शेवटच्या आठवणी

Submitted by मप्र on 16 January, 2021 - 17:50

This poem imagines feelings of a septuagenarian (78 year old) after losing a life-long partner.

सुखास आठवीत का 
अश्रू येती लोचनी 
जीवनाची खंत का       
विरहीं येथ ये मनी 

वर्तमान हरवुनी
चित्री तुझ्या गुंततो 
झाड फूल पानी मनी
गंध तुझा भासतो  

शेवटची भेट तुझी 
जपून रोज ठेवितो 
पुन्हा गतक्षणात त्या 
मी तुलाच शोधतो 

मृत्यूची सांग ना
चाहूल का होती तुला 
सर्व देउनी पुन्हा
सर्वस्वतव देशीं मला

जोडूनी संसार उभा
तू मला सांभाळिले 
रुद्र वादळातहि
तू शीड नाही सोडले 

दुःख तुझ्या जाण्याचे 
आत अंतरी जळे 
मर्मघात हा कसा 
झेलू मी मज ना कळे  

सहस्त्र घाव झेलले 
तुझ्याच फुंकरी बळे 
शेवटचा घाव हा    
विना तुझ्या घळघळे 

शेवटचा घाव हा    
विना तुझ्या घळघळे 

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults