आठवणी तुझ्या माझ्या

Submitted by sangeeta kadam on 26 November, 2020 - 05:16

आठवणी तुझ्या माझ्या किती सुंदर, किती कटू, पण तुझ्या माझ्या.

आठवते तुला, जस्ट पोस्टिंग झाले होते तुझे पुण्यातून, ४ वर्ष एकत्र राहिलो पहिल्यांदाच.
जसे लग्न झाले, तसे तुझे पोस्टिंग आऊट ऑफ पुणे च होते, तू पडला स्पोर्ट्स पर्सन, त्यामुळे कधीच तुझ्या बरोबर फॅमिली quarters मध्ये राहताच नाही आले.

खूप धडपड करून लग्नाला ०६ वर्ष होऊन गेल्यावर तुला पुण्यात पोस्टिंग मिळाली. आमच्या घरी अगदी लांबचा पण कोणी मिलिटरी मध्ये नव्हते, त्यामुळे ते लाइफ काय असते, काहीच कल्पना नव्हती. इथे तू आल्यावर कळू लागले सगळे. आधी फक्त १/२ महिन्या ची सोबत असायची आपली, ते पण तुला सुट्टी मिळाली कि. पण खूप छान होते ते दिवस. आणि खरा सांगू त्यावेळी असं वाटायचे कि मी ऑफिस ला जाऊच नये, सोबत राहावे तुझ्या. पण काही गोष्टीन इलाज नसतो, नोकरी पण महत्वाची होती, घर करायचे होते ना आपले, छोटेसे, आपल्या तिघांचे.

दोघांच्या प्रयत्नातून आपण घर घेतले, अगदी कर्ज काढून. एक छोटेसे तुझे आणि माझे, एक स्वयंपाक ची रूम आणि एक हॉल, गॅलरी मोठी. छान सोसायटी होती ती, सगळे मध्यम वर्गीय लोक, सगळ्यांची सेम घर. सगळे सण वर छान करत होतो आपण सोसायटी च्या लोक बरोबर.

माझी खूप इच्छा होती कि आपल्या घरात पहिल्यांदा फ्रिज घ्यायचा, तुही तेच म्हणायचास, कारण आठवतेय, हो बरोबर, मला ऐश्वर्या च्या वेळी, फ्रिज मधले थंड गार दूध प्यायची इच्छा व्हायची पण फ्रिज नव्हता ना, मग नाहीच झाली पूर्ण.

पहिला फ्रिज घेतला आपण, त्या काळी डबल डोर चा, मस्त रेड कलर चा.

ऐश्वर्या जेमतेम दोन अडीच वर्षाची होती तेंव्हा, सारखं सारखं पप्पा पप्पा करून तुझ्या मागे असायची.
तुझी माझी ड्युटी सांभाळून आपण खूप एन्जॉय केले ते दिवस. एन्जॉयमेंट म्हणजे, दार रविवारी आपण ऐश्वर्या ला संध्याकाळी बाहेर घेऊन जायचो, कधी सारसबाग, कधी पेशवेबाग, कधी संभाजी बाग, तर कधी राणाप्रताप बाग.
खूप खेळायची ती, झोके, घसरगुंडी वगैरे. मग फुगा घे, कधी छोटे खेळणे घे, असा करून घोड्या वर बसून आपण घरी यायचो, त्यावेळी खाल्ली तर कुठे भेळ, पाणी-पुरी खायचो, पण क्वचितच कारण ऐश्वर्या लहान होती, तिची जेवायच्या वेळात घरी येऊन ताजा स्वयंपाक करून जेवायचो.
तुला पहाटे लवकर निघावा लागायचे, डब्बा घेऊन जायचास तू, म्हणून मग मी पण लवकर उठून तुला डब्बा द्यायची.
तू गेलास कि बाकीचे यावरून ऐश्वर्या ला आजी कडे सोडून मी पण ऑफिस ला जायची.

असा करता करता कसे ३ वर्ष गेले समजलेच नाही. आणि आपण एक धाडसी निर्णय घेतला. शेजारच्या सोसायटी मध्ये १, तीन रूम चा फ्लॅट होता विकायला, आपण बघितला, आणि परत विचार करून कर्ज काढून घ्यायचा निर्णय घेतला. आपला आहे तो फ्लॅट विकून नवीन घेतला, पण आपण ज्यांना विकला त्यांना लगेच ताबा हवा होता, आणि आपण जो घेतला त्यांना २ महिने वेळ होता, ताबा द्यायला,

मग काय आलो आम्ही आई कडे थोडे महिने, कारण तुझे पोस्टिंग आले, आऊट ऑफ महाराष्ट, त्यावेळी कारगिल हे नाव सर्वज्ञात नव्हते, मी तर कर्नाळ कर्नाळ च करत होते.

तू बरोबर एप्रिल एन्ड ला गेलास इथून पोस्टिंग आणि मे महिन्या मध्ये कारगिल युद्ध सुरु झाले. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते, काही कळायचे नाही कसे तुला कॉन्टॅक्ट करू, कशी तुझी खुशाली कळेल, रोज पेपर चे रकाने च्या रकाने भरून यायचे, आपण हल्ला केला, त्यांनी हल्ला केला, आपली इतकी माणसे शाहिद झाली आणि इतकी जखमी झाली.

काय परिस्थिती आली होती हि, त्या देवालाच ठाऊक. रोज फोन बूथ वर जाऊन बसायची मी तुला फोन करायला, लागायचा नाही, खूप हताश व्हायची मी, दुसरा काहीच मार्ग नव्हता, २/३ दिवस वाट बघून मग आपल्या तांबे बाबा कडे जायची, तुझी कुंडली घेऊन, बाबा बघा हो, काही धोखा नाही ना त्याला, बाबा जेंव्हा जाईन तेंव्हा बघायचे कुंडली आणि सांगायचे काही उपाय, हे कर ते कर, काही धोका नाही होणार तुला, तुझा कुंकू बळकट आहे, मी म्हनयःची बाबा खूप टेंशन येते हो, नको काळजी करू म्हणायचे, त्याला काही नाही होणार, आणि तसाच झाले, काही महिन्यांनी युद्ध संपले, आपला विजय झाला, आणि एप्रिल मध्ये गेलेला तू सप्टेंबर मध्ये सुट्टी वर आलास.
तू सुट्टी वर आलास, कारगिल मध्ये होतास, म्हणून खूप कवतुक वाटले लोकांना, खूप लोक बोलवयःचे तुला, तुझे अनुभव ऐकायला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults