लग्नाळू संभाषण

Submitted by बबड्या cool on 22 October, 2020 - 00:17

तर, अस्मादिकांचे लग्न ठरले आहे. एरव्ही इतर मुलींशी/ मैत्रिणींशी प्रो लेव्हलवर बोलू शकणारे अस्मादिक होणाऱ्या बायकोशी काय बोलावे हे कळत नसल्याने मोठ्याच पेचात सापडले आहेत. बऱ्याचदा कॉल करून पाच पाच मिनिट फक्त शांततेत जात आहेत. इथे अनेकांची लग्ने झाली आहेत/ असावीत. पुरुषांसाठी प्रश्न: तुम्ही तुमच्या होणाऱ्या बायकोशी कोणत्या विषयावर बोलला होतात? कोणत्या विषयावर बोलायला हवे?
स्त्रियांसाठी प्रश्न: होणाऱ्या नवऱ्याने कोणत्या विषयांवर बोलायला हवे? अगदीच शांतता निर्माण होत असेल तर काय करावे जेणेकरून बॉण्डिंग निर्माण होईल?

त.टी.: १, करिअर आणि शिक्षण वगैरे बाबत बोलून झाले आहे. दोघांच्या फिल्ड्स पूर्णपणे भिन्न असल्याने त्यात अजून बोलण्यासारखं उरलेलं नाही.
२. इतिहास आणि राजकारण या दोन्ही गोष्टीत तिला रस नाही.
३. कोरोनावर थोडं बोललोय, अजून बोलायची इच्छा नाही.
४. वैयक्तिक प्रेमविषयक इतिहासात दोघांनाही डोकावायचं नाहीये.

खूप अडचणीत आहे, नक्की मदत करा.

Group content visibility: 
Use group defaults

असं कोठे र्हास कां. लगीन ठयरी रायनं नी म्हणे बोलानं सुची नही रायनं.
वावर ना बारामां चावया, कांदा ना भाव कथाकथाच जाई रायना, बठ्ठा भाजीपाला गैरा म्हांगा हुई राय्ना.
काय काय नवं रांधता येस हई इचारो कितला ईशय पडेल शेतस एकसावा बोलाले तं सुरुवात करा पुढलं देखाय जाईन म्हना.

.

भयकथा वाचुन ऐकवत जा... तुम्हाला बोलण्याचं समाधान तर राहिलंच शिवाय एकटे राहताना भीतीही राहील. म्हणजे पुढे जाऊन दोघे एकमेकांशिवाय राहायला नकोत...

बबडुजींनी धागा काढुन टीप्स मागितल्या. भोळ्याभाबड्या माबोकरांनी वेळातवेळ काढुन मदतही केली. पण बबडु यांनी शादीचे लाडु कसे होते ते काही सांगितले नाही.

या सरांनी त्या सरांना दाद द्यावी
न-सरांना यातुनी नैराश्य यावे
कोणत्या आयडी अशा येती नळाला
गोंधळ्यांनी बोलणे विसरून जावे

या सरांनी त्या सरांना दाद द्यावी
आणि त्यांच्या वाटणीला प्रश्न यावे
सांडता तर्कटे बोटे गंडताना
अनर्थांचे अर्थ शोधुनी निर्लज्ज व्हावे

गुंतलेले सत्य या गोंधळात एक
फाटकी ही आयडी काळीज माझे
मी असा संतापुनी बेहोष होता
सरभक्तीत तू मला वाहून घ्यावे

Pages