मुंबईत) औषधांचा साठा फ्रेश असतो आणि तिथे फक्त मॅंडेटरी लसी दिल्या जातात.

लसीकरणानंतर १-२ दिवस प्रवास ऍटलीस्ट दीड महीन्याच्या बाळाला घेऊन टाळावा. कारण काही लसींचा त्रास १-२ दिवसांनंतर दिसतो.

बाळाला थोडा जरी ताप/खोकला/सर्दी असेल तर लस/ पोलिओ अभियानातला डोस देउ नका. डॉ.नी ३-४ दिवसाची गॅप असेल तरी चालेल असे सांगितले होते.

बाकी बाळाला कणखर बनवण्यासाठी पेनफूल लस देणे मला पटत नाही. अजून खूप ऑप्शन्स आहेत त्यासाठी. अर्थात इतरांच्या मताचा आदर राखून हेमावैम.

सर्वांसाठी:
४-५ वर्षांपूर्वी डॉ. अमोल अन्नदातेंनी लसीकरण या विषयावर लोकसत्तेमधे एक लेखमाला लिहीली होती. ती आर्काइव्हमधून मिळाली तर जरूर वाचा.

लसीकरणानंतर १-२ दिवस प्रवास ऍटलीस्ट दीड महीन्याच्या बाळाला घेऊन टाळावा. कारण काही लसींचा त्रास १-२ दिवसांनंतर दिसतो. >>> हो या ज्या सुरवातीच्या लसी असतात त्यांचा इफेक्ट दुसऱ्या दिवशी दिसतो. पाय दुखणे, गाठ होणे इ. त्याच दिवशी सुरवात होते पण ताप मात्र रात्रीनंतर सुरू होतो त्यामुळे प्रवास टाळला तर बरे आहे. आणि जर जमणार नसेल तर यावेळेस पेन्लेस द्या अर्थात डॉक्टरांशी बोलूनच आणि पुढल्या वेळी पेन्फुल द्या. बाळाची काळजी महत्वाची.

निल्सन, हो, दोन दिवसात त्रास थांबला नाही तर नाही जाणार पण फक्त प्रवासादरम्यान काही त्रास होऊ नये हीच काळजी आहे

VB, मी नाही वैद्यकीय क्षेत्रातली तज्ञ आहे नाही फार अनुभवी माता आहे पण तरी माझं मत सांगते.

बाळाला लस दिली की दुखणं, ताप येणं हे सगळं होणारच. किंबहुना होईला हवंच तरच ते बाळ नॉर्मल असणार ना? कोणतीही लस दिली की अँटिबॉडीज निर्माण होयला मदत होते तेंव्हा ताप येणं साहजिक आहे. नैसर्गिक आहे.
उलट मी म्हणेन की देवाने आपल्या शरीराची रचना एवढी सुंदर केलीये की ज्या त्या स्टेज ला शरीर ज्या त्या प्रकारे रिऍक्ट होणं गरजेचं असतं म्हणून लस दिली की ताप येणार, बाळाला थोडं दुखाणार. मन घट्ट करून हे पाहायचं कारण हे बाळासाठी, त्याची इम्युनिटी वाढवण्यासाठी गरजेचं आहे. ही छोटी बॅटल बाळ जिंकलं की पुढच्या बॅटल साठी तयार होतं. आई म्हणून आपलं असं तयार होणं गरजेचं असतं. तेंव्हा आता ईथुनपुढे सगळ्याच गोष्टी घट्ट मनाने पहायला लागा प्लिज.

पुन्हा 'मी कुठेतरी वाचलं' हे सगळ्यात आधी बंद करा. बाळाचे डॉक्टर आणि आपले अंतर्मन काय सांगतंय तेच खरं आणि तेवढंच महत्वाचं.

माझ्या बाळाला मी मुद्दाम पेनलेस इंजेकशन्सच दिलेत. अमेरिकेत असताना इथल्या डॉक्टरने सांगितलं होतं की बाळ आधीच इथल्या सगळ्यांशी adjust होईला स्ट्रगल करत असतं तर पारंपरिक पद्धती वापरून त्याला आणखी त्रास देण्यापेक्षा सध्याच्या पद्धतीत काही सोप्पं मिळालं तर ते घेणं जास्त फायद्याचं.
मला ते पटलं.

जशी पेनफुल इंजक्शन्स ट्राईड आणि टेस्टेड आहेत तशीच पेनलेस ही आहेत. त्याशिवाय बाळांना कोणी द्यायला जाणार नाही आणि जगात लाखो लोकं ती देतात त्यामुळे इफेक्ट्स मधे काही फरक पडत नाही तेंव्हा आर्थिकदृष्ट्या शक्य असेल तर ते केलेलं बरं.

पेनफुल इंजक्शन्स कोर्स ने समजा 4 दिवस पाय धरून बसावा लागत असेल तर पेनलेस ने फक्त 24 तासच बसावा लागतो (हा माझा स्वानुभव आहे याला कोणताही वैद्यकीय पुरावा असेल तर माहीत नाही)

मी माझ्या मुलाला पेनलेस इंजक्शन्स प्लस कॉम्बिफ्लेम औषध हा पॅटर्न ठेवला होता. त्याला कधीही त्रास झाला नाही.

लहान मुलांसाठी पेनलेस लस असते, हे माहितच न्हवते. मी स्वतः मागे एकदा फ्लू शॉट घेतला होता. इंजेक्शन टोचून घेण्याऐवजी नाकात स्प्रे मारून घ्यायचा म्हणून घेऊ असा विचार केला, पण त्या अनुभवानंतर "भीक नको पण कुत्रा आवर" असे झाले. त्यानंतर नेहमी पटकन सुई टोचून घेणे परवडते आणि तशाही हल्ली इंजेक्शनच्या सुया आता खूपच बारीक असतात, फार तर एखादा डास चावल्यासारखे वाटते.

या व्हिडियोची तुम्हाला मदत होईल, अशी आशा.

मी माझ्या मुलाला तो तान्हा असल्यापासून बहुतांशी पेनलेस दिल्या आहेत. काही वेळा पेनलेस उपलब्ध नव्हत्या तेव्हा सध्या दिल्या आहेत. पण माझ्या मुलाला तरी साध्या लशींचा काही विशेष त्रास झाला नाही. अगदी माईल्ड ताप आला एवढेच.
आता तो ६ वर्षांचा होईल आणि त्याचे सध्या ५ वर्षांचे रिपीट डोस चालू आहेत.

Pages