कोरोनाकाळात, प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीकडे लोकांचा कल खूप वाढला आहे. आता सणसमारंभ आणि लगिनसराईचे दिवसही लवकरच येतील. त्यातही इतर अनेक गोष्टींपेक्षा कपड्यांची खरेदी तर आजकाल हटकून ऑनलाईनच केली जाते. मला फक्त लेडिजसाठी टाॅप्स, ड्रेस इ. (साडी नाही) कपड्यांचा व्यवसाय करायची ईच्छा आहे. पुण्यात असताना फक्त सोसायटी व जवळपासच्या एरियामधे घरातच लेडिज कपडेविक्रीचा थोडासा अनुभव आहे. पण त्याला काही अगदी व्यवसाय म्हणता येणार नाही. मला मुले लहान असल्याने स्वतंत्र दुकान वगैरे ईतक्यात जमणार नाही. शिवाय लगेच फार भांडवल गुंतवण्याची रिस्कही घ्यायची नाही. त्यात आता ऑनलाईन शाॅपिंगचेच दिवस आहेत. त्यामुळे मी पण ऑनलाईन विक्रीचाच निर्णय घेतला आहे. त्याबद्दल काही माहिती हवी आहे.
1- आनलाईन विक्री करायची असेल तर, कोणत्या साईटवर सुरूवात करावी. (अमेझाॅन, फ्लिपकार्ड, मंत्रा व.) कोणत्या साईटवर लेडिज गारमेंटची विक्री जास्त होऊ शकते.
2- सुरूवातीला किती रक्कम भांडवल म्हणून लागेल(रजिस्ट्रेशन सकट) याबद्दल अंदाज.
3-सुरूवातीला कोणत्या प्रकारचे कपडे विक्रीस ठेवावेत. उदा. वेस्टर्न, इंडोवेस्टर्न, इंडियन(पारंपारिक). कोणत्या प्रकारच्या कपड्यांची विक्री आपल्याकडे जास्त होईल किंवा असते.
4- ठराविक कपड्यांचे प्रकार उदा. टाॅप, ड्रेस, नाईटी इ. साधारण काय रेंजमधे(किंमत) विक्रीस असावेत. (कोणत्या रेंजमधे जास्त विक्री होऊ शकते?).
5- मला स्वतःला यासाठी कोठून खरेदी करणे परवडेल किंवा करावी जेणेकरून क्वालिटी चांगली पण रेटही रिझनेबल असतील.
6- व्यवसायाची सुरूवात कशी करावी( काय प्रोसिजर असते).
माझ्या ओळखीत किंवा माहितीत हा व्यवसाय करणारे कुणीही नाही. मला स्वतःलाही ऑनलाईन शाॅपिंगबाबत फार काही माहित नाही. जर कोणाला याबबत काही माहिती असेल किंवा ओळखीमधे कुणी असा व्यवसाय करणारे असेल तर वरील मुद्दे आणि त्याव्यतिरिक्तही काही माहिती असेल तर कृपया मार्गदर्शन करावे.
ऑनलाईन व्यवसाय (कपडेविक्री) सुरू करण्याबाबत माहिती हवी आहे.
Submitted by Cuty on 3 December, 2020 - 07:57
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिशो वेबसाईट वापरतात यासाठी
मिशो ऍप वापरतात यासाठी बहुतेक. बायकोच्या बहुतेक मैत्रिणी वापरतात. या ऍपमध्ये आपल्याला एक गोष्ट 2000 रुपयांना पडत असेल तर सोमरच्याला चारशे पाचशे रुपये वाढवून विकू शकता. तुम्ही 2000 ला घेतलाय हे त्याला समजणार नाही. एक तर 1000 ची साडी 5000 ला विकते.
तुम्हाला शुभेच्छा !!
तुम्हाला शुभेच्छा !!
क्युटी, मी व्यापारी नाही,
क्युटी, मी व्यापारी नाही, गिर्हाईक आहे. त्यानुसार सांगते . ( माझ्या मैत्रिणीने घरुन हा व्यवसाय केला होता, पण मेहेनत आणी नशीब दोघे पण कमी पडले )
१) मी, अॅमेझॉन वरुन घेते . कारण कपडे फिट नाही बसले तरी परत करता येतात. ( इनर्स सोडुन )
२) अॅमेझॉन वर त्या मानाने बरी क्वालिटी मिळते.
३ ) बायकांच्या चॉईस नुसार निदान ४०० ते १००० च्या आसपास असलेले रेडीमेडस डेली युज साठी बरे. त्यात कुर्तीज, लेगिन्स, टॉप्स वगैरे ठीक.
