एक छोटेसे गर्वहरण!

Submitted by आर के जी on 24 November, 2020 - 00:17

फोन वरील संभाषण:

मी: आई, अगं एक गम्मत सांगायची होती. आज ना सहज मनात आलं की चालायला जातीये तर मठात जाऊन यावं. म्हणून इकडे आले. थोडी गर्दी होती. पण अगं वेळ होता माझ्याकडे. म्हणून मग line मध्ये उभं राहून दर्शन घेतलं. अगदी सहज मनात आलं म्हणून अन्नदानासाठी पैसेही दिले. बाहेर प्रसादही घ्यावासा वाटला. म्हणून खिचडीचे २ द्रोण घेऊन बाहेर आले तर बाहेर जाम गर्दी दिसली.

आई: अगं असणारच. आज स्वामींचा प्रकटदिन आहे ना. फारच छान झालं तू आज गेलीस ते.

मी: हो का? अगं फारच छान झालं की.

आई: स्वामींचीच कृपा.

----

चालता चालता मनातले विचार:

किती चांगलं झालं. असं म्हणतात स्वामींची ईच्छा असल्याशिवाय असे योगायोग जुळून येत नाहीत. फारच छान वाटतंय. स्वामी, तुमची कृपा अशीच राहूदे.

सासूबाई असतील घरी. त्यांना प्रसाद द्यावा. बरं वाटेल त्यांना.

----

सासूबाईंच्या घरी:

मी: आई, अहो आज सहज म्हणून मठात गेले. अगदी line मध्ये उभं राहून दर्शन घेतलं, आणि हा प्रसाद घेऊन आले. तुम्हाला थोडा द्यावा म्हणून आले.

सासूबाई: वाह, फारच छान झालं.

मी: हो ना. असे योगायोग घडले की असं वाटतं ना की स्वामींचं आपल्याकडे लक्ष आहे.

सासूबाई: हो ना. माझंच बघ. मी इतर दिवशी जाते. पण मला नेमका आजच वेळ नाहिये. पण तू आलीस आणि बरं वाटलं. स्वामींनी अगदी घरपोच प्रसाद पाठवलाय.

----

त्या अगदी सहज बोलून गेल्या आणि मला माझ्या मनात 'स्वामींनी मला बोलावून घेतलं' ह्या विचाराने तयार होऊ घातलेल्या छोट्याश्या गर्वाचं हरण झाल्यासारखं वाटलं. Happy

अनुभव share करावासा वाटला म्हणून इकडे share करतीये.

Group content visibility: 
Use group defaults

आपण ते आंधळे आहोत जे की हत्तीचे विविध अवयव चाचपत, पूर्णरुपाविषयी आडाखे बांधत असतो. आपल्यापैकी कोणीच परिपूर्ण जाणत नाही पण कोणीच तसं पाहता स्वतःच्या मर्यादित रिअ‍ॅलिटी आणि कॉग्निशन मध्ये (माया) चूकीचेही नाही.
.
प्रसाद मिळाला व दर्शन मिळाले, आनंद आहे.
.
मी गोंदवले येथे जावे असा विचार करुन लगोलग त्याच वर्षी जाउनही आले तेव्हा मलाही असा अभिमान/गर्व वाटला होता. Happy

त्या खूप श्रध्दाळू आहेत. त्या जे बोलून गेल्या त्या मागे कृतज्ञतेची भावना होती असं मला वाटतं. गर्व नव्हता.

आणि माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मला माहित आहे मला कसं 'भारी' वाटलं होतं ते Happy