मैफिल सोडूनी प्यायचे कशाला....

Submitted by किरण कुमार on 8 January, 2021 - 04:59

संस्कार सोडूनी द्यायचे कशाला
मैफिल सोडूनी प्यायचे कशाला

नदीला पूर हा येणारच होता
तिने त्या किनारी जायचे कशाला

बेधुंद जगावे ठरविलेच आहे
झुंड टोळक्यांना भ्यायचे कशाला

मद्यात अताशा नशा येत नाही
तिचे कॉल एवढे घ्यायचे कशाला

असे काय नाही तुझ्या घरी आता
शुध्दीत स्वतःला न्यायचे कशाला

अरे खूप अजूनी प्रणय रम्य निशा
एवढ्यात जेष्ठ व्हायचे कशाला

.................. किरण कुमार

Group content visibility: 
Public - accessible to all site users