Chronic Constipation वर काही उपाय आहे का?

Submitted by स्वप्ना_राज on 21 December, 2020 - 06:39

नातेवाईंकांमधल्या एका जवळच्या व्यक्तीला Chronic Constipation चा त्रास आहे. तरुण वयात डॉक्टरी सल्ल्याशिवाय laxatives घेत राहिल्यामुळे शरीरावर त्याचा काही परिणाम होईनासा झालेला आहे. Dulcolax , Gerbisa Suppositories, कायम चूर्ण, इसबगोल कशाचाही उपयोग होत नाही.

मग मधून मधून एनेमा घ्यायला हॉस्पिटलमध्ये जाऊ लागले. मागल्या वर्षी तर एनेमाचाही उपयोग न झाल्याने ऑपरेशन करून पोट साफ करावं लागलं. आता घरीच ३-४ दिवसातून एकदा एनेमा घेतात. पण काही वर्षांनी त्याचाही उपयोग होईल असं दिसत नाही. वय ७५ वर्ष. खाणं कमी करायची तयारी नाही. उलट खायची वखवख जास्त आहे. तरी बिस्किटस, पाव वगैरे सगळं बंद केलंय. घरचे अगदी कंटाळलेत.

ह्यावर दुसरा काही उपाय आहे का? आयुर्वेदिक वगैरे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे.. अवघड आहे एकंदरीत. Uhoh आमच्या सोसायटीत पण एका फॅमिली मधील आजी-आजोबा दोघांना हाच त्रास होता. त्यांच्या मुलाने शेवटी सक्शन पंप वापरुन पोटं साफ केलीत... Uhoh

आयुर्वेदीक उपाय असेल तर माहित नाही... पण ३-४ दिवस दिवसातुन एक तरी मोठ्ठा कृष्ण आवळा कच्चा चावुन खाल्ला (बिपी नसेल तर मीठ लाऊन खाल्ल्ला) तर फरक पडेल बहुतेक..!

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभार. केया, तुम्हाला विपू केली आहे. Srd, रोजचं भाजी, आमटी ज्या माणसाला पचत नाही त्याला दूध कितपत पचेल ही शंका आहे.
DJ.., BLACKCAT तुमचे उपाय सुचवून पहाते.

रोजचं भाजी, आमटी ज्या माणसाला पचत नाही त्याला दूध कितपत पचेल
आणि
खाणं कमी करायची तयारी नाही. उलट खायची वखवख जास्त आहे. >>>>

हे परस्परविरोधी वाटलं. नेमकं काय होतय? Constipation की अपचन?
की आलटून पालटून पोटाचा काहीनाकाही त्रास आहे / असतो?

Constipation मुळे पोट साफ होत नसेल तर निसर्ग जिभेला कुलूप घालतो. भूक मंदावते, जिभेला चव नसते, जीभ पांढरी होते जे कोटिंग दात घासताना ब्रशने जात नाही. जसे आपले नॉर्मल रोजचे जाते.
अशावेळी केवळ सरावाने, रोजच्या ४ वेळांना भूक लागलेली नसताना ठोसून खाल्ले तर अपचन, उमासे, पोट जड हे जाणवते. असे काही होतेय का?

अजूनही काही सेल्फ मेडिकेशन प्रकार सुरू आहे का? त्या औषधांचा साईड इफेक्ट Constipation आहे का बघा. आयर्न सप्लिमेंट्स मुळे Constipation होते.

खाणे कमी करून Constipation जाणार नाही तर वाढेल कारण कमी अन्न पोटात गेल्याने येतोय तोही बॉवेल प्रेशर येणार नाही. खाणे ठीक असेल तर पाणी कमी जातेय का बघा? सारखे बाथरूमला जायला लागू नये म्हणून हा शॉर्टकट असतो ७०+ सि.सि लोकांचा.
पाणी आणि आहारतला चघळचोथा वाढवावा लागेल.

