Index Investing भाग २:- क्या म्युच्युअल फंड सही है?

Submitted by अतरंगी on 5 October, 2020 - 15:09

आजमितीला मध्यमवर्गीय माणसाकडे असलेले विविध गुंतवणुकीचे पर्याय दिवसेंदिवस कमी होत आहेत. FD चे रेट ५ ते ६ टक्क्यात आले आहेत आणि महागाई त्याच्यापेक्षा जास्त पटीने वाढत आहे. FD मध्ये पैसे ठेऊन निवांतपणे व्याजावर दिवस काढणे अतिशय अवघड होता जाणार आहे. विशेषतः शहरात राहणाऱ्या लोकांना त्याची जास्त झळ बसते, बसणार आहे. 

मध्यमवर्गीय माणसाकडे इक्विटी सोडून inflation वर मात करण्याचा अजून बहुपरीचित  उपाय म्हणजे सोने. सोने या विषयावर माबोवर बरीच चर्चा झालेली आहे. त्यामुळे सध्या तिकडे वळत नाही. माझ्या मते सोने, debt फंड्स आणि इक्विटी मार्केट या मध्ये विभागून गुंतवणूक करणे जास्त सोयीस्कर आहे. मार्केट कंडिशन प्रमाणे तिन्हींचे वेटेज कमी जास्त करत राहायला हवे. ज्याला सोने , इक्विटी, debt यातलया कोणत्या instrument ला कधी आणि किती वेटेज द्यायचे कळले तो यशस्वी गुंतवणूकदार Happy

रिटेल,नोकरदार गुंतवणूकदारांना इक्विटी मध्ये गुंतवणूक करताना म्युच्युअल फंड हा पर्याय बराच सोयीचा पडतो. शिवाय म्युच्युअल फंडचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात SIP द्वारे दर महिन्याला आपल्याला शक्य असलेली ठराविक रक्कम गुंतवता येते. मार्केट मध्ये हजारो कंपन्या लिस्टेड आहेत. त्यातल्या कोणत्या कंपन्या चांगल्या, कोणाचे शेअर्स घ्यायला हवे, कधी घ्यायला हवे, किती प्रमाणात घ्यायला हवे हे कसे ठरवणार आणि ते बरोबर आहे हे नक्की कसे कळणार? शिवाय आपले नोकरी व्यवसाय सांभाळून आपण  हे सगळे कसे मॅनेज करणार या अनेक समस्यांमुळे आपण म्युच्युअल फंड कडे वळतो. पण मागील भागात लिहिल्या प्रमाणे म्युच्युअल फंड हा पर्याय खरेच जाहिरात केला जातो तितका विश्वासार्ह आहे का? मागच्या भागात मी एक दोन ओळीत म्युच्युअल फंड्सच्या रिटर्न विषयी लिहिलं होतं ते अजून थोडेसे विस्तृतपणे लिहितो.
आत्ता मार्केट मध्ये उपलब्ध असलेले एकूण फंड्स १०४५. त्यातले ५७१ हे इक्विटी आणि हायब्रीड फंड्स आहेत. थोडावेळ आपण debt, Gold   फंड्स बाजूला ठेऊ कारण ते इक्विटी बेस्ड नसतात, आणि index फंड, ETF पण विचारात घेत नाही कारण ते passively managed असतात.

५७१ इक्विटी आणि हायब्रीड फंड्स पैकी ३११  फंड्स चा १० वर्षांपेक्षा अधिकचा डेटा उपलब्ध आहे, म्हणजे ते १० वर्षांपेक्षा जुने आहेत. त्यातील फक्त १३५ फंड्सने निफ्टी ५० पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत. आणि या ३११ फंडस पैकी फक्त ८ फंड्सने गेल्या १० वर्षात  Nifty Alpha Low Volatality ३० आणि Nifty २०० momentum  ३० पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत.*

याच प्रकारे जर ५ वर्षांचा विचार केला तर ४२६ फंड्सचा  ५ वर्षांपासून अधिक काळचा डेटा उपलब्ध आहे. या ४२६ फंड्स पैकी  फक्त ७३ फंड्स ने  Nifty Alpha Low Volatality ३० पेक्षा जास्त आणि फक्त १९ फंड्स ने  Nifty २०० momentum  ३० पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत.*

जर इतके कमी फंड्स Nifty Alpha Low Volatality ३० आणि Nifty २०० momentum  ३० या दोन इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न देत असतील तर मग आपण म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करणे कितपत योग्य आहे ?

हे झालं फक्त रिटर्न्सचं, आता मला वाटत असलेले म्युच्युअल फंड मधले बाकी इश्युज....

१. प्रत्येक फंड जेव्हा मार्केट मध्ये येतो तेव्हा त्याची थीम, त्याचे बाकी डिटेल्स प्रकाशित केले जातात, गुंतवणूकदारास उपलब्ध करून दिले जातात. पण त्या प्रकारे ५ ते १० वर्षे  गुंतवणूक करून किती रिटर्न मिळाले असते हे कुठेही लिहिलेले नसते. जेव्हा आपण  एखाद्या NFO मध्ये पैसे टाकतो  तेव्हा बर्याचदा त्या थीमचे पास्ट रिटर्न उपलब्ध नसतात.