४ ) पारंपारीक व इंडो वेस्टर्न दोन्ही ठेऊ शकतेस. कारण यंग जनरेशन ( वय १५ ते २५ ) हे प्रिफर करतात. व बायका ( २० ते ४० वयोगटातील ) कुर्ता + प्लाझो + लेगिन्स जास्त वापरतात. पुण्यात तरी याचा खप खूप आहे.
५ ) कपडे सिझन नुसार ठेव. कारण आता २ महिन्यातच उन्हाळा सुरु झाला की कॉटन आणी चिकन चे कुर्ते भरपूर विकले जातात. उन्हाळ्याकरता माफक दरातले चिकन कुर्ते घेऊ शकतेक विकायला. ड्रेस पिस पण ठेव. त्यात बांधणी, बाटिक वगैरे.
५ ) जीभेवर खडीसाखर व डोक्यावर बर्फ ठेव. कारण मुली व बायका या वेळेचे बंधन न पाळता तुझ्याकडे येतील. तेव्हा तुला न जेवायला वेळ असेल न इतर कामाला. ( मैत्रिणीचा दांडगा अनूभव आहे )
तुला अनेक शुभेच्छा.
हो आणखीन एक, ते म्हणजे कोणालाही उधार देऊ नकोस शक्यतो. कारण माहीत नसेल तर उधारी वसुल करणे अशक्य बनते, भिडस्त स्वभाव कुठल्याच धंद्यात चालत नाही. पाहीजे तर १० - २० रुपये कमी कर आणी फोन पे व गुगल पे करुन पैसे द्या असे सांग. मराठी होऊ नकोस, सिंधी किंवा मारवाडी बन.
नाईटी साधारण २५० ते ४०० च्या
नाईटी साधारण २५० ते ४०० च्या दरम्यान असावी व कापड धुतल्यानंतर भरले गेले पाहीजे.
मला वाटते मामींंना याचा अनुभव
मला वाटते मामींंना याचा अनुभव आहे. त्यांना संपर्क करा.
रश्मी किती छान मार्गदर्शन
रश्मी किती छान मार्गदर्शन केलत.
रश्मी.. वैनी, भारीच टिप्स
रश्मी.. वैनी, भारीच टिप्स आहेत कपड्याच्या व्यापाराबद्दल..! झुम क्लासेस सुरु करणार असाल तर मी पहिला विद्यार्थी बनेन.
डिजे, घरातुन व्यवसात कोनी पण
डिजे, घरातुन व्यवसात कोणी पण सुरु करु शकते, फक्त अफाट मेहेनत लागते कारण स्पर्धा आहे.
मागे ज्योतिष्यी व कालनिर्णयचे संपादक जयंत साळगावकर म्हणाले होते की मराठी माणुस धंद्यात का कमी पडतो व मारवाडी का यशस्वी होतो त्याचे एकच प्रमुख कारण आहे, ते म्हणजे मराठी माणुस १ रुपयामधले ९० पैसे घरात खर्च करतो, तर मारवाडी १ रुपयामधले ९० पैसे धंद्यात गुंतवतो तर उरलेले १० पैसे घरात देतो.
सामो धन्यवाद.
राठी माणुस १ रुपयामधले ९०
मराठी माणुस १ रुपयामधले ९० पैसे घरात खर्च करतो, तर मारवाडी १ रुपयामधले ९० पैसे धंद्यात गुंतवतो तर उरलेले १० पैसे घरात देतो>> +++१११११
क्युटी, थोडे जास्त पकवतेय पण
क्युटी, थोडे जास्त पकवतेय पण तुझ्या साठीच.
घरुन व्यवसायाचा निर्णय जेव्हा पूर्ण पक्काच होईल तेव्हा पाच- पंचवीस हजाराच्या वर रक्कम एकाच वेळेस गुंतवु नकोस. तसेच आधी माऊथ पब्लिसीटी व नंतर जम बसला की पामप्लेट्स वगैरे तयार करुन पेपर एजंट्स कडे घरोघरी पाठव.
रविवार पेठ ही होलसेल कपड्यांकरताच आहे. तिथे तुला वाजवी दरात कपडे विकण्यासाठी मिळतील. मनीष की मनिषा मार्केट असे काहीसे नाव आहे होलसेलच्या दुकानाचे. आधी नीट चौकशी कर. या होलसेलर्स कडे आपण आपली उधारी ठेऊ शकतो, कारण ते मोठ्या प्रमाणावर डिल हँडल करु शकतात व करतात.
