खुन एक स्वातंत्र्यापुर्वीचा आणि बारा स्वातंत्र्यानंतरचे

Submitted by नितीनचंद्र on 20 October, 2020 - 02:30

कालच बापु बिरु वाटेगावकर यांच्या जीवनप्रवासावर युट्युबवर एका दुरदर्शन वाहिनीने घेतलेला साक्षात्कार पाहिला https://www.youtube.com/watch?v=ticyo5LzOP4

बापु बिरु वाटेगावकर यांनी महिलांचे शिलरक्षण व्हावे यासाठी पहिला खुन पाडला. तो ही स्वातंत्र्यानंतरच्या काळात जेव्हा अत्याचारी राज्यकर्ते सुध्दा तुरुंगात जाऊ शकतात अशी यंत्रणा असुन ती फेल झालेली होती.

पुढे गरजेपोटी बापुंनी एकूण १२ खुन केले. मी सिनेमा पाहिला नव्हता त्यामुळे ही कथा माहित नव्हती. महाराष्ट्र माझा ने सात वर्षांपुर्वी युट्युबर ही मुलाखत प्रसिध्द केली. बापुंच्या शब्दात हे ऐकणे मोठे रंजक आहे. कारण सिनेमात कमर्शिअल व्हॅल्यु नावाखाली कथेची मोडतोड होते.
बापुंनी पुढे शिक्षा भोगली

ही मुलाखत ऐकत असताना डॉ राम भोसले यांच्या आत्मचरित्रामधील एक चित्तथरारक त्यांनी केलेला इंग्रजी शासन काळात सनदी अधिकार्याचा अश्याच अत्याचार करतो म्हणुन खुन केलेला आठवला. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%95%E0%A...

यानंतर डॉ राम भोसले परांगदा झाले स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रगट झाले आणि त्या गुन्ह्यातुन त्यांची सुटका झाली.

या दोन्ही लोकांनी गुरु केले होते. अत्याचार मुक्ती ही गुन्हा करण्यामागची प्रेरणा होती.

स्वातंत्र्य पुर्व काळात जेंव्हा सनदी अधिकारी अत्याचार करतो त्याची सरकार दखल घेत नाही हे डॉ राम भोसले यांना पटले नाही किंवा स्वातंत्र मिळाल्यानंतर एका स्त्रीचा खुन केलेला खुन केलेला गुन्हेगार उजळ माथ्याने फिरतो हे चुक आहे हे बापुंना पटले नाही. ही ती प्रेरणा

पुन्हा आपले जीवन पणाला लाऊन गुन्हेगारांना स्वतः सजा देणारे आणि पुढे सरळ मार्गाने त्याची सजा भोगणारे जन्माला येण्याची गरज लागु नये असे वाटत असेल तर सरकारी यंत्रणा फेल होऊन उपयोग नाही.

पण आजची स्थिती अशी आहे की अनेक बेपत्ता लोकांचा पत्ता नाही. त्यांना कुणी मारुन गाडले की काय झाले याचे उत्तर शासन देऊ शकत नाही. गोळीबार करणे हे महाराष्ट्रात असो की उत्तर प्रदेशात आम आहे.

अश्यावेळी कायद्याचे राज्य ही फक्त संकल्पना किंवा सामान्य काळी अनुभवास येणारी यंत्रणा आहे असे वाटते. ही संख्यात्मक आणि गुणात्मक पध्दतीने सुधारते असे वाटत नाही.

मायबोलीकरांना काय वाटते ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

गोळीबार करणे हे महाराष्ट्रात असो की उत्तर प्रदेशात आम आहे. >> हे फार धाडसी विधान आहे. बॉलीवुड ड्रगिस्ट नट्या काहिही म्हणत असल्या तरी महाराष्ट्रात अजुन फार बरी परिस्थिती आहे.

राम भोसलेंचे चरीत्र वाचले आहे. त्यात बऱ्याच अतर्क्य आणि अमानवीय गोष्टी दिलेल्या आहेत. ते त्या अधिकाऱ्याचा खुन करून पळत असताना त्यांना शंकर महाराज कसे वाचवतात याचा रंजक किस्सा आहे त्यात. आचार्य अत्र्यांचाही काहीतरी किस्सा वाचलेला शंकर महाराजांविषयी. खखोदेजा.