कोविड 2.0

Submitted by सर_जाॅन on 22 December, 2020 - 01:09

करोनातून आता कुठे सर्व सुरळित होत असतांना बातमी आली की इंग्लंड मध्ये करोना रूप बदलत आहे व तो पहिल्या पेक्षा जास्त धोकादायक होत आहे अस जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे त्यामुळे तेथे पुन्हा कडक लाॅकडाऊन लावण्यात आला आहे तर भारत सरकारने तिकडून येणार्या सर्व फ्लाइट सुध्दा बंद केली आहेत ....तर खरंच हे असे आहे का?? कारण हळूहळू करोना ची भिती भारतीयांची कमी होत होती ती पुन्हा घर करावी व जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी यासाठी लस बनवणार्या फार्मा कंपन्यांची ही चाल तर नाही? ? जर हे खरंच असेल तर आपण भारतीयांना याचा किती धोका आहे? तज्ञांनी आपली मते येथे मांडावीत...

Group content visibility: 
Use group defaults

नवीन स्ट्रेन आहे खरा कारण इंग्लंडसारखे देश पुन्हा कडक लॉकडाऊन करायला खुळे नाहीत.
कोरोना अनेक वर्ष त्रास देत राहील व जनजीवन पुन्हा पुर्वीसारखे व्हायला २०२५ येईल असे म्हणतात.
मला तर असे वाटते की जी व्हायरस फॅमिली माणसाला इन्फेक्ट करु शकते त्या सर्व व्हायरसवर व बदलत्या रचनेवर व्हॅक्सीन काढून ठेवायला हवे नियमीत.सार्स २००३ च्यावेळी योग्य व्हॅक्सीन काढले असते तर त्याचा बर्यापैकी फायदा झाला असता.

विषाणूच्या इंग्लंड मधील नव्या प्रजातीचे नाव VUI-202012/01 असे आहे. त्यात १७ जनुकीय बदल झाले असून त्याच्या टोकदार प्रथिनावरही परिणाम झालाय.

त्यामुळे तो अधिक संसर्गजन्य झालाय का, यावर अधिक अभ्यास चालू आहे .

दुबईने यु के हून येणार्‍या फ्लाइट्स बंद केलेल्या नाहीत.
भारताने दुबईहून येणार्‍या फ्लाइ ट्स बंद केलेल्या नाहीत.
मार्चमध्ये महाराष्ट्रात प्रथम दुबईहूनच रुग्ण , संक्रमित लोक आले होते

Covid नी समस्त मानवजाती ला वेळ लवकर.
पूर्ण बुध्दी,तंत्र,विद्या वापरून सुद्धा ह्या पट्ट्याचे रूप काही माहीत पडत नाही.
आणि त्याला अटकाव करणे मुश्किल होत चालले आहे.

यु के हून दिल्लीला आलेल्यां आणि पॉझिटिव्ह निघालेल्यांतले दोघे गायब झाले. एक लुधियानाला पोचला. तर दुसरी ट्रेनने विशाखापट्टणमला पोचली.