रश्मी , चांगले पोस्ट . अजून
रश्मी , चांगले पोस्ट . अजून लिहा .
मायबोलीकर वल्लरी कपड्यांचे मुख्यतः साड्याचे व्यवसाय करते. तिला विपु करून पाहा
हो आणखीन एक, ते म्हणजे
हो आणखीन एक, ते म्हणजे कोणालाही उधार देऊ नकोस शक्यतो. कारण माहीत नसेल तर उधारी वसुल करणे अशक्य बनते, भिडस्त स्वभाव कुठल्याच धंद्यात चालत नाही. पाहीजे तर १० - २० रुपये कमी कर आणी फोन पे व गुगल पे करुन पैसे द्या असे सांग. >>>>>> +१.
माझ्या ओळखीच्या एका बाईने असाच उद्योग चालू करून वर्षभरात चांगले बस्तान जमवले आहे.तिचा मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि खूप बोलकीही आहे.तिने डायरेक्ट रिसेलर आणि विणकरांशी काँटॅक्ट ठेवले आहेत.ती व्हॉट्सापच्या स्टेटसवर फोटो टाकत असते.तिला म्हटले होते की कुठे तुला हे सुचले? तर काकू, तुम्हाला करायचे आहे का तर नंबर देते.म्हटले नको.
दुसर्या एकीने व्हॉट्सापवर ग्रूप केला होता.तिचेही प्रयत्न चांगले चालू आहेत.मुख्य म्हणजे तिचे मूलही लहान आहे.नंतर
मात्र ग्रुप डिलिट करुन फक्त स्टेटसला कपड्यांचे आणि इतर गोष्टींचे फोटो टाकत असते.इतके चर्हाट सांगितले कारण इतरजणी तुमचे फोटो आणि फोननंबर वापरुन स्वतःचा उद्ध्योग सुरु करतात.हा तिचा अनुभव आहे.
पहिल्यांदा नफ्याची कमी मार्जिन ठेवा.माउथ टू माऊथ पब्लिसिटी होऊ द्या. बाकी सर्व रश्मींनी सांगितले आहेच.
खूप सार्या शुभेच्छा!
सही!! ऐकून मस्त वाटले.
सही!! ऐकून मस्त वाटले. लोकांची मोठी सोय होईल कारण खूप लोकं करोनामुळे खरेदीला जायचं टाळत आहेत. खूप खूप शुभेच्छा.
नं ३ प्रश्नासाठी - टी-शर्ट ठेवा. हल्ली सगळे लोकं वापरतात. खूप लोकं विकतात हे ही खरे आहे! पण अतिशय लोकप्रिय प्रकार आहे. भांडवल कमी लागते असे ऐकून (खरं तर वाचून) आहे. वैयक्तिक अनुभव किंवा कुणी माहितीतील नाही त्यामु़ळे अधिक लिहीता येणार नाही.
गिर्हाईक ह्या नात्याने आमचा
गिर्हाईक ह्या नात्याने आमचा खरेदी पॅटर्न
गेल्या काही वर्षात कपडे , बेडशिट , टॉवेल वगैरे काही प्रमाणात ऑनलाईन घेत होतो . ह्या. वर्षी कोव्हीड्मुळे जवळपास सगळे कपडे ऑनलाइन किंवा सोसाइटी मध्ये व्यवसाय करण्यार्या मार्फत खरेदी करण्यात आले. दुकानात खरेदी झालीच नाही. अॅमेझॉन , फ्लिपकार्ड, मंत्रा आणि स्नॅपडिल ह्या साईट वाप्रल्या गेल्या.
ह्या साईटवर दुकानापेक्षा किंमती खुप कमी असल्याने ह्या व्यावसायात मार्जिन खुप कमी असेल असा माझा अंदाज आहे. दिवाळीत ह्या साईट वर US/UK Branded T-shirts २९९ रुपयात विकत होते त्यात कुपन्स आणि क्रेडिट कार्ड डिस्काउंट वेगळे . ह्यात अॅमेझॉन किती कमवणार, कुरियर, क्रेडिट कार्ड , विर्केता किती कमवणार?
सोसाइटी मध्ये जे व्यवसाय करतात त्यात चांगले मार्जिन असेल, कॅश पैसे मिळतात ओव्हर्हेड कमी ना GST नंबर घ्यायचा ना बुक ठेवायचे. कपडा बघुन घेत असल्याने गिर्हाईकाची थोडे पैसे जास्त द्यायची तयारी असते.
