मायबोलीवर बर्याच दिवसाने आज आले आणि पाहिले की, मायबोलीवर आपले युट्युबचे काम प्रमोट करु शकतो( हा माझा अजूनही अंदाजच आहे पण दोन लेख पाहिले आणि वाटले की, अश्या प्रमोशनला बंदी नसावी.) जर असलीच तर मी हा लेख काढून टाकेन, अॅडमिन कृपया मला तसे कळवा.
खरे तर मी काही व्यवसायिक युट्युबर नाही आहे, म्हणजे पुर्णपणे छंद म्हणून काढलेला प्रयत्न होता. तो सुद्धा माझ्या आईसाठी.
गणपतीत तिच्या खुपच मागे लागले की, तु तुझ्या पाककृती टाक म्हणून. कारणही तसेच होते .. जे खाजगी होते/आहे पण इथे बहुधा नंतर सांगेन.
आई एकदमच एकाकी झाली होती एका धक्क्याने. तिला पुन्हा कशात तरी गुंतवावे म्हणून माझ्याकडे आणले व आग्रह केला. तिचा पुर्ण नकार होता.
मग म्हटले मी करेन, तु सांगत जा.
त्यामुळे विडिओत, मी कृती करत जरी असले तरी आईची कृती व मार्गदर्शन आहे. पण गणपतीत तीनच विडिओ केले आणि बंद झाला कारभार.
पारंपारिक मोदक कृती अथपासून इतिपर्यंत : मोदकाचे पीठ कसे करावे, उकड कशी करावे, मोदक वळावे कसे वगैरे
१) पारंपारिक मोदक
पारंपारिक नेवरी
२) नेवरी
तळणीचे मोदक
३) मैदा न वापरता तळणीचे मोदक
पुन्हा नवीन वर्षाला सुरुवात करायची ठरले व तिला म्हटले तू कॅमेरा समोर ये व तुझा आवाज दे, पण परत तिचा नकार.
आणि आज सहजच मायबोलीवर आले तर पाहिले की, मायबोलीवर कदाचित प्रोत्साहन मिळु शकते. तिला आज परत आग्रह केला. बघुया काय म्हणतेय ती...
तोवर तिच्या कृतीचे , मी करून दाखवलेले विडिओ देत आहे.
आईने साथ दिली तर, विडिओ टाकायचे ठरलेय... पण बघुया कसा प्रवास पुन्हा सुरु होतोय....
तुम्हाला आवडले तर, नक्कीच तिला सांगून नवीन विडिओ टाकेन...
धन्यवाद.
काही कल्पना असतील तर सुचवा.
काही कल्पना असतील तर सुचवा. धन्यवाद.
खूप शुभेच्छा. .. आईचे
खूप शुभेच्छा. .. आईचे पाककौशल्य नक्की पुढे आणा.
छान
छान
आईंना शुभेच्छा
नव्या पब्लिक ला जमतील अश्या कमी श्रमाच्या सोप्या रेसिपी पण आणा हळूहळू.
तिला म्हटले तू कॅमेरा समोर ये
तिला म्हटले तू कॅमेरा समोर ये व तुझा आवाज दे>> ही कल्पना खूप छान आहे .. Banglar rannaghor नावाचं फेसबूकवर चॅनल आहे, त्यावर एक वयस्कर काकू जेवण बनवताना दिसतात..म्हणजे त्यांचे फक्त हातंच दिसतात पण मला तेच बघायला फार मज्जा येते..तुमचेही विडिओज् छान आहेत पण आईचे हात दिसले तर अजून पारंपारिक टच येईल
आई एकदमच एकाकी झाली होती एका धक्क्याने. तिला पुन्हा कशात तरी गुंतवावे म्हणून माझ्याकडे आणले व आग्रह केला. >> हे पूर्णपणे रिलेट करू शकते.. ३ महिन्यांपूर्वी माझे बाबा गेले आणि आता आई ६ महिने तरी माझ्या जवळच रहाणार आहे.. तीला गुंतवण्यासाठी दोन-तीन उपक्रम सुरू ठेवलेत पण गेल्यावर्षी बंद केलेला केटरिंग बिझनेसही सुरू करतेय.
शुभेच्छा!
शुभेच्छा!
कमेंट बॉक्सच्यावरती डोळ्याच्या चिन्हाशेजारी लिंकचे बटण आहे. तिथून लिंक्स देत येतात.
