गुरु-शनि महायुती (द ग्रेट कंजंक्शन)

Submitted by सांज on 22 December, 2020 - 07:41

गुरु आणि शनि, एक भाग्याचा कारक तर दूसरा कर्माचा!
दोघेही गॅस जायण्ट्स. एकमेकांपासून 456 मिलियन माइल्स दूर असलेले. पण, खगोलीय आविष्कारांमुळे पृथ्वीवरून एकमेकांना बिलगल्यासारखे ते काल दिसले. तो देखावा अपूर्व होता.
शनि देवाची मंदिरं आपण पहातो. गुरुची तर एक सुंदर संकल्पना आपल्याकडे आहेच.
पण, काल अवकाशात या दोघांचा मिलाफ पाहताना कधी कुठल्या मंदिरात दाटले नसतील असे लीन भाव मनात दाटले. विश्वाच्या अथांगतेची आणि आपल्या सूक्ष्म अस्तित्वाची पुन्हा जाणीव झाली.
मी फार धार्मिक नाही. पण डोळे मिटले गेले. हात जोडले गेले.
आकाशीच्या मंदिरातली पहाटची केशरात नाहलेली काकड-आरती जशी सुरेख भासते तसाच कालरात्रीचा हा गुरु-शनि भेटीत रंगलेला अभंग जागरही डोळे दीपवणारा होता.

*छायाचित्रे मोबाईल कॅमेर्यातून टिपलेली आहेत.

सांज
me fb.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे तुम्ही.
बाकी खगोलीय घटना ह्या घडतंच असतात.
काही आपल्याला माहीत आहेत काही बिलकुल माहीत नाहीत.
ह्या अथांग विश्वात खूप घटना प्रतेक मिनिटं ला घडत असतात.

फोटो मस्त आहे, लिखाणही छान
त्या फोटोत यश चोप्रांच्या बंगल्यावर गुरू शनि दिसत आहेत का? कुठले नक्की?

आकाशीच्या मंदिरातली पहाटची केशरात नाहलेली काकड-आरती जशी सुरेख भासते तसाच कालरात्रीचा हा गुरु-शनि भेटीत रंगलेला अभंग जागरही डोळे दीपवणारा होता. >>

माबुदो (माझ्या बुद्धीचा दोष) असेल पण ह्या वाक्यातली शब्दरचना तपासून पाहणार का? खरंतर पुर्ण वाक्यच

@ऋन्मेष

ठळकपणे चमकणारे, दाखवलेल्या बाणाच्या अगदी वर Happy

@ srd
स्टँड वापरला नाही.
iphone 11 pro

@हर्पेन

माझ्या दृष्टीने वाक्य बरोबर आहे. मला हवा तो अर्थ त्यातून उद्धृत होतोय असंही वाटतं.
तुमच्या दृष्टीस काही न्यून आले असल्यास सांगा. मला पटलं तर मी नक्की सुधारेन