इतर काही शुगर, बीपी, कोलेस्टेरॉल याची पथ्ये / त्रास नसतील तर आहारात साजूक तूप वाढवता येईल. भातावर, चपातीला, सुपाच्या फोडणीला. सकाळी पहिल्या भुकेला वाटीभर भात-तूप-मेतकूट. मग वेळाने नाश्ता.
त्यांच्या चपातीच्या पिठात मोहन म्हणून तूप किंवा एरंडेलही चालेल. चव जाणवत नाही. पोळ्या चांगल्या लागतात.
चपातीपेक्षा ज्वारी / बाजरी / नाचणी भाकरी किंवा मिक्स धान्याची चपाती.
सुखाने खाणार नसतील / दाताचे प्रॉब्लेम असतील तर याच पिठांची उकड, तिखट-मिठाच्या पुर्‍या, घारगे, थालीपिठे, परोठे, फोडणीच्या पोळीसारखा भाकरीचा तिखट चुरा, भाकरीचा दहीकाला वगैरे.

कोमट, प्यायला सोसेल इतके गरम पाणी पूर्ण दिवसभर जेव्हा पितात तेव्हा. पाणी पीत नसतील तर पेय पदार्थांचे प्रमाण वाढवा.
सूप, पातळ वरण, रसम, कडधान्याचे कढण. सद्ध्या थंडी आहे, पितील. आणि पोट भरेल, पौष्टिक घटक मिळतील पण पोट जड होणार नाही.
वरणाची कुठलीही डाळ जास्त पाणी घालून शिजवायची. त्यातले बरेचसे पाणी + चमचाभर घोटलेली डाळ, हिंग, हळद, साखर, मीठ, तूप घालून उकळायचे व सुपासारखे प्यायचे. (चव आवडत असल्यास जिरेपूड घालायची.)
रसम रेसिपी माबोवर आहे.
कढणासाठी -- कडधान्य शिजवल्यावर वरचे पाणी + लाल तिखट + गरम मसाला /मिरपूड + मीठ उकळून वरून तूप / फोडणी घालून.
सुपाच्या भाज्या शिजल्यावर मिक्सरला लावून तसेच सूप करायचे. गाळायचे नाही.
तेच ज्यूसचे. गाळायचे नाही. शक्यतो पूर्ण फळ खाणे, त्यातही सालासकट खाणे उत्तम. पपई, केळे, सफरचंद, पेरू ही फळे सारक असतात (मळ पुढे ढकलणारी). सुक्यामेव्यात अंजीर आणि काळ्या मनुका. गरम दुधात / पाण्यात भिजवून मऊ करून देता येतील.
सद्ध्या तोंडाला चव नाही तर थोडे किसमिस, एकावेळी १०-१२, चावून तो गर थोडा वेळ गालात, तोंडात घोळवायचा. मग गिळायचा. असे दिवसातून २-३ दा.
आलेपाक अधूनमधून; आले कीस-लिंबू रस-सैधव मिश्रण चमचाभर -- खाण्याआधी अर्धातास.

बाकी नेहमीचे -- पालेभाज्या, कोशिंबीरी, मोड आलेली कडधान्ये उसळी वगैरे.
पोटाला चिकटा धरायची प्रवृत्ती असेल तर बेसनही कमी करावे लागेल. जेवणात + वरखाण्यात, लाडू, शेव वगैरे.

पुन्हा, शुगर, बीपी, कोलेस्टेरॉल, पित्त याची पथ्ये / त्रास नसतील तर --- खाण्यात भाजलेले तीळ, शेंगदाणे, सुके खोबरे वाढवता येतील. या तेलबिया सारक असतात.
तीळ / अळशी / कारळे / जवस याच्या (लसूण, खोबरे, सुकी मिरची, चिंच, मीठ) घालून सुक्या चटण्या.
सुपारी --- बडीशेप + धनाडाळ + (तीळ, अळशी, कारळे, जवस) यापैकी एक तेलबी + ओवा, जिरे, लवंग यापैकी एक स्वादासाठी. आलटून पालटून घालायचे. प्रत्येक गोष्ट वेगळी भाजून चव आवडेल त्या प्रमाणात मिक्स करायचे. उन्हात सुकवून तुपात परतून/तळून हिरडाही घालता येईल यात पूड करून. थोडी करून बघा. त्याना काय सोसते, काय आवडीने खातात त्याप्रमाणे मग ठरवता येईल.

