आई..

Submitted by सांज on 4 December, 2020 - 10:25

नक्षत्रांनी डाव रचला
चांदणे फितूर झाले
अंधारली वाट सारी
काट्यांत पाय रुतले

वेदना ऊरी चमकता
आईस हाक गेली
का तुझीच तेवढी ही
आठवण मनात व्याली

तू उरतेस सर्व व्यापून
स्फुरतेस खूप आतून
जाईन मी जिथे जिथे
असतेस तू ही मनातून

मी कोण तुझ्यापुढे?
वृथा हे सगळे दर्प
तुझ्याच पायांशी गं
प्रसवते माझे ‘मी’पण!

हे तुझे ‘असणे’ आई
राहो सदा चिरंतन
अंधाराला या माझ्या
भेदून जाते तुझे निरंजन..!!

~ सांज

Group content visibility: 
Public - accessible to all site users