या व्यवसायात खूप स्पर्धा आहे
या व्यवसायात खूप स्पर्धा आहे.घरगुती रिसेलर्स आणि खुद्द कंपनीज पण.
तुम्ही स्वतःचे प्रॉडक्ट ऑनलाईन विकणार असाल तर काहीतरी कस्टमायझेशन, यु एस पी त्याला हवा.(उदा.मास्क सगळेच विकतात, पण खण मास्क, नथ चित्र असलेला मास्क, वेस्टर्न वर वापरता येईल असा मास्क स्कार्फ कमी जण बनवतात.)
स्वतः घरून व्यवसाय करणार असल्यास भरोसमंद आणि योग्य चार्ज करणारा कुरियर वाला आधी शोधून ठेवा.ऑनलाईन बिझनेस वाल्याना खूप डोकेदुखी होते.
whatsapp स्टेटसच्या
whatsapp स्टेटसच्या माध्यमातून बिझनेस करणार असाल तर २ फोन ठेवा, बिझनेस अकाउंट वेगळे आणि पर्सनल वेगळे. जेणेकरून ज्यांना खरेदी करायची नाही त्यांना डोकेदुखी होणार नाही.
आमच्या ओळखीत अशाच एक ताई आहेत, स्टेटस वर ज्वेलरी आणि साड्या टॉप्स आणि बरंच काय काय ठेवून विकतात. अर्थातच दिवसाला ५० ते ६० वेळा स्टेटस ठेवल्याने दोन तीन दिवसातच घरातल्या सर्वांनी त्यांना mute वर टाकलं. एकेदिवशी त्या भेटल्या आणि म्हटल्या कि त्यांच्या जावेचे १५ दिवसापूर्वी निधन झाले. अंत्यविधीला आम्ही पोचलो नाही याबद्दल आम्हाला फार वाईट वाटले. आम्हाला कुणीच कळवले नसल्याचे त्या ताईंना सांगितल्यावर त्या म्हटल्या कि "मी स्टेटसला ठेवले होते"
तात्पर्य: बिझनेस आणि पर्सनल whatsapp अकाउंट्स वेगवेगळे ठेवावे!
हो ते status आणि grps
हो ते status आणि grps वाल्या resellers इग्नोर केले जाते
सतत काहीतरी पाठवत असतात
तसे होऊ नये म्हणून काय करता येईल ते पहा
किंवा अगदी नव्या प्रॉडक्ट
किंवा अगदी नव्या प्रॉडक्ट बद्दल व्हॉटसप ने कळवायचे असेल तरी एक आकर्षक इमेज, ज्यात सर्व फोटो कोलाज असेल आणि डिटेल साठी मेसेक करा असे काही.
एकदम २० प्रोडक्ट इमेज आल्या की घाबरायला होते २० नवे मेसेज म्हणून.
https://youtu.be/jMe7kzK_oh8
https://youtu.be/jMe7kzK_oh8
या channel वर wholesale market ची बरीच माहिती सापडेल.
काही कारणाने प्रतिसाद देण्यास
काही कारणाने प्रतिसाद देण्यास उशीर झाला. त्याबद्दल क्षमस्व.!
आलेले सर्वच सल्ले माझ्यासारख्या नविन व्यवसायिकांसाठी खूपच उपयुक्त आहेत.
@ बोकलत, धन्यवाद. मिशो एपची माहिती घेईन. त्यावर व्यवहार नेमके कसे होतात हे माहित करून घ्यावे लागेल.
@अस्मिता, धन्यवाद.
@रश्मी, खूप आभारी आहे. तुमचा प्रत्येक मुद्दा खूप महत्वाचा आहे. विशेषतः सिझनप्रमाणे कपडे विक्रीस ठेवण्याचा विचार माझ्या डोक्यातही आला नव्हता. आता लक्षात ठेवीन. आणि गुजर, मारवाडी होऊनच धंद्यात उतरेन!
@मानवकाका, धन्यवाद. या व्यवसायातील लोकांचे मार्गदर्शन खूप उपयोगी पडेल. मामींना संपर्क करण्याचा नक्की प्रयत्न करेन.
@सामो, धन्यवाद.
@dj, धन्यवाद.
@जाई, धन्यवाद. मला सुरूवातीला भांडवल कमी वापरायचे असल्याने साडी विक्रीस ठेवायची नाही. परंतू या क्षेत्रातील लोकांचे प्रत्यक्ष अनुभव मोलाचे असल्याने वल्लरींना संपर्क करण्याचा नक्की प्रयत्न करेन.