बघा यापैकी काय जमते, त्यांना खायला आवडते, तब्येतीला मानवते.
शरीर किती लवचिक आहे, मान/कणा/कंबर याचे त्रास लक्षात घेऊन योगासने ज्यात पोटावर दाब पडतो. किमान फिरण्याचा तरी व्यायाम. + जेवल्यावर शतपावली. खाल्यावर लगेच बसायचे किंवा झोपायचे नाही.

नेहमी प्रमाणे छान उपाय, प्रतिसाद कारवी.
वाचता-वाचताच तुमची आठवण आली आणि शेवटी तुमचाच प्रतिसाद असल्याचे दिसले Happy

नेहमी प्रमाणे छान उपाय, प्रतिसाद कारवी.
वाचता-वाचताच तुमची आठवण आली आणि शेवटी तुमचाच प्रतिसाद असल्याचे दिसले ->++११११११

थोडक्यात त्यांचं खाणं खाल्ल्यावर समाधान होत नाही.
कांंद्याची दह्यातील कोशिंबीर खावी.

माझ्या वडिलांनीही रेचके खाऊन पोट बिघडवून घेतले आहे.
ते अगदी दोनतीन महिने आधीपर्यंत दर तीनचार दिवसांनी कायम टॅब्लेट्स घ्यायचे. पण त्याने त्रास व्हायचा. थकवा + वारंवार जावे लागणे. शिवाय रात्री गरम पाण्यासोबत घेतल्याने वारंवार लघवीला जावे लागणे.

कारवी यांनी लिहिलंय त्यातलं अळशी + ओवा+ बडिशेप भाजून त्यांची पूड गरम पाण्यातून दिल्याने एकदा एकाच जाण्यात पोट रिकामे झाले होते.पण तो उपाय पुढल्या वेळी चालला नाही.

सध्या मी Evict- lactulose solution एक कॅप भरून दिवसाआड देतोय. त्याचा उपयोग होतोय. सोबत पुरेसे पाणी.

केळ्याबद्दल मी वाचलंय की पूर्ण पिकलेलं , काळं पडलेलं केळं बद्धकोष्ठासाठी तर तितकं न पिकलेलं अतिसारासाठी चांगलं.

जेवल्यानंतर चालण्यानेही फरक पडतो.

Dulcolax , Gerbisa Suppositories, कायम चूर्ण, इसबगोल कशाचाही उपयोग होत नाही. >>
यांचाही उपयोग होत नाहीय म्हणजे कठीण आहे. शिवाय रुग्णालयात जाऊन एनिमा घेतात, ऑपरेशन करून पोट साफ करावे लागले म्हणजे पेशंट डॉक्टरांशी बोलले असतीलच आणि फायबर रीच आहार घेणे आणि आहारात मैद्या सारखे पदार्थ टाळणे वयोमानानुसार जमेल तेवढा व्यायाम, शरीराची हालचाल करणे वगैरे सल्ले मिळाले असतीलच आणि ते हे करत असतीलच, एवढे करूनही ही समस्या आहे आणि म्हणुन हा धागा काढलाय असे गृहीत धरतो.

आमच्याकडेही एक पेशन्ट आहे ज्याला काही औषधांमुळे क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आहे. गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्टने सर्व तपासण्या कॉलॉनोस्कोपी सकट करून झाल्या, विविध औषधं करून झाली, आयुर्वेदिक, होमिओपॅथी वैद्यांच्या वाऱ्या आणि इलाज झाले, योग - व्यायाम झाले पण फरक पडला नाही.

