Index Investing भाग ३:- P/E Ratio

Submitted by अतरंगी on 7 December, 2020 - 05:40

“Be Fearful When Others Are Greedy and Greedy When Others Are Fearful” :- Warren Buffett  

कोणत्याही व्यवहारात जर जास्त फायदा मिळवायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खरेदी. मार्केट सुद्धा त्याला अपवाद नाही. जर उत्तम  स्टॉक पण चुकीच्या वेळेस घेतला तर  त्यात खूप वेळ अडकून पडावे लागू शकते किंवा मिळणारे रिटर्न Significantly कमी होऊ शकतात. मार्केट वर जाईल कि खाली हे आपल्या हातात नाही. पण आपल्याला हवा असलेला स्टॉक आपल्याला पाहिजे त्या किमतीला येई पर्यंत शांत बसून राहणे नक्कीच आहे.

आता  प्रश्न असा कि योग्य किंमत काय ? स्टॉकचे   valuation करण्यासाठी अनेक models/ पद्धती आहेत. पण इंडेक्सचे  valuation  करताना  P/E Ratio,  P/B  Ratio   वापरले जातात.   P/E Ratio म्हणजे काय हे साधारणपणे स्टॉक मार्केट मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला माहीत असतेच. अगदी अगदी बेसिक सांगायचे असेल तर कंपनीच्या earning साठी गुंतवणूकदार द्यायला तयार असलेली (शेअरची) किंमत. P/E Ratio जास्त म्हणजे स्टॉक महाग आणि तो कमी म्हणजे स्वस्त.

आपल्याला हे बघायचे आहे कि आपण  P/E Ratio  चा वापर करून आपण स्वस्तात खरेदी करू शकतो का?  आपला फायदा वाढवू शकतो का?

मार्केट कायम वरच जात नाही अधे मध्ये खरेदीच्या अनेक संधी येत राहतात हे तर सर्वानाच माहीत आहे. खाली दिलेला निफ्टीच्या drawdown चा चार्ट पहा.  या मार्च मध्ये ३८% चा drawdown  होता.  
drawdown.JPG

खालच्या टेबल मध्ये nifty ५० चा  जानेवारी १९९९ पासून मागील महिन्यापर्यंतचा प्रत्येक महिन्यातील सरासरी P/E Ratio दिलेला आहे.आज पर्यंतचा सर्वात लो आहे १०.६८ आणि ३६.४६ हाय आहे . २३ मार्च ला निफ्टी ५० चा बंद भाव होता ७५८३.६ आणि त्या दिवशीचा P/E Ratio १७.१५ होता . २४ मार्च ला ७५११ चा लो करून निफ्टीने उसळी मारली. आजमितीला मार्केट निफ्टीच्या इतिहासातील सर्वात उच्चतम पातळीला ट्रेड करत आहे.     

.PE Ratio.JPG

हा P/E Ratio  इंडेक्स च्या बाबतीत का महत्वाचा आहे हे खालचे टेबल बघितले तर लक्षात येईल. P/E Ratio १० ते १२ किंवा १२ ते १५ असताना केलेल्या खरेदी वरचे रिटर्न पहा आणि २१ ते २७ च्या दरम्यान खरेदी वरचे रिटर्न पहा. आपण जर स्टॉक किंवा इंडेक्स फंड महाग खरेदी केला तर त्यावर मिळालेला परवा नगण्य आहे. पण जर तीच गुंतवणूक मार्केट पडलेले असताना केली तर कमी कालावधीत जास्त रिटर्न मिळू शकतो. ज्यांनी मार्च मध्ये  P/E Ratio १८ वगैरे असताना निफ्टी ८५०० ते ८०००च्या पातळीला असताना खरेदी केली  त्यांचा आजचा परतावा ५५ ते ६० % आहे. तो पण ८ ते ९ महिन्यात. 

