थरार : भाग १

Submitted by सोहनी सोहनी on 14 October, 2020 - 07:20

थरार : भाग १

आज पुन्हा पावसाची रिपरिप चालू व्हायचे चिन्ह दिसत होते, समोरच्या मातीने काळ्या रंगाच्या कुर्तीवर लांबसडक हिरव्या रंगाची ओढणी ओढल्याने डोळ्यांना नेहमीच भकास भासणारी सगळी पडीक जमीन सुंदर जाणवत होती.
ह्या निसर्गाच्या मोहात पुन्हा नको अडकायला म्हणून मी डोळ्यांसकट खिडकी बंद करून घेतली.
डोळ्यांना तर आवरलं पण मनाचं काय?? त्याला कोण आवर घालेल??
अगदी गेल्या वर्षापर्यंत वेड्यासारखे हुंदडायचो आपण, अगदी कुठेही, कधी एकटेच तर कधी मित्रांसोबत.
पडत्या पावसात डोळे बंद करून तोंडावर थेम्ब झेलत स्वतःत हरवून जायचो, तर कधी रस्ता नेईल तिथवर पावसाचा हात धरून गाडी घेऊन जायचो.
ह्या भागातल्या जवळपास सगळ्याच रानावनात फिरून आलोय आपण, गेल्याच वर्षीची तर गोष्ट आहे, मी केदाऱ्या आणि . . . .

' नीरज ' च नाव मनावर नुसतं उमटलं आणि हातातलं पुस्तक गळून पडलं डोळ्यांतल्या टपोऱ्या थेंबांसोबत.
शरीर एखाद्या सुकलेल्या झाडाप्रमाणे सुन्न झालं, काही हालचाल नाही पण मन. . . त्याला थोडीच बांधता येतं ??
ते कधीच उडालं नीरजच्या आठवणीत.

काही लोकं आयुष्यात येतात आणि आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जातात, मी केदार आणि नीरज तिघांचं असंच झालं. कॉलेज मध्ये मैत्री झाली आणि एक वेगळंच नातं बनलं तिघांमध्ये.

पावसाळा माझ्या जिव्हाळ्याचा. वेड लागायचं मला पावसाळ्यात, म्हणजे कुठे जाऊ नि कुठे नको असं व्हायचं मला.
प्रत्येक सुट्टी तर ठरलेलीच पण त्यातही मन नाही भरलं तर जसा वेळ मिळेल तसा मी भटकंतीला जायचो.
ओढे झरे पाहायला, तिथे भिजायला, हे दोघे मला मोकाटया म्हणायचे.
माझ्या सोबत कधी कधी हे दोघेही यायचे तेव्हा तर धम्माल असायची. मी एकांतात जो अनुभव घ्यायचो ह्या हिरव्या निसर्गाच्या सानिध्यात तो प्रत्येक वेळी नवीन आणि मनाला स्पर्श करणारा असायचा.
आणि ह्यांच्या सोबत निव्वळ दंगा, तरीही तो अनुभव हवाहवासा असायचा.

मी असा वेडा फक्त पावसाळ्यात असायचो बाकी दिवसांत मी मनसोक्त अभ्यास करायचो, तुम्ही मनसोक्त हसाल पण मी करायचो.
एव्हाना तुम्हाला थोडा संशय आला असेलच मी होस्टेलवर राहायचो, त्यामुळे पाहिजे तसं वागता यायचं.
आणि हे दोघेही शेजारच्या गावांत राहायचे, मी कॉलेज निवडताना हे थोडं गावालगत आणि आजूबाजूला निसर्ग आहे हे पाहून निवडलं आई वडिलांची नाराजगी पत्करून. कॉलेजचे दोन वर्ष ह्या दोघांसोबत कसे उडाले कळलं देखील नाही.

सगळं मनासारखं होतं असताना अचानक एक वादळ यावं आणि सगळं होत्याच नव्हतं करून जावं तसंच काही घडलं आमच्या आयष्यात.

- खूप महिन्यांनी लिहायला घेतलं आहे.
भाग लहान आहे, बराच गॅप पडला आहे म्हणून पटपट सुचत नव्हतं, माहित नाही व्यवस्थित लिहेन कि नाही पण प्रयत्न करतेय.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Liha