सध्या पेशंट कायम चूर्ण गोळ्या रुपात (चूर्ण रुपात नॉशीया येतो खूप) 2 गोळ्या रात्री आणि Lubowel 24 mCg एक सकाळ आणि एक रात्री घेतो, याने थोडे फार पोट साफ होते.
कृपया या गोळ्या केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात.

तुमच्या पेशन्टची केस याहून क्रॉनिक आणि तीव्र दिसते, तरी एकदा त्यांच्या डॉक्टरांना विचारून घेऊन या औषधांनी थोडाफार रिलीफ मिळतो का हे पहाता येईल की कसे हे बघावे. कदाचित त्यांचे हे आधीच ट्राय करून झालेलेही असेल.

एका सिमीलर पेशंटचा अनुभव म्हणुन सांगितले.

बाकी ब्लॅककॅट यांनी पुढचा सल्ला दिला आहेच.

@ भरत
ही औषधे मळ सॉफ्ट ठेवणे आणि तो बाहेर ढकलला जाण्याच्या प्रोसेसला गती देणे यावर काम करतात. पण त्याची शरीराला सवय होऊन नंतर गुण कमी होतो. म्हणून खाण्यातच असे पदार्थ ठेवावे जे हे दोन्ही करतात, हे वयाच्या दृष्टीने बरे.
आणि गॅस बाहेर काढणारे ओवा हिंग जिरे सैधव वगैरे. ताकातून, कोशिंबीरीत किंवा असेच भाजून चिमूट-चिमूट मधेमधे खात रहायचे. हिगाष्टक चूर्णही मिळते पण ते खूप खारट असते. बीपीला कितपत चालेल माहिती नाही. म्हणून डॉ सल्ल्याने घ्यावे असे म्हणेन.
कच्चा कांदा (पांढरा, नेहमीचा), मुळा, नवलकोल, शेपू, शेवग्याचा पाला यासारख्या तुरट उग्र (पंजंट) चवीच्या भाज्या हमखास गुण देतात. कच्च्या / शिजवून जमतील तसे खावे.

पूर्ण पिकलेलं , काळं पडलेलं केळं बद्धकोष्ठासाठी ---
असेच काही नाही. नॉर्मल पिकलेले चालते. पिकून योग्य मऊ असलेले (लिबलिबीत नव्हे) फारतर सालावर हलके हलके काळे स्पॉट्स येऊ लागलेले. इतपतच खायचे. ते गोडही मस्त असते. बाकी केळ्यकेळ्यावर अवलम्बून.

साधे केळे पूर्ण साल काळी झाली तर ते अतिमऊ होऊन फंगल इन्फेक्ट झालेले पण बुरशी नजरेला दिसत नाही असे असू शकते. आजोबांना खाताना चवीवरून कळले नाही तर पोट बिघडू शकते. असे केळे मग शिर्‍यात मालपुव्यात गोड पॅनकेक असे शिजवून खायचे.
लहान नाजूक वेलची केळे साल काळी झाली तरी १-२ दिवस आतून चांगले असते, ते खाऊन चालेल. त्याची साल नाजूक असल्याने हवेच्या उष्णतेनेही / गरम झोतानेही काळी पडते.
यात एक मोठी वेलची / वसई वेलची येते. त्यात थोड्या बिया दिसतात नजरेला. चवीला, भावाला वेलचीप्रमाणेच. तेही बाहेरून काळ्या सालीचे झाले तरी आतून पिकलेले + घट्ट रहाते.
राजेळी / मद्रासी मोठ्ठे केळे मात्र साल काळी झाल्यावरच पूर्ण पिकून खाणेबल होते अन्यथा कच्चे लागते. ते काळ्या सालीचेच खायचे.
रस्तायली / रसाली म्हणून अजून एक जात मिळते गुजराती बहुल भागात. चवीला, भावाला वेलचीपेक्षा वरचढ. तेही बाहेरून काळ्या सालीचे झाले तरी १-२ दिवस आतून चांगले + घट्ट रहाते.

