धोके आणि जोखीम

Submitted by प्रजननविरोधी on 9 January, 2021 - 00:41

भंडारा इस्पितळात आगीने होरपळून जळालेल्या १० नवजात बालकांच्या बातमीने महाराष्ट्र आज हादरला. १७ पैकी ७ बालके वाचू शकली, उरलेली १० जिवंत जळाल्याची बातमी प्रसारमाध्यमांत आहे. गृहमंत्री, चौकशी, मृतांच्या प्रजनकांना आर्थिक मदत वगैरे नेहेमीचे सोपोस्कारही सुरु झाले. संडासात बसून किंवा चहा पितापिता मोबाईलवर बातम्या वाचून किंवा उथळ अतिरंजित वृत्तवाहिन्यांचे अतिभावनिक वृत्तांत पाहून बऱ्याच जणांची दिवसाची "हळहळ व्यक्त" करण्याची भूकही आत्तापार्येंत शमली असेल.

"शोले" चित्रपटात "कितने आदमी थे" चा डायलॉग सगळ्यांना ठाऊक असेल. ६ गोळ्यांच्या बंदुकीत ३ गोळ्या भरून केलेल्या खुनाचा खेळ सर्वज्ञात आहे. ह्या खेळाला इंग्रजीत नाव आहे - "Russian Roulette". स्वतःच्या उतशृंखल करमणूकी करता दुसऱ्याचा जीव गंभीर धोक्यात टाकण्याचा हा खेळ आहे.

भंडारा इस्पितळात जी मुलं मेली आणि जी वाचली त्यांच्याशी त्यांच्या आईबापांनी हाच खेळ केला. किंबहुना सगळ्याच प्रजनकांनी आपल्या अपत्यांशी हाच खेळ केलेला आहे. आयुष्यात अनंत कोटी जोखिमा आहेत. त्यापासून काही जण वाचतात तर काही जण होरपळून मारतात. जे वाचतात तेही शेवटी कधी न कधी कोणत्यानाकोणत्या जोखिमेस बळी पडतातच. पराभव निश्चित असलेल्या मृत्यूशी द्वंद्व करण्यात आपण आयुष्य घालवतो. हे द्वंद्व आपल्यातील कोणीच स्वतःहून सुरु केलेले नसते. ते आपल्या जन्मदात्यांनी त्यांच्या स्वार्थी, अप्पलपोटी आणि उथळ मौजेसाठी किंवा उनाड गैरसमजांना/अंधश्रद्धांना बळीपडून आपल्यावर लादलेले असते. अनेक जोखीमांच्या ह्या जुगाराचा शेवट पराभवात निश्चित असतो.

भंडारा इस्पितळाच्या घटनेची चौकशी होईल, कोणीतरी कनिष्ठ अधिकारी किंवा डॉकटरास किंवा नर्सला जबाबदार ठरवून त्यांस शिक्षा ठोठावली जाईल. घरीबसुन टीव्ही पाहणारे प्रजनक "सिष्ट्म"ला दोष देतील किंवा राजकारण्यांच्या डोक्यावर खापर फोडून आपले प्रजनकीय चाळे चालू ठेवतील. मेलेल्या मुलांवर खरी जोखीम कुणी लादली असेल तर ती त्यांच्या आईबापांनी. ते ह्या घटनेला जबाबदार आहेत. ज्यांची मुलं ह्यात नव्हती ते प्रजनकही त्यांच्या मुलांवर गंभीर जोखीम लादण्याला जबाबदार आहेत.

If destruction is violence, creation, too, is violence. Procreation, therefore, involves violence. The creation of what is bound to perish certainly involves violence.-Mahatma Gandhi

Group content visibility: 
Use group defaults

लेख पटला नाही. कोणीच प्रजनन केलं नाही तरी जग तसंही साठ सत्तर वर्षांत मानवविरहित होईल. त्या तुलनेत प्रजनन प्रक्रियेत घडणारे काही प्रमाणातले मृत्यू हे कमी उपद्रवी आहेत.

व्हिक्टीम ब्लेमिंग. ह्याला जबाबदार तिथे काम करणारे लोक आणि त्यावर लक्ष ठेवणार लोकनियुक्त आघाडी सरकार आहे.

आयुष्यात अनंत कोटी जोखिमा आहेत. त्यापासून काही जण वाचतात तर काही जण होरपळून मारतात. जे वाचतात तेही शेवटी कधी न कधी कोणत्यानाकोणत्या जोखिमेस बळी पडतातच. पराभव निश्चित असलेल्या मृत्यूशी द्वंद्व करण्यात आपण आयुष्य घालवतो. हे द्वंद्व आपल्यातील कोणीच स्वतःहून सुरु केलेले नसते. ते आपल्या जन्मदात्यांनी त्यांच्या स्वार्थी, अप्पलपोटी आणि उथळ मौजेसाठी किंवा उनाड गैरसमजांना/अंधश्रद्धांना बळीपडून आपल्यावर लादलेले असते. अनेक जोखीमांच्या ह्या जुगाराचा शेवट पराभवात निश्चित असतो.

>>>>>

मनुष्य हाच एकमेव प्राणी हे करतो असे नाही तर पृथ्वीवरील यच्चयावत सजीव हेच करतात. कारण आपला वंश पुढे नेणे हेच सजीवांचे प्रथम कर्तव्य आहे. मनुष्य इतर सजीवांपेक्षा जास्ती विकसित असल्यामुळे वंश पुढे नेणे ह्या आदीम कामाव्यतिरिक्त इतर कामातही तो लक्ष घालतो. पण म्हणून वंश पुढे नेणे ह्या आदीम प्रेरणेपासून त्याची सुटका झालेली नाही.

