बाललेखिकेची बालकथा: कबीर आनंदी झाला.

Submitted by नानबा on 17 January, 2021 - 09:02

कबीर आनंदी झाला.
लेखिका : सना हसबनीस. वय वर्ष ७.

एका शाळेत कबीर म्हणून एक मुलगा शिकत होता. तो पहिलीत होता. तो दिसायला जरा वेगळा होता. त्याला बोलायचा प्रोब्लेम होता. त्याचे कान वेगळे होते. त्याची उंची जास्त होती. मानही उंच होती . तरीही त्याचं डोकं इवलुसं होतं. तो काय बोलत होता, ते कोणाला कळत नसे.
त्याला सगळी मुलं त्रास देत असत. त्यामुळे तो नेहमी उदास बसायचा. त्याचं मन आनंदी नसायच. त्याला नेहमी काहीतरी प्रोब्लेम येत असे. आज मुलांनी चिडवलं आणि उद्या अजून काहीतरी खोडी काढली. त्याला सगळी मुलं एकटं पाडायची. तो खूप वेळा वेगळ्याच मूड मधे असायचा. मुलं त्याला खेळायला घ्यायची नाहीत आणि चिडवत असायची.
ताई म्हणजे टीचर नेहमी सगळ्यांना बोलत असत, "घ्या की रे कबीरला तुमच्यात" पण कोणी घेत नसत.
एके दिवशी एक नवीन मुलगी शाळेत आली, तिचं नाव मीरा. तिची उंची बोलणं दिसणं वागणं इतकं छान होतं की मीरा सगळ्यांना पसंत पडली. सगळ्यांनी तिला खेळायला घेतलं. मीराला जाणवलं की कबीर एकटा पडलाय, त्यामुळे तीने त्याच्यासोबत खेळायला सुरुवात केली. मीराचं बघून सगळ्यांना वाटलं की आपण पण कबीरशी खेळावं. सगळ्यांनाच जाणवलं की कबीर एक चांगला मुलगा आहे. त्याना वाटत होतं की अशी दिसणारी आणि काळी दिसणारी मुलं चांगली नसतात. पण आता ते त्याला खेळायला घेतात. कबीर आनंदी होतो. त्यानंतर ते सगळे मित्र होतात.
समाप्त.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users