केळे बद्धकोष्ठ झाल्यावरच नव्हे. रोजच्या खाण्यात ठेवायचे. सर्दी होईल असे वाटले तर भरल्या पोटी खायचे किंवा दुपारच्या जेवणाचा भाग म्हणून. भूक कमी असेल तर केळे खायचे आहे हे लक्षात घेऊन भात कमी वगैरे....
मऊ पेरू बियांसकट खायचा. त्या चावायच्या नाहीत कुडुम्कुडुम, दाताच्या खड्ड्यात अडकतील. तोंडात लाळ मिसळेल इतपत घोळवून गिळून टाकायच्या. तसेच डाळिंब, बियांसकट खायचे.
चरबरीत, सुळसुळीत बॉल बेअरिंग इफेक्ट देणारे पदार्थ खायचे थोडक्यात आणि तेलकटपणा निर्माण करणारे (तळलेले नव्हे, नैसर्गिक तेलगाभा असलेले). दाणेकूट-गुळाचा छोट लाडू, नारळाचे कडक ओले खोबरे वगैरे. बाकी पथ्य लक्षात घेऊन.

पुंबा, अजिंक्यराव पाटील,srd, मानव पृथ्वीकर तुमचे उपाय सुचवून पहाते.

कारवी, detailed प्रतिसाद दिल्याबद्द्ल आभार. ते नवराबायको एकटेच रहातात. मुलांना त्यांचे व्याप आहेत. त्यांच्या पत्नी ७२ आहेत. त्यांच्याच्याने आता हे स्वयंपाकातलं पथ्य होणार नाही. आणि स्पष्टच सांगायचं तर अनेक वर्ष नवर्‍याचा हा त्रास सहन केल्याने, तसंच नवर्‍याची कुठलीही मदत न करता दिवसभर बसून रहायची वृत्ती असल्याने त्याच्यासाठी काही करायची त्यांची इच्छाही नाही. त्यामुळे औषध किंवा तसा काही उपाय असेल तरच हवा आहे.

भरत, तुमच्या वडीलांची केस सिमिलर वाटते आहे. हा उपाय करून बघायला सांगते त्यांना.
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.

कारवी, तुम्ही म्हणता ते सगळं आहेच. मी फक्त बाबांवर केले गेलेले, करीत असलेले उपाय सांगितले.

केळ्याबद्दल मी दोन ठिकाणी वाचलंय. एक एका नॅचरोपथीच्या पुस्तकात आणि काही (आर्थात इंग्रजसाइट्सवर) साइट्सवर. तिथे केळ्याचे एवढे सगळे प्रकार लक्षात घेतले नव्हते. पूर्ण पिकलेले म्हणजे पूर्ण काळे पडलेले नव्हे (ते खाववतच नाही) तर काळे ठिपके पडलेले.
बाबांना फक्त वेलची केळीच देतो, त्यामुळे इतर केळ्यांचा अनुभव नाही.

एरंडेल तेल
प्रमाण आणि किती अंतराने घ्यायचे ते वैद्यांना विचारून ठरवता येईल.
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी थोडा व्यायाम.
संत्री-मोसंबी अशी चोथायुक्त फळे चावून खाणे. दोन्ही प्रकारची द्राक्षे पण सारक आहेत.

नवीन Submitted by स्वप्ना_राज on 22 December, 2020 - 11:08 >>>
७५ वय + वागण्याचा दिलेला पॅटर्न वाचून हे असणार वाटलेच होते.
लिहीलेय त्यात पथ्याचे वेगळे करणे काही नाही. रोजचे जेवणच, करायची पद्धत थोडी बदलायची; काही गोष्टी खाण्यात घ्यायच्य्य/वाढवायच्या ज्या सगळ्या बाहेरून आणायच्यात आणि काही एकदा बनवून ८-१५ दिवस वापरायच्या ज्या दुसरेही कोणी करून आजींना देऊ शकतो. गरम पाणी एकदा करून थर्मॉस बॉटलमध्ये भरून ठेवायचे. ८-१० तास पुरते.
एकत्र कुटुंब किंवा घरात स्वयंपाकाला कोणी येत असेल तर जे जमेल तितके करता येईल असे वाटून ऑप्शन्स लिहीले होते. सॉरी, त्याचा तुम्हाला काही उपयोग नाही झाला.

