भारतातून USA मध्ये पार्सल पाठवणे

Submitted by कपीला on 11 November, 2020 - 11:00

भारतातून USA मध्ये पार्सल पाठवणे

आयुर्वेदिक औषधे , देवाची वस्त्र (सोवळे), होमीओपॅथिक औषधे, खाऊ अश्या अनेक गोष्टी लागतात. कोविड मुळे जाणं -येणं बंद. कुठली पार्सल servcie वापरावी ? पर्सनल shopper सर्विस वापरलीये का कुणी USA मधून ? पार्सल वाले घरी येऊन घेऊन जातात का? वजन आपल्यासमोर करतात?
कृपया तुमचे अनुभव सांगा आणि references पण द्या पार्सल अँड शॉपिंग services चे . धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इथे असा धागा आहे ऑलरेडी. पुण्यात असाल तर युनिक कुरिअर आहे. औषधे नाही नेत बहुदा. कोविडमुळे घरी बोलावलं होतं , वजन काटा असतो त्यांचा , आपल्या समोर करतात वजन. बॉक्सपण त्याचाच असतो फक्त वस्तू द्यायच्या ते करतात सर्व. कालच ( 5 दिवसात ) पोचले पार्सल. दरवर्षी 3 दिवसात जाते पण यंदा कोविडमुळे उशीर. हे मी दिवाळी स्पेसिफिक लिहिलं आहे. तुम्हाला इतरवेळी पाठवायचं असेल तर हे युनिकवाले सेवा देतात की नाही ते माहीत नाही. पोस्टाची पण सेवा आहे असे ऐकले होते. पुणे युनिव्हर्सिटी ब्रँच मधून होते बहुदा पोस्ट.

माझे सासरे नळ स्टॉप इथे असलेल्या एका कुरिअर वाल्या मार्फत पाठवतात. तो फेड एक्सनेच पाठवतो पण बाकी सर्व सेवा म्हणजे पॅकिन्ग करणे, काय पाठवता येईल काय नाही याची माहिती पुरवणे व्यवस्थित सांगतो.

+91 92255 42121
https://www.indofine.in/

२०१७ मधे आई बाबा अमेरिकेत आले होते, आई डायबेटिस ची अर्धी औषधं विसरली होती, तेव्हा पुण्याहून भावाने DHL ने पाठवली होती. त्यांच्यासमोर पॅक केली, सोबत प्रिस्क्रिप्शन पण दाखवले आणि त्यासोबतच पॅकही केले होते. ७-८ दिवसात आली व्यवस्थित. इकडे आम्हाला ट्रॅक ही करता आली शिपमेन्ट.

DTDC ची जाहिरात येत असते ५ किलो फराळ ३००० रुपयात. DTDC घरुन घेउन जात नाही पण मुम्बई पुण्यात खुप ठिकाणी DTDC आहे.
अमेरिकेत पाठवण्यासाठी DTDC वापरली नाही पण ईतर देशात आणि भारतात वापरली आहे.