शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला शोधसूत्रात द सापडतच नव्हता. पूर्ण शब्द कधीच कळला होता. पण द दिसेना. शेवटी सदऱ्यात सापडला.

तज्ञ बरोबरच,
अगडबंबिष्ट
कमानेवरतून --- हे दोन पण. हे शब्द मूळ असे नाहीयेत. मग बिष्ट, नेवरतून मधून काही उचलावे लागणार का असे वाटत राहिले.
@ अस्मिता --- Happy कोडे घुमवायचा प्रकार सोदाहरण. तुमचे वराहमिहीर-परिच्छेद कोडे घाला वेळ मिळाला की....

अक्षरसांगड खेळ

खाली दिलेल्या अक्षरांपासून( किमान तीन अक्षरी) असे २० मराठी शब्द बनवा. त्यापैकी निदान ४ चार अक्षरी आणि १ पाच किंवा अधिक अक्षरी असावेत. एका शब्दासाठी एक अक्षर एकदाच वापरावे.

खेळ सादर केल्यापासून 4 तासांनी उत्तर (शब्दयादी) जाहीर करूया. एकेक शब्द प्रतिसादात लिहू नका.

र मा भा
धा स का
क वी न

वी दीर्घच .
उत्तर अजून २ तासांनी लिहा

कसर, धारक, मारक, कारक, मारका,समान, मानस, सकाम, भाकर, नभास, कानस, नकार, कमान, सरक, नरक, कामास
भासमान,समाधान, मानभावी, मानधारक, समाधानकारक, समानभावी, नरभावी

हीरा छान
मी १ तासाने फक्त वेगळे लिहीन

माझे वेगळे:

भारमान
मानवी मानक भासवी काकवी काकर

कारवी

कारवी सुचलं होतं पण ते झाडाच्या एका स्पीशीज चं नाव आहे. म्हणजे विशेषनाम म्हणून नाही घेतलं. बाकी काकवी,मानवी, भासवी,मानक मस्तच.

कारवी>>> कसले झाड ?
सांगता का ?
तसेही ते इथले विशेषनाम आहेच !

https://en.m.wikipedia.org/wiki/Strobilanthes_callosa
ही विकीची लिंक. कास पठार, सह्याद्रीचा बहुतेक सगळा भाग इथे हे झुडूप विपुलतेने दिसते. ही आठ वर्षांनी फुलते. सगळी झाडे एकाच वेळी फुलतात. निळसर जांभळ्या फुलांचा बहर फारच सुंदर दिसतो.
आणखीही एक जात आहे. ती बुटकी आणि पसरट टोपली सारखी वाढते. तिला टोपली कारवीच म्हणतात. ह्या दोन्ही प्रजाती ही सह्याद्रीची भूषणे आहेत.

आजचे कोडे चुकले.... आले तेव्हा उत्तराची वेळ होऊन गेली होती..
हीरांचे उत्तर स्क्रोलमध्ये वाचले गेले चुकून.

१० अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही उपशब्दांची शोधसूत्रे अशी :
१-९-१० थोरपणा
२ ८ नाकातून शिरणारे नैसर्गिक

३ ४ फलद्रूपता
४ ५ बोटांना अंगठा लावून बघा

८ ६ त्याचीच पण लग्नाची नव्हे
७ (पक्के) जोडाक्षर

संपूर्ण : अध्यात्माशी संबंधित .

28 नस्य, श्वास, वायू ?
45 मुद्रा
सर्व नाही
वायू अर्थाने बरोबर, पर्यायी शोध
४५ तसे करून हाताकडे नीट पहा !

४५
सर्व ५ बोटे खेटून घ्यायची कृती करताना काय होईल ?

Pages