कोकणातील दशावतर

Submitted by Ratnakaryenji on 7 January, 2021 - 22:56

मे महिन्यात आरवलीला येनजी परिवार च्या घरामागे जंगलात एक छोटीशी टेकडी आहे. तिकडे फार पुर्वी आमच्या आजोबांनी नाथपंथीय पुरुषाचे परमनाथ देवालयाची स्थापना केली त्याची सालाबादी वर्धापनदिनाचा निमित्ताने आम्ही समस्त येनजी मुंबईकर मे महिन्यात पहिल्या आठवड्यात तिकडे आरवलीला जातो. मे महिन्यात आम्ही गेलो की वर्धापनदिनाचा आधि एक दिवस व नंतरचे दोन दिवस मला तिकडे लहान झाल्यासारखे वाटते. Summer vacation म्हणजे काय ते तिकडे दोन तीन दिवसात कळते. करवंदे , जांभळे , काजुची रसदार बोंडे, रसाळ फणस , नारळाची शहाळे व आंबे तर भरपुर खायला मजा असते. इकडची मुले आई वडिलांनी सांगितलेल्या कामात पुर्ण व्यस्त असतात. उदा. जर घरात सत्य नारायणची पुजा असेल तर आदल्या दिवशी त्या कमीत कमी हजार ताज्या तुळशीचे तुरे आणायला सांगतात मग ती मुले आजुबाजुला जेव्हढी घरे आहेत त्यांच्या परसातील तुळशी घर मालकाला विचारुन थोडी थोडी तुळशीबागेत जमा करतात व तिकडून निघताना त्या घरातील सगळ्यांना हाक व विचारपुस करून दुसर्या दिवशीच्या पुजेचे आमत्रंण द्यायला विसरत नाही. पुजाच्या आदल्या दिवशी , पुजाच्या दिवशी व पुजाच्या नंतरच्या दिवशी या मुलांना फार काम असते. पुजेला लागणार्या सामानाची जमवाजमव , ने आण व पुजा झाल्यावर जिकडुन सामान आणले ते पुन्हा तिकडे नेऊन पोहचते करणे. मी स्वतः माझा पुतणा चि. शुभम व पुतण्या कु. स्वरूपात व कू. श्वेता बरोबर हा अनुभव घेतला आहे. त्यांच्या बरोबर मी ते जिकडे जिकडे घेऊन जातात तेव्हा मी त्याच्याबरोबर भटकतो. अक्षरशः मी त्यांच्या सारखाच लहान होतो. त्यांच्याबरोबर दगड गोळा करून मी जांभळे पाडतो व हावरटासारखा खातो तेव्हा माझी बनियन वर जांभळाचे डाग पडतात .पण अशा वेळी मला माझ्या बायकोची भिती वाटत नाही. तिच्यासमोर मी विजयी मुद्रेने आज किती मजा केली ते मी माझा बनियनवरचे जांभळे डाग दाखवतो. तेव्हा शुभम, स्वरुपा व श्वेता माझा तो अवतार बघुन खुष होतात .त्यांना मी म्हणतो यालाच म्हणतात कोकणातील दशावतार.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults