पाटील v/s पाटील - भाग २३

Submitted by अज्ञातवासी on 12 December, 2020 - 11:00

भाग २२ - https://www.maayboli.com/node/74764

नवीन भाग प्रत्येक बुधवारी रात्री नऊ वाजता!

अण्णा धावतच होते, तेवढ्यात त्यांना पोलिसांचा ताफा आडवा आला.
"अरे बाबांनो, जाऊ द्या मला." अण्णा असहायपणे म्हणाले.
"अण्णा, नोकरीचा प्रश्न आहे. स्वतः वसंतराव पाटील वर बोललेत."
एका स्ट्रेचरवर मोहनला आणलं गेलं. त्याची अवस्था बघून अण्णांच्या डोळ्यात पाणी तरळलं.
कृष्णराव मान खाली घालून निमूटपणे प्लेनकडे निघाले. मागेच वसंतराव होते.
"व्यास. आम्ही निघतोय. आणि हे तमाशे बंद करा आता. कामावर लक्ष द्या. ओके?"
व्यासचा आवाज दाटून आला होता...
"येस सर..."
प्लेनचे दरवाजे बंद झाले. थोड्याच वेळात प्लेन आकाशाच्या दिशेने झेपावल.
अण्णा मटकन खाली बसले.
'संपलं सगळं. इतक्या जवळ येऊन सगळं गेलं...'
अण्णांचे अश्रू थांबत नव्हते.
"अण्णा, उठा, घरी चला." जाधव अण्णांना धीर देत म्हणाले.
"कोणतं घर जाधव, कोणतं घर?" अण्णांनी विचारलं. "सर्वस्व गमावलं आपण. जे घर आहे ना, ते कुणाच्या पुण्याईचं आहे ते बघा. अहो, देव जितका पाठीशी उभा राहणार नाही ना, तितक्यादा हा मोहन माझ्या पाठीशी होता."
"जाऊदेत अण्णा, चला तुम्ही."
जाधवनी अण्णांना धीर दिला, व गाडीत बसवलं.
◆◆◆◆◆
अण्णा बंगल्यावर आपल्या खोलीत बसले होते.
"अहो दोन घास तर खाऊन घ्या." वत्सलाबाई आत येत म्हणाल्या.
"भूक नाहीये वत्सला."
"अहो, असं कसं चालेल?"
"सोनीला बोलवशील? बोलायचंय तिच्याशी."
"बोलावते."
थोड्या वेळाने सोनी आत आली.
"सोनी..." अण्णांचा कंठ दाटून आला.
"काय झालं अण्णा," सोनी बावरलीच.
"वत्सला, सोनी. हे सगळं सोडून आपण तिघे दूर निघून जाऊयात. खरंच."
"अहो काय बोलताय."
"पाटील स्टील. त्याच्या अर्धा टक्कादेखील संपत्ती आपल्याकडे नाही. तरी इतका माज आपण दाखवतो?
ते तिघे भाऊ, भारत सोडला. साता समुद्रापलीकडे गेले, तरीही एकमेकांमध्ये इतका जीव? आणि माझा भाऊ माझाच जीव घ्यायला निघाला?
कृष्णा, एवढा मोठा माणूस, ड्रायवर म्हणून राहिला. मोहन पाटील... जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसांपैकी एक, ड्रायवर बनून राहिला. कधीही माज दिसला नाही. उलट किती आनंदाने सगळं केलं. देवसुद्धा इतकं करत नाही. नाही करत. कुणी कुणासाठी स्वतःच्या जीवाशी खेळत नाही.
या आभाळाएवढ्या माणसांसमोर आज किड्यासारख वाटतंय हे जगणं."
"अण्णा, नका असं बोलू ना." सोनीचाही कंठ दाटून आला.
"जाऊ दे. आता सगळं विसरूयात. चला, आजपासून जगायचं तर पाटलांसारखं. चला, जेवण करूयात." अण्णा उठले आणि खाली निघाले.
सोनी आणि वत्सलाबाईही त्यांच्यामागे निघाल्या.
जेवणाच्या टेबलवर आनंदीबाई, सोनी, मिने आणि अंबा बसली होती.
"वत्सला, तुही बस."
"अहो मी नंतर."
"बस बस. सगळे समोर असले तर बरं वाटतं."
वत्सलाबाई बसल्या.
"आनंदी..."
आनंदीबाई तंद्रीतून बाहेर आल्या.
"जेवण करून घे."
"त्यानेही लग्न केलं नाही अण्णा... कळलं का तुला?"
"आत्या?" सोनीने आनंदीबाईंकडे चमकून बघितले.
"काही नाही." आनंदीबाईंनी अश्रू आवरले, आणि ताटात भाजी घ्यायला सुरुवात केली.
"सगळी गणिते चुकलीत आनंदी. माफ कर आम्हाला."
"तुझी काय चूक अण्णा? चूक माझ्या नशिबाची... फक्त पोराला काही व्हायला नको."
"अण्णा," अंबा मध्येच म्हणाली.
"बोल आई."
"निघून गेलेत सगळे?"
"हो."
"पोराची तब्येत सुधारली का रे."
"नाही. जसा होता तसाच नेलाय."
अंबा क्षणभर काहीच बोलली नाही.
"आनंदी, दोन मिनिटं उभं राहशील?" अंबेने आनंदीला विचारलं.
"कशाला?" आनंदीबाईंच्या स्वरात रुक्षपणा आला.
"तुझे पाय धरायचेत?" अंबाचा आवाज आता ओलावला होता...
"अग..."
मात्र अंबा स्वतःला रोखू शकली नाही. ती ढसाढसा रडू लागली.
"आजी..." सोनी तिच्याजवळ आली.
"मी हरली सोनी, मी हरली. आयुष्यात काहीही कमावलं नाही, फक्त माझ्याच पोरांचं वाटोळं केलं, मी हरली.
मला रडू दे."
तिचं रडणं थांबत नव्हतं. सगळे तिला धीर देत होते.
दारात उभी असलेली एक व्यक्ती या सगळ्या गोष्टी निमूटपणे बघत होती.
त्या व्यक्तीला घरात केव्हापासून एन्ट्री हवी होती, पण केव्हा एन्ट्री करावी हेच कळत नव्हतं.
"एक्स्क्यूज मी! मी आत येऊ का? आय मिन आलोच आहे."
अण्णा चक्रावले.
"तुम्ही व्यास ना. या या."
व्यास आत आले.
"बरं. एक अतिशय महत्वाच्या गोष्टीसाठी मी आलोय, जी आताच्या आता व्हायला हवी."
"कोणती गोष्ट?" सोनी म्हणाली.
"अंबाबाईंना. आताच्या आता माझ्यासोबत युक्रेनला निघायला हवं."
"काय?" अंबा ओरडलीच.
"हो. मोहनसरांना दोन मिनिटं शुद्ध आली होती. तेव्हा मी तिथेच होतो. ते म्हणाले कुठल्याही परिस्थितीत अंबेला युक्रेनला न्या, आताच्या आता."
"मोहन शुद्धीवर आला होता." सोनीने अधीरपणे विचारले.
"हो, आणि राधाबाई कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला आहेत. त्यांना अंबाबाईंना भेटायचंय."
"राधा!!!" अंबाच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.
"तयारी करा. पटकन! आताच हेलिकॉप्टर येईन, आणि त्यानंतर मुंबई विमानतळावरून युक्रेन!"
"अहो पण." वत्सलाबाई म्हणाल्या.
"वत्सला. जितके कपडे असतील आईचे तितके पटकन भर. पुढच्या दोन मिनिटात आईची बॅग रेडी पाहिजे."
वत्सलाबाई वर धावल्या.
"व्यास. फक्त आजीलाच बोलावलंय?" सोनीने विचारले.
"हो!" व्यासने मान दुसरीकडे वळवली.
दोन मिनिटात अंबाची बॅग भरून रेडी होती.
"आई... सगळं नीट करून ये... पाया पडतो."
"चला." व्यासने बॅग हातात घेतली.
अंबा व व्यास बंगल्याबाहेर पडले.
...आणि इकडे सगळ्या घराच्या अश्रूंचा बांध फुटला...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Finallyyyy........! Happy Happy
पुन्हा सुरूवातीपासून वाचेन. Happy

