घर घेण्याबाबत माहिती हवी आहे.

Submitted by ऋनिल on 23 October, 2020 - 11:56

डायरेक्ट मुद्द्यावरच येतो.

डोंबिवली P and T colony R K Bazar जवळ एक फ्लॅट बघितला आहे. प्रोब्लेम हा आहे की, जेव्हा मी स्वतः लोन करून घेतो इतकं बोलल्यावर बिल्डर उडवाउडवीची कारणे देऊ लागला. वेळ जातो..लवकर sanction होत नाही वैगेरे वैगेरे त्यापेक्षा आमच्या काही बॅकाशी काही टायप आहे तिथून लोन करून देऊ.. आणि महिनाभरात तुम्ही राहायलादेखिल याल.. ( फ्लॅट रेडी पझेशनमध्ये आहे)

असं तो वारंवार सांगतोय. मी आधीच pre approve sanction hdfc banke तून केलं आहे आणि तिथे मला 6.95% च्या रेटने होम लोन मिळतयं आणि आता परत बिल्डर ज्या बॅका सांगेल तिथून घेतलं तर कदाचित जास्त रेटने होम लोन घ्यावं लागेल आणि तो रेरा आणि इतर डाॅक्युमेंटची काॅपी देत नाही.. बोलतो चेक करायचं असेल तर आमच्यासमोर करा... चार विंगचा मोठा काॅम्पेलेक्स आहे.. कन्स्ट्रक्शन क्वालिटीपण चांगली आहे आणि आम्हाला पण फ्लॅट आवडला आहे आणि ओळखीच्या लोकांनी संमिश्र सांगितलं आहे..त्यामूळे थोडं कन्फ्यूजन आहे.. थोडा रेट जास्त असेल तरी घेण्याची तयारी आहे पण पुढे घेतल्यानंतर काही प्रोब्लेम येऊ शकतो का?? मी पहिल्यादाच घर घेतोय त्यामूळे जाणकरांनी मार्गदर्शन करावं... ही माफक अपेक्षा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जर राषटरियकृत बॅंक शी टाय अप असेल तर लोन लवकर sanction होईल.शिवाय व्याज दर जवळपास ६.९ आहे सगळीकडे.रेरा साइट वर काही लीगल लिटीगेशन नाही हे confirm करा.शकयतो टाय अप असलेल्या private bank सोबत डील करू नका

Thank you Sujata mam..

Blackkat sir - nhi tie up zalelya banket hdfc nhi.. to agent Bank of maharashtra and bandhan bankecha khitari bolat hota.. dombivalit room ghen khupach risky ahe.. agadi baju bajula aslelya bldg ek kdmc mdhye yete tr dusari zp... tyamule sagal padatalun pahav lagat..

Bandhan banketun loan tr mala chukunhi nko..amchya samorchyani loan tithunch ghetal hot..tyancha farasa changala anubhav nhi.. ani var sadhya tyancha intrest rate itar bankepeksha jast aahe 8.5 to 9.5%

Baki Bank of maharashtracha cha khi mahit nhi..

Pn nationalise bank jya property var loan dete..ti safe asate.. asa maz tRi mat aahe..

टाइटलमध्ये घोळ आहे म्हणून उडवाउडवी होते. बांधकाम
जागेवर एनोसी परमिशन वगैरे पाटी असते ती आता काढून टाकली असेल.

टाय झालेल्या ब्यांकेत एच डी एफ सी नसेल तर प्रोजेक्त भरोषयाचा वाटत नाही

डोंबिवलीत लईच गोंधळ असतात , केडीएमसी एपृवड , झेड पी एपृवड भरपूर लफडी असतात

पैसा HDFC, SBI किंवा कुठली कराड बँकेतून आला तरी त्याचा रंग सारखाच असणार आहे ना ?

बिल्डरने सुचविलेल्या बँकेतून पैसे घेतले तर तो घराच्या किंमतीत काही अतिरिक्त सवलत देणार आहे का ? विचारा. पैसा कुठल्या बँकेतून येतो आहे याच्याशी बिल्डरला काय करायचे आहे ? त्याला म्हणा, " आम खानेसे मतलब रखो... " Happy

<< अशा वेळी स्थानिक आर्किटेक्ट कडुन सशुल्क सल्ला मिळू शकेल >>
------ येथे, मायबोलीवर, नि: शुल्क सल्ला मिळेल जोडीला भावी फ्लॅट खरेदी करणार्‍यांना मार्गदर्शन... पुढच्यस ढेच मागचा शहाणा प्रमाणे.
Happy