तुतनखामुन

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 11 October, 2020 - 15:12

ईजिप्त ची संस्कृती सुरक्षीत राहीली कारण पुर्वेला सौदी वाळवंट आणी तांबडा समुद्र दक्षीणेला जंगल, पश्चिमेला सहारा वाळवंट, ऊत्तरेला भुमध्य समुद्र ह्यामुळे त्यांच्यावर परकीय आक्रमणे खुप कमी झाली. ईसवीसन पहील्या शतकाच्या जवळपास ख्रिस्तन रोमनांनी ईजिप्त जिंकून प्राचिन ईजिप्तीशीअन संस्कृती संपवली आणी इजिप्त रोमन साम्राज्याचा भाग झाले.
तुतनखामुन हा ईसवी सन पुर्व १३०० म्हणजे आजच्या साडे तीन हजार वर्षाआधी वयाच्या नवव्या वर्षी राजा बनून अठराव्या वर्षी मेला. ह्या किंग बाॅयला वॅली आॅफ किंग्स मध्ये घाईघाईत गाडण्यात आलं. व्हॅली ऑफ किंग्स म्हणजे ईजिप्तमधील लक्सर ह्या शहराजवळ राजांना एका वॅलीत गाडलं जायचं. पिरॅमीड बनवण्याची परंपरा बंद झाल्या मुळे, पिरॅमीड सारख्या दिसणार्य् ह्या डोंगराच्या खाली फेरो म्हणजे राजांना गाडलं जायचं. आजपर्यंत ह्या वॅलीत ६२ राजांच्या कबरी सापडल्या आहेत. त्यातल्या बहुतांशी लुटल्या गेलेल्या होत्या. राजा ला ममी बनवून बरोबर अनेक सोन्याच्या वस्तू ठेवल्या जायच्या ज्या राजाला पुढील जन्मात कामाला येतील ह्या भावनेने. ह्या सोन्याच्या मोहाने चोरांनी कबरीना भगदाड पाडून लूटले. ही तुतानखेमून ची कबर ही दोन वेळा लुटली गेली, दरवाज्याच्या वर छोटं भगदाड पाडून चोरांनी त्या जागेतून नेता येतील तितके दागिने चोरून नेले. ही कबर वाचण्यामागे कारण सांगीतले जाते की तुतनखामून च्या कबरे पुढेच रामसेस ६ ह्या राजाची कबर बांधण्यात आली होती आणी अनवधानाने त्या कबरेची माती ह्या कबरेवर टाकली गेली आणी ही कबर गाडल्या गेली.
मुखवटा
सोनेरी मुखवट्यावर दु:खी पण शांत असे भाव आहेत.. हा मुखवटा कुशल कारागिरीचा एक उत्कृष्ट नमूना आहे.. मुखवट्याचं वजन ११ किलो आहे.. सोन्याच्या प्लेटपासून हा बनवला आहे. मुखवट्यावर दिसणार्‍या निळ्या पट्ट्या एक प्रकारच्या काचेपासून बनल्या आहेत.. भुवया आणि काजळ मात्र अफगाणिस्तानमधून नेलेल्या एका खास द्रव्यापासून बनल्या आहेत.. डोळे बनवताना एक प्रकारची काच वापरली आहे..
मुखवट्याच्या कपाळावर आपल्याला दोन देवी दिसतात. एकीचं डोकं गिधाडाचं आहे तर दुसरीचं नागाचं.. गिधाडाचं डोकं असणारी देवी इजिप्तच्या वरच्या भागात असायची तर नागाचं डोकं असणारी इजिप्तच्या खालच्या भागात.. तुतानखामेनचं इजिप्तच्या सर्व भागावर राज्य होतं असं या दोन देवींमुळं स्पष्ट होतं.
तुतानखामेनचे कान टोचलेले दिसतात. त्याच्या लहानपणी, इजिप्तमधल्या इतर मुलांप्रमाणेच तोही कानामध्ये काहीतरी दागिना घालत असावा असं समजलं जातं.. तुतानखामेनची दाढी खोटी आहे.
१९२२ ला ब्रिटीश पुरातत्वशास्त्रज्ञ हावर्ड कार्टर ह्यानी सर्वप्रथम ह्या कबरेचा शोध अपघाताने लावला. त्याना पाणी देणारा मुलगा एका पायरी ला ठेचाळला. ती पहीली पायरी होती जी रामसेस ६ च्या कबरीच्या प्रवेशद्वाराकडेच होती. तीथे खोदकाम करून कबरीकडे जाणाऱ्या सोळा पायऱ्या सापडल्या. आणी तेहतीसशे वर्षे जुनी तुतानखेमून ची कबर आतल्या ५ हजाराहून अधीक वस्तुंसह मिळाली. कबरेच्या दरवाजाला दोरी लावून तुतनखामुन चा सील लावलेला होता. आतल्या कबरीत चार रूम होते. त्यात असंख्य सुवर्ण वस्तू होत्या. तुतनखेमून चा ममी ३ सोन्याच्या मोठ्या रूम वजा बाॅक्स मध्ये होते. तुतान खेमून च्या ममीवर ११ किलो सोन्याचा मुखवटा होता. जो आज जगप्रसिध्द आहे. ह्या कबरीचा शोध प्राचीन ईतीहास संशोधनातला महत्वाचा टप्पा मानला जातो. ह्या शोधाने हॉवर्ड कार्टर ना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. तुतनखेमून ला त्याच्या काळात जितकी नसेल तितकी प्रसिद्धी आता मिळाली. जगभर प्रवास करून नंतर ममी ला पुन्हा KV62 ह्या तिच्या सापडलेल्या जागी पुन्हा ठेवण्यात आले. कबरीतील संग्रहीत वस्तू सध्या कैरो च्या वस्तुसंग्रहालयात आहेत.
तुतान खेमून च्या ममीचा १९६८ साली एक्स रे करण्यात आला होता. त्यात कळलं की कवटीला मार लागलाय. ह्या मुळे असा निष्कर्श निघाला की त्याचा खुन झाला असावा पण २००६ ला पुन्हा ममीचा सिटी स्कॅन केला गेला त्यात कळलं की डाव्या पायाला जखम होऊन त्यातून जंतूसंसर्ग होऊन त्याचा मृत्यु झाला असावा. काही ठिकाणी मलेरीया मुळे मृत्यु झाला असाही निष्कर्ष काढला जातो.
१९२२ ला हावर्ड कार्टर ह्यानी कबरीवरील भिंतीला भोक पाडून आतला साडेतीन हजार वर्षांपासून कोंडला गेलेला विषारी वायु मुक्त केला. एक मेणबत्ती पेटवून आत डोकावले थोड्या वेळाने त्याना शोधासाठी पैसे पुरवनारा कारनार्वन ने जेव्हा त्याना विचारलं की आत काही दिसतंय का? तेव्हा कार्टर चे ऊद्गार होते “yes, wonderful things”.
आत सापडलेल्या वस्तू बाहेर काढण्याचं काम १९३२ पर्यंत चाललं. शोधा नंतर कबरीत गेलेल्या अनेकांचा मृत्यु झाला. ह्या मागे ममीचा कर्स( शाप ) असल्याचा निष्कर्ष अनेकांनी काढला. पण १९८६ साली एका शास्त्रज्ञाने विज्ञानाधारीत कारण देत सागीतलं की साडेतीन हजार वर्षे जुन्या ममी मुळे अनेक विषारी बुरशी तयार झालेल्या असु शकतात. त्याचा शरीरावर परिणाम होऊन अनेकांचे जिव गेले असतील.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माहितीपूर्ण लेख. ह्या तुतनखामुन बद्दल ब्रिटीश माध्यमांतून अजूनही चवीचवीने चर्चा/गॉसिप सुरु असते. २००६ च्या आधी बीबीसी वर Who Killed Tutankhamun? नावाची डॉक्युमेंटरी प्रसारित झाल्याचे आठवते. कवटीला लागलेल्या मारावरून त्याच्या खुनाची थियरीच त्यांनी उचलून धरली होती. त्याच्या परिवारापैकी जवळच्या कुणीतरी त्याचा खून केला असावा असे काहीसे त्यात दाखवले होते.

