चुकले का हो ?

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
1’

(इलाही जमादारांच्या 'चुकले का हो ? ' ह्या अत्यंत सुंदर गझलेचे एक असुंदर विडंबन)

श्वसुराला, त्रास म्हणालो,
श्वसुराला, त्रास म्हणालो, चुकले का हो?

मेहुणीस, 'लै खास' म्हणालो, चुकले का हो?
(उरली) चिरंजीव वेदना, मस्तकी, हळहळणारी (कसली बर ? :फिदी:)

भाचरांस (तिच्या) , बकवास म्हणालो, चुकले का हो?
बुडत्याला, तरण्यासाठी, काय लागते?

जेवणावळीं, आता बास म्हणालो, चुकले का हो?
खाण्याआधी, नाव सांग त्या, पदार्थाचे
उल्हासात, फाल्गुनमास म्हणालो, चुकले का हो?
निंदानालस्तीही, केवळ, मिळवत गेलो

सासुचे, वय साठ म्हणालो, चुकले का हो?
(मेहुण्यास, ग्रहण खग्रास म्हणालो चुकले का हो ? )
पाहील्या कविता, देखील्या ग़ज़रा, गीतेस पाहीले (ह्या सगळ्या तिच्या मैतरणी बर)
पत्नीला मी, फास म्हणालो, चुकले का हो?

चौदा वर्ष, काढली विवाहा, उरली वंचना
हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो?

वात आप्त, आघाता टगे, अपघात मेहुणे
साड्यांना तिच्या , आरास म्हणालो, चुकले का हो?

चुकले का हो? चुकले का हो? म्हणणाऱ्यांनो!
रचनेस माझ्या, जरा हास म्हणालो, चुकले का हो?

(चु भू द्या घ्या )

विषय: 
प्रकार: 

>>>.चौदा वर्ष, काढली विवाहा, उरली वंचना
हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो?<<<

Lol

केदार,

मी पण मुळ रचना वाचली नाही आहे पण तु जे लिहिलेय ते एकदम झकास्...मजा आली.

केदार, मला पण विडंबन खुपच आवडले. मी सुद्दा मुळ कविता वाचलेली नाही.

धन्यवाद सर्वांचे Happy मूळ गझलेची लींक द्यायला हवी होती Happy

कूल : तुझे विशेष आभार Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

धन्यवाद Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

तिकडं म्हणू नकोस हा असली विडंबनं आत्तापासून... Lol

अनघा Proud

जाई Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

चौदा वर्ष, काढली विवाहा, उरली वंचना
हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो? >>> केदार आधी पासूनच मनाची तयारी करून ठेवली आहेस... Happy

अ सुंदर विडंबन :d

इन्द्रा Proud
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

>>सासुचे, वय साठ म्हणालो, चुकले का हो? << Lol
केड्या तुझे होवू घातलेलं सासू इलंय बग बाह्येर हातात लाकूडाचो फोक घेवान... Proud

कविता आवडली... लईच भारी.. Rofl

धन्यवाद सगळ्यांचे Happy

दक्स Lol
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

धन्स Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

रचना सुंदरच आहे. विशेषतः 'विवंचनेचा' शे'र आवडला.

याच रचनेचं मीसुद्धा विडंबन केलं होतं:

बायकोस मी ताप म्हणालो, चुकले का हो?
अन् पोराला बाप म्हणालो, चुकले का हो?

हा मत्ला होता.

शरद