२. फंड मॅनेजर कोणता स्टॉक घेणार, का घेणार, कधी घेणार, किती विकणार, कधी विकणार, का विकणार, स्टॉक घ्यायचा आणि विकायचा क्रायटेरिया काय या बद्दल आपल्याला काहीही माहिती नसते.

३. प्रत्येक फंडचा एक्सपेन्स रेशिओ ठरलेला आहे, काही काही फंड्स चा एक्स्पेंस रेशिओ तर २ ते २.७५ टक्के आहे. तो माझे पैसे गुंतवणार, स्वतःचे कमिशन घेणार आणि मग उरलेले रिटर्न मला देणार. माझ्या गुंतवणुकीवर २ ते २.७५ टक्के कमिशन घेऊन काम करणाऱ्या माणसावर माझा काही कंट्रोल नाही. त्याला कामावर ठेवणे किंवा काढणे एवढेच माझ्या हातात आहे. आणि शिवाय मला किती रिटर्न मिळणार हे त्याच्या माहिती, ज्ञान, जजमेंटवर अवलंबून आहे. त्याची काम करण्याची स्टॉक निवडण्याची पद्धत काय आहे आणि किती शास्त्रशुद्ध आहे ते मला माहित नाही.

४. म्युच्युअल फंड्सचे होल्डिंग्स:- कित्येक वेबसाईटवर तुम्हाला मुच्युअल फंडचे होल्डिंग बघायला मिळतील. त्यातील स्टॉक लिस्ट बघितली त्यात अनेक स्टॉक असे आहेत कि ज्याचे वेटेज ०.५%, १% वगैरे असते आणि काही काही  म्युच्युअल फंड मध्ये ५०, १०० स्टॉक पण आहेत. ०.५%, १% वेटेज असणारा स्टॉक टोटल रिटर्न वर असा काय परिणाम करतो कि जेणे करून तो त्या फंड मध्ये आहे? क्वॅलिटी ऑफ स्टॉक विषयी मी फार प्रभुत्वाने बोलू शकणार नाही,  पण तो मुद्दा सुद्धा विचारात घ्यायला हवा.

५.खरेदी विक्री वरील बंधने.:- तुम्ही केलेल्या SIP चे पैसे ज्या दिवशी फंड  हाऊस कडे जातील त्या दिवशीची NAV तुम्हाला मिळणार. शिवाय फंड मध्ये गुंतवलेले पैसे काढणे वेळखाऊ काम आहे.  शिवाय तुम्ही पैसे कधी काढत आहात त्यावर exit लोड पण विचारात घ्यावा लागतो.  

आपण जर नीट विचार केला तर वरील सगळे प्रॉब्लेम इंडेक्स फंड किंवा ETF मध्ये गुंतवणूक केल्याने सुटतात

१. Nifty Alpha Low Volatility ३० आणि Nifty २०० momentum  ३० या दोन इंडेक्स चे रिटर्न कित्येक फंड्स पेक्षा जास्त आहेत ते मी वर लिहिले आहेच. या दोन इंडेक्स मध्ये कोणता स्टॉक येणार, त्याचा क्रायटेरिआ काय, त्याचे वेटेज कसे ठरणार, कोणता स्टॉक जाणार, कधी जाणार, त्याचा क्रायटेरिआ काय हे सगळे निफ्टी च्या वेबसाईट वर स्वच्छ लिहिलेले आहे. उगीच कोणाच्या तरी विचारक्षमतेवर अवलंबून स्टॉक ची खरेदी विक्री होत नाही. स्टॉकची एंट्री, एक्झिट, वेटेज याची पद्धत objective, well defined  आहे.
या दोन्ही इंडेक्स चे गेल्या १५ वर्षांचे रिटर्न ( बहुदा back calculate करून)  निफ्टी ने त्यांच्या वेबसाईट वर दिले आहेत.

२. कमी एक्स्पेंस रेशिओ असलेले इंडेक्स फंड मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. आपण ज्या इंडेक्स मध्ये पैसे गुंतवणार हे माहित असल्यास त्यातील कमी एक्स्पेंस रेशिओ असलेले फंड निवडून त्यात गुंतवणूक करता येते. फंड हाऊस, फंड मॅनेजर कोणतेही असले तरी फरक पडत नाही कारण शेवटी त्यांना इंडेक्स मध्ये जे स्टॉक ज्या प्रमाणात आहेत तेच त्या प्रमाणातच घ्यावे लागणार.

