कनकादित्य मंदीर, कशेळी व पुर्णागड

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मे महिन्याच्या सुरुवातीलाच तीन दिवसांची सुटी मिळाली. ती सत्कारणी लावावी म्हणुन गणपतीपुळ्याला जायचा बेत केला. या फेरीत एक फार छान मंदीर पाहण्यात आले. पावसपासुन २८ किमी वर कशेळी गावात हे कनकादित्य मंदिर आहे (सुर्य मंदीर). पुर्णपणे लाकडाने बनवलेले हे अत्यंत सुंदर मंदीर आहे. आम्ही सहज फेरी मारावी असे ठरवुन तिथे गेलो आणि चक्क दोन तास झाले तरी तिथुन पाय निघत नव्हता. मंदीर बांधुन खुप वर्ष झाली आहेत आता लाकडाच्या खांबाना आतुन वाळवी लागली आहे आणि ते पोकळ व्हायला लागले आहेत. या मंदीराच्या दुरुस्ती साठी २२ लाख रुपयांची आवश्यकता आहे.

मला मात्र हे मंदीर फारच आवडले. अत्यंत साधे पण सुंदर असलेल्या या मंदीराकडे लोकांचे लक्ष जावे म्हणुन त्याचे काही फोटो इथे टाकतो आहे.

प्रवेश द्वार
100_2951_dvar.jpg

मंदीर

100_2976_mandeer.jpg

मंदीरातील बाहेरील भाग

100_2980_aat.jpg100_2980_aat_2.jpg100_2980_aat_3.jpg100_2980_aat_4.jpg

मंदीरातील आतील भागात लाकडी छतावर फार सुंदर कोरीव काम करुन विविध देवतांच्या मुर्ती कोरल्या आहेत

100_2952_copy_chhat_1.jpg100_2952_copy_chhat_2.jpg100_2952_copy_chhat_3.jpg100_2952_copy_chhat_4.jpg100_2952_copy_chhat_5.jpg100_2952_copy_chhat_6.jpg100_2952_copy_chhat_7.jpg100_2952_copy_chhat_8.jpg100_2952_copy_chhat_9.jpg100_2952_copy_chhat_10.jpg100_2952_copy_chhat_11.jpg100_2952_copy_chhat_12.jpg100_2952_copy_chhat_13.jpg100_2952_copy_chhat_14.jpg

मंदीरातील खांब

100_2970_khamb.jpg

या मंदीराकडे जाताना वाटेत असणार्‍या पुर्णागडावरही चढाई केली. हा किल्ला अत्यंत छोटा आहे. फक्त खाडी आणि समुद्रावर टेहाळणी साठी याचा वापर केला जात असावा. हा स्वराज्यातील शेवटचा किल्ला असे माझ्या वाचनात आले होते. हे त्या किल्ल्याचे काही फोटो.

100_2948_purna_1.jpg100_2948_purna_2.jpg100_2948_purna_3.jpg100_2948_purna_4.jpg100_2948_purna_5.jpg

या किल्ल्याच्या दरवाज्याच्या आतील बाजुस राखण करत असलेला बारशिंगा मला तिथे दिसला.

100_2948_purna_6.jpg

याच ट्रीपमधील काही इतर फोटोज...

राई भातगावच्या पुलावरुन दिसलेला सुर्यास्त

100_3033_rai.jpg

तन्हाळी, मार्गताम्हाणे येथिल सुर्योदय

100_3040_uday.jpg

गणपतीपुळ्याला गजराजाबरोबर लढणारे ओम राजे

100_3002_hattee.jpg

तुम्हा सर्वांचे पुढील सर्व प्रवास सुखरुप होण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त जाहीरात इथे टाकत आहे.

100_2998_sulaTee.jpg

विषय: 

वा. छान. कित्येक वर्षांनी आठवण काढून दिलीत. कशेळी, पावस नी पुर्णगड हि एक सुंदर जागा आहे. तरी पावस खूप कमर्शियल झालेय पण सुदैवाने कशेळी व पुर्णगड अजून शांत आहे. Happy

कनकादित्य मंदिरात काढलेले फोटो अतिशय आवडले!

नील. तूपण गणपतीपुळ्यात होतास?? मी एक तारखेला गेले होते. Happy

फोन केला असतास तर भेट झाली अस्ती आपली.
--------------
नंदिनी
--------------

नील_वेद: कनकादित्य मंदिरा जवळच 'देवाची खोली' नावाची जागा (गुहा) आहे. ह्याच गुहेत कनकादित्यांची मुर्ती सापडली होती. तिथे गेला होतात का?

फोटो छान Happy

कनकादित्याच्या मंदिराकडे जायच्या आधी कशेळी गावात शिरल्या शिरल्या एक खूप जुने मंदीर आहे. लक्ष्मीनारायण मंदीर. ते पाह्यलं का? कनकादित्यापेक्षा ते आवडलं मला.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

मस्त फोटो नील, त्या ठिकाणांची परत एकदा उजळणी झाली. खुप लहानपणी कशेळीला गेल्याचं आठवतंय...

ती 'सुलटी.....' जाहिरात सही आहे एकदम.. Lol

छान फोटोज आहेत.
------------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

नील, सुंदर फोटो आणि उपयुक्त माहिती.
आता घराबाहेर निघायचे वेध लागायला लागलेत. आकाशात हळूहळू ढग ही जमायला लागले आहेत. लक्ष ठेवा आणि प्लॅन करा लवकर.. Happy
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

पूर्णागडाचे फोटो मस्त सगळे.
'सुलटी'!! Lol
----------------------------------------------------
No matter how you feel, get up, dress up and show up.

पूढच्या वेळी गणपतीपूळ्याजवळ कह्राटेश्वर मंदिर आहे तीकडेपण जावुन या

नील, खुप मस्त फोटो Happy
तुला तो ताम्रपट दाखवला का तिथल्या पुज्यार्‍यांनी.... तोही खुप छान आहे!

व्वा Happy खुपसे फोटो काढलेत! Happy
कधी कधी बर्‍याच मन्दिरात (मूर्तिव्यतिरिक्तदेखिल) फोटो काढायला परवानगीच नस्ते! Sad
त्यामानाने हे बर Happy

नील, फारच छान माहिती आणि सुन्दर फोटो आहेत्...आम्ही २० आणि २१ ला गणपतीपुळ्यातच होतो...माझ्या सासुबाइन्चे माहेर मालगुन्ड आहे..केशवसुतान्चे गाव्..गेली १०वर्शे आम्ही पुळ्यात आणि पावसला स्वामीन्च्या मठात जातोय..पण खरच या कशेळी गावातल्या सुर्यमन्दिराबद्दल काही ठाउकच नव्हते..आता मिस्टराना तेच फोटो दाखव्तेय्..खरच मनापासुन धन्यवाद एव्हढि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल.:)

कनकादित्य मंदिर आम्ही पण पाहून आलो . तिथे ती ताम्रमुद्रा की ताम्रपट काय तरी आहे ना ते पण पाहीलं. पुढे आडीवर्‍याकडे जाणारा रस्ता मस्त.. आणि वर डोंगरावर एक गणेशमंदिर आहे गणपती गुळे मला वाटतं..

निल, सुरेख सगळी छायाचित्रे! Happy
अगदी तिथे जावून आल्यासारखे भासावी इतपत सुरेख! Happy

-------------------------------------------------------------
मी मोठा शाहणा, धनाढ्यही , गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि चढ एक जगामंधी, थोरपणाला मिरवु नको