दिवाळी

Submitted by चंदन सोनाये on 22 November, 2020 - 07:20

---------
दिवाळी
---------

दिव्यांची आरास, रंगांची उधळण,
रोशनाईचा उत्सव, आला दिवाळीचा सण...

उत्साही तन मन, मंगल झाले वातावरण,
सजले सारे जण, उत्साहाला आले उधाण...

थंडीत लावुनी उटणे, आणि मग ओवाळणे,
दिव्याची त्या ऊब वाटणे, सारे किती आनंदाने...

लाडू, चकली, शेव, चिवडा, किती तरी फराळ,
अनारसे, करंजी, शंकरपाळ्या, येईल का कशाला याची सर...

रांगोळीचे रंग, आकाशदीप अन् दिव्यांची माळ,
फटाक्यांची आतिषबाजी, दुमदुमले सारे आसमंत...

दूर असती किती, आले सारे जवळी,
एकमेका भेटूनी सारे, क्षण थोडे विसावले...

करू धूळ दूर, मनातली सारी,
या दिवाळीत येऊ, एकत्र आपण मनानी...

Group content visibility: 
Use group defaults