( या कथेपासून मी मायबोली वाचायला सुरुवात केली होती! )

मेलेला माणूस परत जिवंत होण्यासारखा चमत्कार आहे हा बाबा !
आता पुढच्या भागासाठी पुढचा डिसेंबर नको उगवायला म्हणजे झाल.
तुमच्या कथा खूप गुंतवून ठेवतात हो. बेफिकीर नंतर तुमच्याच कथा/लिखाण मध्ये तेवढा दम वाटतो. (मायबोलीवरील)
एवढं ताटकळत नका ठेवू आम्हा पामर वाचकांना.

"मेलेला माणूस परत जिवंत होण्यासारखा चमत्कार आहे हा बाबा !
आता पुढच्या भागासाठी पुढचा डिसेंबर नको उगवायला म्हणजे झाल.
तुमच्या कथा खूप गुंतवून ठेवतात हो. बेफिकीर नंतर तुमच्याच कथा/लिखाण मध्ये तेवढा दम वाटतो. (मायबोलीवरील)
एवढं ताटकळत नका ठेवू आम्हा पामर वाचकांना."

-- अगदी हेच म्हणायचं होतं.

"मेलेला माणूस परत जिवंत होण्यासारखा चमत्कार आहे हा बाबा !
आता पुढच्या भागासाठी पुढचा डिसेंबर नको उगवायला म्हणजे झाल.
तुमच्या कथा खूप गुंतवून ठेवतात हो. बेफिकीर नंतर तुमच्याच कथा/लिखाण मध्ये तेवढा दम वाटतो. (मायबोलीवरील)
एवढं ताटकळत नका ठेवू आम्हा पामर वाचकांना.">>>>>>१११११११११

@गार्गी - अनेक धन्यवाद! Happy
It's my honour that you started reading maayboli with my story.
@ मृणाली - धन्यवाद
@ शाहीर - जेव्हा आपण फिक्शनला फिक्शन म्हणून बघतो, तेव्हा काही गोष्टी ग्रँटेड घ्यायच्या असतात. धन्यवाद Happy
@ यामीन - धन्यवाद
@चष्मीश - धन्यवाद
@ मास्टरमाईंड - धन्यवाद
@ मेघा - धन्यवाद
@ उनाडटप्पू - धन्यवाद
@लावण्या - धन्यवाद
@मन्या - धन्यवाद

पुढचा भाग टाकला आहे।