मॉडर्न मेडिसीन टेस्ट निदानासाठी उपयोगी ठरतील. उपाय मात्र आधीच कुचकामी ठरलेत हे तुम्ही लिहीलेत.

आयुर्वेदिक हवे असेल तर निदान + पंचकर्म करण्यासाठी + पुढचे पथ्य यासाठी पोद्दारला (वरळी) कन्सलटेशन करून मग अ‍ॅडमिट वगैरे करता येईल. तिथे मार्गदर्शन व देखरेखीसह जाणकारांचा सल्ला मिळेल. मला आयुर्वेदिक माहिती आहेत पण त्याचे परिणाम, कॉन्ट्राइंडिकेशन, डोस बदलणे यासाठीही निरीक्षण + तारतम्य + जबाबदारी घेऊन करणारे कोणी हवे. तसे कोणी उपलब्ध नाही हे तुम्ही लिहीलेत. यामुळे इथे औषधांची नावे लिहीणे योग्य नव्हे. जे घरगुती, सेफ होते ते लिहीले.

कारवी खुप छान घरगुती उपाय आहेत. कधी कधी लहान मुलांना पण बद्ध कोष्ठ होतो. त्यावेळी असे घरगुती उपाय कामाला येतात.

- गंधर्व हरितकी भातात मिक्स करून घेता येईल (ह्यात मीठ असते त्यामुळे वरून घालू नये)
- मनुका रात्री भिजत ठेवून सकाळी खाणे
- सब्जा बी थोडा वेळ भिजत ठेवून सकाळी / संध्याकाळी खाणे व बी भिजवलेले पाणी पिणे
- जेवण नंतर जेम्व्हा तहान लागेल तेंव्हा कोमट पाणी
- उपाशी पोटी सध्या पाण्यात लिंबू रस टाकून ते पिणे

कायम चूर्णात मीठ असते. माझें वडील रोज घ्यायचे. त्यांना अनुवंशिकतेने आलेला मधुमेह होता पण तरीही ते स्वतःच्या मनाने का चु घ्यायचे, तेव्हा लक्षात आले नाही. पुढे हृदयविकार झाला तेव्हा डॉक्टरांना सांगितले व त्यांनी का चू बंद करा म्हणून सांगितले.

त्यामुळे का चु अधून मधून वापरा पण रोज नकोच.

प्रतिसादातून छान घरगुती उपाय आले आहेत. तरुणपणी अशी आयुर्वेदिक रेचके घेऊन पुढे उतारवयात एवढा त्रास होतो माहीत नव्हतं.

स्वप्ना, घरचे कंटाळलेत म्हणून एक लाइट रेमेडी रेको: “पिकु” चित्रपट पहा. मजेमजेत त्यांना डोस मिळेल. (हा उपाय नाही पण राहावलं नाही म्हणून लिहितेय) हवा असेल तर Light 1

आयुर्वेदिक रेचके
तात्पुरता उपाय हा दोन दिवस ठीक. पण सतत करावा लागणे म्हणजे बिघाड शोधला पाहिजे.

प्रतिसादातून छान घरगुती उपाय आले आहेत. तरुणपणी अशी आयुर्वेदिक रेचके घेऊन पुढे उतारवयात एवढा त्रास होतो माहीत नव्हतं.
<<

हे वाचून कपाळबडवती योग आला.

इतका परस्परविरोध एकाच वाक्यात कसे काय लिहू शकतोय आपण?

१. घरगुती उपाय छान आहेत. (का? फुकट आहेत म्हणून?)
२. याच (घरच्याघरी केलेल्या) उपायांनी त्रास झालेला आहे.

