Submitted by अनिकेत बालाजी येमेकर on 24 November, 2020 - 05:16
उद्याची सकाळ
आयुष्याच्या एका दिवशी
सकाळी पहाटे जागा झालो,
डोळे चोळुन आळस दिल
अन सकाळ पाहायला बाहेर गेलो,
सुंदर अशी सकाळ होती
ढग केसरी झाले होते,
गार वारा वाहत होता
मन तेथे रमले होते,
वेळेला जर थांबवता आलं
तर सकाळ नसती जाऊ दिली.,
सकाळ गेली दुपार झाली
कष्ट करण्याची वेळ आली,
दिवसभर काम-काम
क्षणभर नव्हती विश्रांती,
काम झालं थकलो आता
घ्यावी म्हणालो विश्रांती,
रात्र झाली विश्रांतीला
आता झोपच घ्यायची होती,
जीवाला माझ्या रहावत नव्हतं
उद्याची सकाळ पहायची होती,
असच असतं आयुष्याच
बालपण सकाळ असते दुपार असते तरुणपण,
जेंव्हा विश्रांतीची गरज भासते
ती रात्र असते म्हातारपण,
एक दिवस एक आयुष्यच जणू
रात्री झोप घ्यायची असते,
का तर उद्याची सकाळ पहायची असते,
उदयाची सकाळ पहायची असते...,
- अनिकेत बालाजी येमेकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान.
छान.