मी सोडले केव्हांच रे हे वेदना कुरवाळणे

Submitted by द्वैत on 3 November, 2020 - 06:06

मी सोडले केव्हांच रे हे वेदना कुरवाळणे

मी सोडले केव्हांच रे हे वेदना कुरवाळणे
दे जीवना तू सोडुनी आता मला सांभाळणे

माझ्या नशीबाला कधी देणार नाही दोष मी
साऱ्या नव्या वाटांवरी असतेच ना ठेचाळणे

झाल्या चुकांचा आज मी पाढा नव्याने वाचला
ती आज नाही सोबती स्मरते तिचे आभाळणे

होतो तिला मी बोललो.. खचणार नाही मी कधी
जमले मला ना शेवटी तो शब्द माझा पाळणे

ना आस उरली कोणती हा जन्म माझा पांगळा
हे श्वास काही मोजके ना सोडती रेंगाळणे

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह !

मी सोडले केव्हांच रे. गझल खुप आवडली. मी सीनिअर सीटीझन आहे. ही गझल मी composed करून गायली आहे. तुम्हाला ऐकावयाला आवडेल.

खुप आभारी आहे.
Audio whatsapp वर पाठवता येईल. नंबर मीळेल का