आठवणी तुझ्या माझ्या

Submitted by sangeeta kadam on 27 November, 2020 - 02:54

तू कारगिल वरून आलास, खूप खूप आनंद झाला, जीव भांड्यात पडणे म्हणजे काय असते ते कळले.

फुलपाखरा सारखे स्वछंदी दिवस होते ते.

तू आल्यावर खूप विचार करून एक निर्णय घेतला आपण, कि तू व्हॉलेंटरी रिटायरमेंट घ्यायला हवीये.

कारण तू स्पोर्ट पर्सन असल्या मुले, तुझ्या बरोबर आम्हीही येऊ शकत नाही, आणि आता बास वाटत होते, तुझ्या शिवाय राहणे, मी एकटी होते तेंव्हा ठीक होते, पण आता ऐश्वर्या सारखी धोसरा काढू लागली होती, पप्पा हवेत म्हणून.

शेवटी तू व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेऊन कायमचा आमच्या सोबत आलास.

थोडे महिने आराम करून, एक्स सर्विस मन म्हणून जॉब शोधू लागलास. तू खूप स्मार्ट आणि रुबाबदार होतास म्हणून लगेच तुला मोठ्या कंपनी मध्ये स्टोर किपर म्हणून जॉब लागला पण. मग आपण आपली पहिली स्कुटर घेतली बजाज चेतक, लोन वर. कारण तुला जाणे येणे बस ने खूप अवघड पडले असते.

माझा आवडता म्हणून ब्लु कलर निवडला तू. किती छोट्या अपेक्षा होत्या दोघांच्या पण. झाले सुरु रोजचे रुटीन आपले. तुझा, माझा ऑफिस, ऐश्वर्या ची स्कूल. होता होता ०६ महिने गेले. त्यात रविवारी संध्याकाळी बाहेर जायचो आपण ऐश्वर्या ला घेऊन नेहमी प्रमाणे, कधी एखाद्या रविवारी सिनेमा, कधी कुठले घरगुती कार्यक्रम, किंवा एखादे जवळचे सहलीचे ठिकाण.
बाकी पुढील भागात

Group content visibility: 
Use group defaults