छान उपक्रम ... तुमच्या
छान उपक्रम ... तुमच्या आईंच्या रेसिपी बघायला आवडतील.
खूप खूप शुभेच्छा !
भरपूर शुभेच्छा!
भरपूर शुभेच्छा!
स्तुत्य उपक्रम!
स्तुत्य उपक्रम!
मन रमवायला चांगले साधन आहे.
छान आहे उपक्रम. खूप शुभेच्छा
छान आहे उपक्रम. खूप शुभेच्छा !
नक्कीच बघत जाईन.
मी व्हिमिओ वर खाते उघडलेय. प्रोफाईलला लिंक दिलेली पण सोवळे ओवळे पाहून तिथूनही हटवली.
तुम्हाला आणि आईंना खूप
तुम्हाला आणि आईंना खूप शुभेच्छा!!
@देवकी तुमच्या आईच्या हातच्या
@देवकी तुमच्या आईच्या हातच्या पाक कृती पाहायला आवडतील. वाळवण आणि प्रत्येक सणाचा साग्रसंगीत स्वयंपाक प्रत्येकीला जमतोच असे नाही.
पण सगळे व्याप सांभाळून थोडफार घरगुती रेसिपी,लहान मुलांसाठी पौष्टिक घरगुती पदार्थ, घरात कोणी आजारी असतिल किंवा सध्या कोरोनामुळे बाहेरचे खात नसल्यामुळे 1दिवस प्रवासात टिकणारे पदार्थ अशा बर्याच रेसिपी आईना माहित असतिल.
एकदा बनवणे सुरू केले की येणार्या कमेंट मधून नवीन सुचत राहिल.
@म्हाळसा मला माहित नव्हते की तुमच्या वडिलांचे निधन झाले. तुम्ही भारतात येऊन गेलात एवढेच माहित होते. आईची काळजी घ्या.
अगदी छान आहे उपक्रम ..नक्कीच
अगदी छान आहे उपक्रम ..नक्कीच शिकायला आवडतील पारंपरिक पदार्थ ..
तिला म्हटले तू कॅमेरा समोर ये व तुझा आवाज दे>>खूप छान कल्पना ..
सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
म्हाळसा, तुम्हाला एक घट्ट मिठी.
ह्याच धक्यातून आम्ही सुद्धा सावरतोयच आहे. आईला थोडी आणखी तयार करायची आहे,
बघुया कसं जमतय ते. त्या सर्व लोकांना सॅल्युट जे रोजच्या कामाबरोबरच युट्युब सुद्धा करतात. मला अजून हे गणित जमावायचे आहे. रात्री एडिटींग करा, अपलोड करा, इतर कामं घरची, ऑफ्फीसची...
पण तुम्हा सर्वांच्या सजेशन्ससाठी धन्यवाद परत.
देविका अभिनंदन आणि शुभेच्छा.
देविका अभिनंदन आणि शुभेच्छा.
उकडीच्या मोदकांचा बघितला व्हिडीओ. सही आहे पण अबोल आहे. मला सोबत ऐकायला आवडेल. पारी कसली सुरेख केलीय. मस्त झालेत मोदक.
बाकीचे पण बघेन निवांत.
म्हाळसा बाबांचे ऐकून वाईट वाटलं. मला आता बाबा बरे झाले असतील, असं वाटलं होतं.
म्हाळसा, देविका तुम्हा दोघींना घट्ट मिठी. दोघींच्या आई लवकर सावरू देत.
छान उपक्रम देविका. शुभेच्छा.
छान उपक्रम देविका. शुभेच्छा.
म्हाळसा व तुम्हाला एक घट्ट मिठी, तुम्ही खूप गोड मुली आहात.
धन्यवाद अस्मिता आणि अंजू.
धन्यवाद अस्मिता आणि अंजू.
प्रयत्न चालू आहे आवाज देण्याचा. मी अजून शिकतेच आहे युट्युब विडिओ कसे करायचे.. तेव्हा करेनच लवकर.
छान उपक्रम देविका. शुभेच्छा.
छान उपक्रम देविका. शुभेच्छा.
म्हाळसा व तुम्हाला एक घट्ट मिठी, तुम्ही खूप गोड मुली आहात.>>>> हो गं अगदी असंच माझ्या मनात आलं.