मे १०, २००९: वार्‍याला न जुमानता जंगला मधील सिंव्हाशी केलेला संवाद

Submitted by माणूस on 11 May, 2009 - 10:14

दिनांक १० मे २००९ रोजी वेस्ट्पोर्ट बीच वर एक ऐतीहासीक भेट झाली... त्याची ही कहानी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

preetikole | 11 मे, 2009 - 09:09
सुप्रभात मंडळी!!
गेला का नाही थकवा?
मी काल रात्री ९ ला झोपुन मस्त ६ला उठले
सचिन, सगळ्या वाट्यां माझ्याकडे आल्या, माहित नाही कश्या.

cinderella | 11 मे, 2009 - 09:27
पेले माझ्याकडे आले. लेकाने त्यातला एक काढुन घेतलाय आणि रात्री अगदी झोपताना सुद्धा हातात घेउन झोपला.

प्रीती, मी आणि इशानने साडेआठ वाजताच पडी खाल्ली ते सकाळी ६ पर्यंत

सुप्रभात !!!

Sachin_B | 11 मे, 2009 - 09:27
रामराम...
काला जीटीजीला मजा आली...
वृत्तांत सिंड्रेला लिहिणार म्हणाली आहे...

प्रिती, वापरुन टाक बिनधास्त...

vinaydesai | 11 मे, 2009 - 09:37
वाट्या पेल्यांचं ठिक आहे.. पण चमचे होते का? आणि ते कुणाचे होते आणि कुणाला गेले?

विनय

Panna | 11 मे, 2009 - 09:45
माझ्याकडे फक्त माझ्याच वस्तू परत आल्यात

काल खूपच धमाल आली. अमाबोकरांनी पण खूप एन्जॉय केलं. परत कधी हा प्रश्न चक्क नवर्‍याकडून आल्यावर उडालेच मी
कालच्या अखंड टकळी नंतर घरी आल्यावर तासभर शांत बसले होते. (अर्थात पुस्तक हातात घेउनच) नवर्‍याने सचिनच्या पुस्तकावर पहिला क्लेम लावला. मग मी गोफ वाचायला घेतलय.

प्राजू, तब्येती कशा आहेत तुमच्या आता?? तू आली असतीस तर ओळख झाली असती.

सुसकाळ

संपादन preetikole | 11 मे, 2009 - 09:45
रात्री अगदी झोपताना सुद्धा हातात घेउन झोपला>> राम पक्षाचे एक पिस घेऊन आला आणि आज शाळेत मित्रांना दाखवायला घेऊन जाणार होता पण विसरला.
.
प्रिती, वापरुन टाक बिनधास्त>> नक्की, तुला परत नक्कीच नाही करणार
.
पण चमचे होते का? आणि ते कुणाचे होते आणि कुणाला गेले?>> सगळे सचिनचे होते आणि ते कोणाला गेले माहित नाही
.
फोटो कोणी कोणी काढले ते पाठवा मला, माझ्याकडचे आज रात्री पाठविन.
.
खुप धमाल आली !!

cinderella | 11 मे, 2009 - 09:50
कालच्या अखंड टकळी नंतर घरी आल्यावर तासभर शांत बसले होते. (अर्थात पुस्तक हातात घेउनच) >>> अगदी अगदी. मी तेरुओ घेतलय वाचायला

preetikole | 11 मे, 2009 - 09:52
मी भारतातुन चारचौघी मागवलं होतं, ते काल मिळालं. गाडीत २-३ पानं वाचली पण थकल्यामुळे लगेच झोप लागली.

Panna | 11 मे, 2009 - 10:02
विनय, 'चमच्यांची' काळजी नसावी ते ह्या ए.वे.ए.ठीला नसतील ह्याची खबरदारी घेतली होती

संपादन ITgirl | 11 मे, 2009 - 10:06
वृ कोण आणि कधी लिहितय म्हणे जीटीजीचा?

maanus | 11 मे, 2009 - 10:07
राम राम...

मी अजुनही झोपेतच आहे, प्रचंड अंग दुखतेय, सर्दी पण झाली बहुतेक.
एकाच सप्ताहंतात दोन कार्यक्रम करु नयेत हे शिकलो

manish2703 | 11 मे, 2009 - 10:11
अरे वा !! ए.वि.ए.ठि. एकदम जोरदार झालेलं दिसतंय.. वृत्तांत टाका लवकर...

Lol
माणसा, तू खरंच काय लिहिशील ह्याचा काही भरोसा नाही... जंगल काय, सिंह काय... काहीही.. Lol

सिंह म्हणजे ते मांजर का ?

माझ्या मते त्याने Sherwood हे ठिकाण होते म्हणुन तसे लिहीले असावे. माणसा उत्तर दे लवकर.

बर चला काय काय गॉसीप्स केल्या ते लिहा लवकर Wink

गॉसिप्स भरपूर Proud अखंड बडबड करत होतो सगळे. एकही क्षण अवघडलेला नव्हता.
सगळचं इकडे सांगता येणार नाही.. त्यासाठी पूढील ए.वे.ए.ठिला हजेरी लावावी लागेल Proud