PE vs returns.JPG

मी या लेखात फक्त P/E Ratio बद्दलच लिहिले आहे. पण  P/E Ratio  हे एकाच परिमाण मार्केट मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू नये. P/E Ratio वर मार्केट जोखताना काही गोष्टी अजून लक्षात ठेवायला हव्या. मार्केट चा birds view ने थोडा विचार करायला हवा. शिवाय खालील मुद्दे पण विचारात घ्यावे लागतील.
 १. जानेवारी  २०२० मध्ये जेव्हा मार्केट १२३०० वर होते तेव्हा P/E Ratio २८ होता. पण यावेळेस नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात जेव्हा ते १२३०० आले तेव्हा P/E Ratio ३३ होता. कारण P/E Ratio  मध्ये जो denominator आहे तो कमी झाला आहे. निफ्टीचा P/E Ratio  काढताना कंपन्यांचे standalone earning मोजले जाते, consolidated नाही. 
२. जर गुंतवणूकदारांना  परताव्याची खात्री असेल तर ते P/E Ratio जास्त असताना म्हणजेच स्टॉक किंवा इंडेक्स महाग असताना पण जोमाने खरेदी करू शकतात. कित्येक FMCG स्टोकस चा P/E Ratio आजन्म जास्त आहे तरी त्यात खरेदी होत राहते.
३. जर निफ्टी मध्ये high P/E Ratio  असलेल्या कंपन्या वाढल्या तर २० वर्षांपूर्वीचा P/E Ratio आणि आजचा P/E Ratio यात बरेच  पडू शकते.
४. गेले काही दिवस/ महिने FII जोमाने खरेदी करत आहेत. जर जागतिक पातळीवर कुठे हि गुंतवणुकीच्या चांगल्या संधी नसतील तर भारतासारख्या १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात त्यांना परतावा मिळायची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्याम्च्याकडून खरेदी वाढलेली असू शकते. 

वरील सर्व गोष्टी लक्षात ठेऊन P/E Ratio चा वापर करायला हवा. मी वैयक्तिकरित्या P/E Ratio पाहतो. वरच्या टेबल मध्ये दाखवल्या नुसार P/E Ratio २४ ते २७ च्या पुढे असताना चुकीच्या वेळेस गुंतवणूक करून भांडवल अडकवून ठेवण्यापेक्षा मी ते बँकमध्ये ठेऊन पुढच्या योग्य संधीची वाट पाहात राहणे पसंत करेन. त्यात अनेकदा गुंतवणुकीच्या संधी हुकायची शक्यता सुद्धा असते.
फायदा नाही झाला  तरी चालेल, तोटा होता कामा नये आणि भांडवल बुडता कामा नये, हे तत्व मी जास्त पाळतो. खरेदी हि  P/E Ratio आणि drawdown यावर आधारित असायला हवी.       

मार्केटचा P/E Ratio वाढला कि त्याला फक्त एका ट्रिगरची आवश्यकता असते. तो ट्रिगर मिळाला की मार्केट आपटते आणि परत दुप्पट जोमाने वर येते. बरोब्बर स्विंग हाय किंवा लो पकडणे कोणालाच शक्य नाही पण मार्केट महाग झाले कि इक्विटी होल्डींग कमी करून तोच पैसा debt instrument मध्ये पार्क करून पुढची खरेदीची संधी येई पर्यंत शांत बसून राहणे हा सुदधा एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही SIP करत असाल तर जेव्हा मार्केट पडेल तेव्हा जास्त युनिट्स ची खरेदी करायला विसरू नका. 

पुढच्या वेळेस जेव्हा मार्केट त्याच्या हाय पासून  २५ ते ३० % पडेल तेव्हा वॉरेन साहेबांचेच खालचे वाक्य लक्षात ठेवा. 

“Opportunities come infrequently. When it rains gold, put out the bucket, not the thimble.”  

References:-
https://stableinvestor.com/
https://www.niftyindices.com

Disclaimer:-

मी सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागार किंवा आर्थिक सल्लागार नाही. माझ्याकडे शेअर मार्केट, आर्थिक गुंतवणुकीसंबंधित काहीही पात्रता नाही. वर लिहिलेली सर्व माहिती एक शेअर मार्केटचा अभ्यास या दृष्टीने केलेली आहेत. वर लिहिलेल्या सर्व कॅल्क्युलेशन मध्ये चूक, human error असू शकतो. वरील लिखाणावर विसंबून कोणीही गुंतवणूक करू नये. केल्यास, लेखक जबाबदार नाहीत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना आपल्या सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहितीपूर्ण लेखमाला >+१
P/E Ratio हा एक महत्वपूर्ण आकडा आहे. जर. NIFTY P/E Ratio ३० च्या वर असेल आणि देशाचे सकल उत्पन्न (GDP) ८% च्या खाली असेल तर मार्केट ला ग्रोथ नाही. आणि जरी झालीच तर नंतर मार्केट पडणार.

P/E Ratio , ग्रोथ आणि व्याजदर , वित्तिय तुट ह्या चार गोष्टी Index Investing साठी महत्वाच्या आहेत.

P/E Ratio , ग्रोथ आणि व्याजदर , वित्तिय तुट ह्या चार गोष्टी Index Investing साठी महत्वाच्या आहेत.>>>>

मला वाटतं की या गोष्टी फक्त Index Investing साठीच नाही तर कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची असेल तरी महत्वाच्या आहेत.

https://www.youtube.com/watch?v=AODnnnOuKc4

विवेक बजाज यांचा हा व्हिडीओ बघण्यासारखा आहे. P/E ratio मधला earning चा बदल आणि त्याचा होणारा परिणाम अतिशय साध्या भाषेत सांगितला आहे.