मनुष्य वगळता इतर सजीवांची पिल्ले जन्मताच अतिशय मोठ्या संकटात अडकतात. त्या संकटांतून जी पिल्ले वाचतात ती मोठी होऊन परत नव्या पिल्लांना जन्म देतात, त्या नव्या पिल्लांच्या नशिबी तितकीच किंवा त्याहून भयंकर संकटे लिहिलेली असतात.

मनुष्यप्राणी विकसित असल्यामुळे त्याच्या पिल्लांच्या नशिबी उत्तरोत्तर कमी संकटे येत गेलेली आहेत. जन्मतःच पिल्ले मरण पावण्याचे प्रमाण मनुष्यात बहुधा सगळ्यात कमी असावे, इतर सजीवात उत्तरोत्तर ते वाढत गेल्यासारखे वाटतेय. त्यामुळेच पृथ्वीवर मनुष्याची प्रजा वाढतेय आणि इतर सजीवांची कमी होतेय.

हल्ली तर मनुष्यात केवळ त्याच्या हलगर्जीपणामूळे असे प्रकार घडण्याचे प्रमाण वाढलेय, इतर सजीवांत सहसा असे होत नाही.

मनुष्याने स्वतःचा हलगर्जीपणा कमी करावा. जे हलगर्जीपणा करतात त्याना कडक शासन व्हायला हवे.

मनुष्य सोडता इतर सजीवांच्या पिल्लांना किती संकटे झेलावी लागतात त्याची एक झलक -

https://youtu.be/d6oNNajdUkc

https://youtu.be/2jJ7BkXGP4c

यु ट्यूबवर ढिगाने विडिओ आहेत पण मला बघायचे धारिष्ट्य करता येत नाहीये ..

शेवटाचे कारण सुरवात आहे असे म्हटल्यासारखे आहे हे.
कशाचीही सुरवात करू नका म्हणजे कशाचाही शेवट होणार नाही.

Proud

हाच विचार लिहिणार्याच्या मागच्या पिढ्यानी केला असता तर लिहिणारा उपजला असता का ?

टिपिकल भाजपिय विचारधारा

Proud
हमारे घर के इतने लोग पीएम बने, लेकीन मोदी जैसा कोई नही बना - वरूण गांधी

अरे मूर्खां, तुझ्या घरचे मोदी जैसे झाले असते तर तू उपजला असतास का ?

गोरखपूरच्या घटनेवरून गळा काढणारे पुरोगामी आज एकदम चिडीचूप आहेत. शेम ऑन देम. तरी बघा घटना घडली तिथे भाजपचा कोणी नगरसेवक, सरपंच आहे का- त्याला ब्लेम करा किंवा मोदी आहेतच. राज्यसरकारची कौतुके सुरू राहू द्यात.
यूपीतील लहान मुलांचं विशिष्ट आजाराने मरण होण्याचं प्रमाण दरवर्षी 600 वगैरे मुलं असं 2017 पर्यंत होतं. आदित्य नाथनी प्रयत्न करून आता हे प्रमाण अतिशय खाली आणलं आहे. यासाठी युनिसेफनेही योगीजींची स्तुती केली आहे.
https://in.news.yahoo.com/yogi-adityanath-government-achieves-95-0839144...

पण ते जाऊ दे. इथे मृत बालकांच्या घरच्यांना 5 -10 लाख देऊन विषय मिटवला आहे. तत्परतेने सरकारी खजिन्यातून आर्थिक भरपाई जाहीर केल्याबद्दल सर्व संबंधितांचे हार्दिक अभिनंदन.
आता पुढं- भंडाऱ्याबद्दल मूग गिळले आहेत त्यांची उसळ करा. आणि फडणवीस सरकारच कसं जबाबदार हे स्वतःला सांगा.

लेख अत्यंत चिडून जाऊन लिहीला आहे की जन्मदात्या आई बापाला मुलांना वाचवता आलं नाही ह्याचा राग आला आहे. ही भावना मान्य आहे. मुलं झाल्यापासुन प्रत्येक क्षण ह्याच विचारात जातो की माझ्या पिल्लांना कसलाही त्रास होऊ नये.

साधनाने लिहिल्याप्रमाणे मीही विचार करते. प्रत्येक सजीव वंशसातत्यासाठी प्रयत्न करतोच. जन्माला आलेला प्रत्येक सजीव मरणारच, यात अपयश ते काय? त्या ठरलेल्या अंताकडे जाताना आपण काय केलं आणि कसं जगलो ते महत्वाचं. दुर्दैवाने ह्या बाळांना संधीच मिळाली नाही. ज्या आई वडीलांना तुम्ही दोष देत आहात ते आयुष्यभर हे दु:ख बाळगणार आहेत. ज्यांना आस आहे म्हणुन पालक झाले आहेत, असे प्रत्येक जण न जन्मलेल्या मुलांचं दु:ख सुद्धा, नंतर मुलं झाली, तरी विसरत नाहीत. ज्यांनी ९ महिने हजारो स्वप्न बघितली आणि मग वेणा सोसुन जन्म दिला ते किती दु:खात असतील?

दोषी कोण? घातपात की अपघात? मुलं व्हावीत की होऊ नयेत? ह्या फुकाच्या चर्चा आणि शोध ह्याने ती बाळं परत येणार नाहीत की ह्या घटनेने ज्यांना दु:ख झालंय ते पुन्हा 'काही झालंच नाही' असे जगू शकणार नाहीत. दुर्दैवाने ज्या मुळे झालंय ते ही सुधारणार नाहीत. मला खंत ह्याचीच आहे. Sad