@देवकी, धन्यवाद. तुमचे बरोबर आहे. जम बसेपर्यंत मार्जिन कमीच ठेवावे लागेल.
@सिमंतिनी, धन्यवाद. आजकाल मुली टीशर्ट सर्रास वापरतात. मी सुद्धा वापरते. त्यालाही कमी भांडवल लागेल. टिशर्टही सुरूवातीलाच ठेवेन.
@साहिल शहा, धन्यवाद. तुमचे निरिक्षण बरोबर आहे. ऑनलाईनमधे मार्जिन कमी मिळेल. पण सोसायटीत ग्राहकसंख्या मर्यादित असते. ऑनलाईनमधे ग्राहकसंख्या खूप मिळू शकते. सुरूवातीला जम बसेपर्यंत कमी मार्जिन ठेवून, क्वालिटी, खरेदीविक्रीच्या किमतीत ताळमेळ ठेवून काम करावे लागेल.
@mi-anu, धन्यवाद. मी स्वतःचे प्रोडक्ट नाही विकणार सुरूवातीला. कमी भांडवलामधे रिसेलिंग करून मग भांडवल वाढले की स्वतः मॅन्युफॅक्चरिंगचा विचार करता येईल.
@अजिंक्यराव, धन्यवाद. मी wtspवर व्यवसाय नाही करणार. एखाद्या साईटवर विक्री करण्याचा विचार आहे.
@किल्ली धन्यवाद. लोक स्टेटस वाल्यांना ignore करतात हे खरे आहे. पण मी अमेझाॅनसारखी साईट वापरणार आहे.
@shraddha धन्यवाद. तुम्ही दिलेल्या लिंकवर माहिती घेण्याचा प्रयत्न करेन.
मला एखाद्या साईटवर विक्री
मला एखाद्या साईटवर विक्री करायची असेल तर नेमकी काय प्रोसिजर असते, किंवा कसे व्यवहार होतात याबद्दल कोणाला माहिती असेल तर कृपया सांगावी.
बाकी, शक्यतो याच महिन्यात व्यवसाय सुरू करण्याचा विचार आहे. सुरू केला की, कोणत्या साईटवर वगैरे माहितीही ईथेच देईन.
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे पुन्हा आभार!
अमेझॉन सेलर अकाउंट लागतो.
अमेझॉन सेलर अकाउंट लागतो.
त्याचं रजिस्ट्रेशन पूर्ण पुढे जायला टॅन नंबर असावा लागतो.
त्यानंतर आपलं प्रॉडक्ट कुरियर अमेझॉन च्या त्या शहरातल्या ऑफिस कडे आणि तिथून जिथे जायचं तिथे रवाना होतं.
घरगुती रिसेलर्स बिना टॅन नंबर चे व्यवहार करतात.पण खूप जास्त इन्कम झाल्यास ते काहीतरी म्हणून दाखवावं लागत असेल.
https://services.amazon.in/services/sell-on-amazon/benefits.html?ld=inrg...
तुम्हाला शुभेच्छा !मी
तुम्हाला शुभेच्छा !मी मायबोलीवर नवीन आहे. मी तुम्हाला wholeseller / विक्रेता ड्रेस मटेरियल चे Contact no. देउ शकते. shop location is Dadar . मी हा व्यवसाय मागील 4 वर्षा करत आहे.
हे मार्केट फार म्हणजे फारच
हे मार्केट फार म्हणजे फारच सॅचुरेटेड आहे.
online मध्ये तुम्ही मोठ्या सेलर्सना कॉंपीट करु शकत नाही.... offline मध्येही आजूबाजूला खुप पर्याय असतील तर जम बसवणे अवघड असते.
भारंभार सगळे आयटेम ठेवण्यापेक्षा स्पेशालिटी ठेवा जसे की फक्त लहान मुलांचेच कपडे, फक्त पार्टी फ्रॉक्स, फॅंसी ड्रेसला लागणारे कपडे, कॅलिग्राफी टीशर्ट्स वगैरे नाहीतर तग धरुन राहणे अवघड होते.... थोडे दिवसांनी उत्साह ओसरतो!
पूर्ण विचार करुन, त्या क्षेत्रात काम करणाऱ्या चार चांगल्या लोकांशी बोलून पूर्ण तयारीनिशी या क्षेत्रात उतरा!
तुम्हाला शुभेच्छा