रोज, एकदाच. अन तेही सकाळी अमुक वाजताच. - मलनिस्सारण व्हायला हवे अशी एक चुकीची समजूत आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. ते नाही झालं तर 'पोट साफ' करण्याच्या नावाखाली सेल्फ मेडिकेशन्स सुरू होतात.

जोपर्यंत स्पुरियस डायरिया वगैरे नाही, फिकोलिथ्स इ. नाहीत,,काही न्युरॉलॉजिकल प्रॉब्लेम नाही, तोवर जास्त काळजी करायची गरज नाही.

रोज अमुकच वेळा झालीच पाहिजे नाही झाली तर आभाळ कोसळेल असे नसते. तसेच दिवसातून २ दा गेल्यानेही भूकंप होत नाही. प्रत्येकाची सायकल वेगळी असते. ही ऑन डिमाण्ड प्रक्रिया आहे. मुत्रविसर्जनाचा वेळ ठरवून घेतो का आपण? तसेच हेही आहे ही बेसिक फिजिऑलॉजी लक्शात घेतली पाहिजे.

इतका परस्परविरोध एकाच वाक्यात कसे काय लिहू शकतोय >>> घरगुती उपाय म्हणजे मी पिकलेल केळं, मनुका, अंजीर, शेंगदाणे याविषयी म्हणलं .रोज आवर्जून हे प्रत्येकजण खातं अस नाही नं.
आयुर्वेदिक रेचके म्हणजे कायम चूर्ण , सुखसारक वटी असल्या आयुर्वेदिक गोळ्या ,ज्याचा पुढे जाऊन एवढा त्रास होतो हे माहीत नव्हतं.
जनरली आयुर्वेदिक म्हणजे नो साईड इफेक्ट्स हेच डोक्यात येतं.

काही काम न करता सतत बसून राहाणे हा आळस नसून मानसिक कमकुवतपणा असावा. तीव्र बद्धकोष्ठ असलेली अशा प्रकारची माणसे बघितली आहेत. किंवा अशाप्रकारच्या लोकांना तीव्र बद्धकोष्ठतेचा विकार असलेला बघितला आहे.

विशेषत: नैराश्य, न्यूनगंड, हतार्थता (frustation) अशा भावना प्रबळ झाल्या तर मलावरोध होऊ शकतो.
अर्थात हे मलावरोध आणि बद्धकोष्ठतेच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे.

स्वउपचार हे मर्यादेपलिकडे जातात. मग ते कुणी सागितलेल्या आधुनिक गोळ्या किंवा आयुर्वेदिक चूर्ण, काढे असोत. अगदी स्वनिदानसुद्धा चुकते.

>>एकत्र कुटुंब किंवा घरात स्वयंपाकाला कोणी येत असेल तर जे जमेल तितके करता येईल असे वाटून ऑप्शन्स लिहीले होते. सॉरी, त्याचा तुम्हाला काही उपयोग नाही झाला.

अहो तुम्ही सॉरी कशाला म्हणताय? चूक माझी आहे. मी स्पष्ट लिहायला हवं होतं. तुमच्या डिटेल्ड प्रतिसादाबद्द्ल पुन्हा एकदा आभार.

>>काही काम न करता सतत बसून राहाणे हा आळस नसून मानसिक कमकुवतपणा असावा

हे बाकी त्यांच्याबद्द्ल अगदी खरं आहे १००%. मी सगळी माहिती त्यांच्या घरच्यांना पोचवली आहे. सर्वांनी प्रतिसाद दिल्याबद्द्ल मनापासून आभार. मध्ये इथे येता आलं नाही म्हणून प्रतिसाद द्यायला उशीर झाला.

सोपा उपाय : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 3 ते 4 मोठी भांडी (सुमारे पाउण ते 1 लिटर ) पाणी प्यावे व जमतील तेवढ्या ढेकरा काढाव्या. पोटातील गॅस जसा बाहेर पडेल तसे पाणी पुढे सरकते व विनासायास 5 मिनिटात पोट साफ होते. अनुभवाचे बोल आहेत.