विजय देवधरांचं स्फिन्क्स नावाचं एक अनुवादित पुस्तक वाचल होतं त्यामध्ये या तुतानखामेन च्या ममी चा उल्लेख होता आणि त्याभोवती च कथा होती. बाकी डिटेल्स आठवत नाहीयेत

विजय देवधरांचं स्फिन्क्स नावाचं एक अनुवादित पुस्तक वाचल होतं त्यामध्ये या तुतानखामेन च्या ममी चा उल्लेख होता >>>>
त्यात कोणत्यातरी राजाचे थडगे कसे एकसिडेंटली शोधले गेले याची (बहुदा काल्पनिक) कथा होती.
इजिप्तशिअन पुराणवस्तूंचे स्मगलिंग, खात्याची अनास्था वगैरे बरेच विषय होते त्यात

छान माहिती.
कर्स ऑफ ममी म्हणजे कार्बन मोनॉक्साईड चे स्लो पॉयझनिंग पण असू शकेल, अनेक वर्षे कबरी बंद असल्याने.

हे तुतनखामुन कुठे तरी ऐकल्या सारखे वाटत होतं...
आता आठवलं अनकसुनामुन असं आहे ते, मम्मी मूव्हीमधली लेडी व्हिलन.

अरे वा! इजिप्त हा अगदी जिव्हाळ्याचा विषय. लेख आवडला. अजून वाचायला आवडेल.

>> देवी कुठल्या दोन ते नाही समजले.. म्हणजे मुखवट्यावर नाही सापडल्या.
>> Submitted by सीमंतिनी on 27 October, 2020 - 06:49

मुखवट्याच्या फोटोमध्ये त्या स्पष्ट दिसत नाहीत. पण क्लोजअप फोटो असा आहे:

King Tut crown goddesses

गिधाड म्हणजे वाजेट (Wadjet) देवता, खालच्या इजिप्तवर प्रभाव असलेली
नाग म्हणजे नेख्बेत (Nekhbet) देवता, वरच्या इजिप्तवर प्रभाव असलेली

(संदर्भ: https://www.gemselect.com/other-info/king-tuts-tomb-of-treasures.php)