३. Nifty Alpha Low Volatility ३० आणि Nifty २०० momentum  ३० मध्ये जास्तीत जास्त ३० स्टॉक असणार आहेत.

४. आपण ज्या इंडेक्स मध्ये पैसे गुंतवणार आहोत तो जर ETF स्वरूपात उपलब्ध असेल तर आपण तो आपल्या सोयी प्रमाणे हवा तेव्हा विकू शकतो, विकत घेऊ शकतो. मी ज्या दिवशी तो विकला त्याच्या T+२ ला त्याचे पैसे माझ्या खात्यात जमा होतील.
शिवाय जर व्हॉल्यूम चांगला असेल तर ट्रेड, स्विंग ट्रेड करून, फ्री युनिट्स गोळा करणे, आपल्याकडे असलेल्या युनिट्सची सरासरी किंमत कमी करणे हे सर्व पण करता येऊ शकते.
मार्केट महाग असल्यावर युनिट्स विकून टाकणे आणि मार्केट ५ ते १० टक्के पडले कि तेच परत घेणे हे पण पर्याय उपलब्ध आहेत. खरेदीचे टायमिंग साधून, ट्रेड करून आपल्याकडील युनिट्सची सरासरी किंमत कमी करणे  या विषयी पुढील एखाद्या भागात विस्तृतपणे लिहितो.

लेख अजून लांबू नये म्हणून  मला म्युच्युअल फंड गुंतवणुकीमधल्या न पटलेल्या अजून काही गोष्टी टाळत आहे. मी आजकाल कोणताही गुंतवणुकीचा पर्यात समोर आला कि खालील प्रश्न विचारतो, विशेषतः जर म्युच्युअल फंड किंवा इक्विटी लिंक्ड कोणतेही प्रोडक्ट जर विचारात घ्यायचे असेल तर. तुम्ही जर फंड मध्ये गुंतवणूक करणार असाल करत असाल तर  खालील प्रश्न स्वतःला/ गुंतवणूक सल्लागाराला, म्युच्युअल फंड विक्रेत्याला नक्की विचारा.

१. फंड कोणते स्टॉक घेणार, काय प्रमाणात घेणार, त्याचा क्रायटेरिया काय? फंड पोर्टफोलिओ रिबॅलेन्स करण्याची फ्रिक्वेन्सी, पद्धत काय असणार आहे?
२. ज्या पद्धतीचे, पद्धतीने स्टॉक सिलेक्शन होणार आहेत त्यावर आधी काही डेटा उपलब्ध आहे का? तसे केल्यास किती रिटर्न येतात? ते Nifty Alpha Low Volatility ३० आणि Nifty २०० momentum  ३० पेक्षा जास्त आहेत का?
३. फंडाचा  एक्सपेन्स रेशिओ, एक्झिट लोड किती आहे. तुम्हाला जर म्युच्युअल फंडचे युनिट्स रीडिम करायचे असतील तर प्रोसेस काय आहे त्याला किती दिवस लागतात.?      
४. फंड मॅनेजर कोण आहे? फंड हाऊसचे रेप्युटेशन कसे आहे?  फंड मॅनेजर आणि फंड हाऊसने आधी मॅनेज केलेल्या फंड्स चे रिटर्न आणि turnover ratio काय आहे?
५. पोर्टफोलिओ मधील स्टॉकचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त वेटेज काय असणार आहे?  
६. Setoral, market cap  allocation किती आणि कसे केले जाणार आहे?
७. बेंचमार्क इंडेक्स कोणती आहे?  

म्युच्युअल फंड घेताना तुम्ही कष्ट करून कमावलेले पैसे तुम्ही कमिशन देऊन एका माणसाला मॅनेज करायला देत आहात. ज्या पैशांवर आपले/आपल्या मुलांचे फ्युचर, निवृत्तीनंतरचे उत्पन्न अवलंबून आहे ते पैसे कोणाच्याही सांगण्यावरून चुकीच्या ठिकाणी गुंतवू नका. स्वतःचा गृहपाठ करून डोळसपणे गुंतवणूक करा.

* सर्व रिटर्न १ oct २०२० च्या बंद भावानुसार calculate केले आहेत.

माहितीचा स्रोत:-
https://www.niftyindices.com
www,rupeevest.com  

Disclaimer:-

मी सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागार किंवा आर्थिक सल्लागार नाही. माझ्याकडे शेअर मार्केट, आर्थिक गुंतवणुकीसंबंधित काहीही पात्रता नाही. वर लिहिलेली सर्व माहिती एक शेअर मार्केटचा अभ्यास या दृष्टीने केलेली आहेत. वर लिहिलेल्या सर्व कॅल्क्युलेशन मध्ये चूक, human error असू शकतो. वरील लिखाणावर विसंबून कोणीही गुंतवणूक करू नये. केल्यास, लेखक जबाबदार नाहीत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना आपल्या सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती२, तुम्ही लिहिलंय ते मान्य आहे. माहीत ही आहे. पण ते अधिक थिअॉरीटिकल आहे.
उद्या अधिक माहितीसह लिहितो.

जेंव्हा मार्केट पडते व फ़ंडची युनिट व्हॅल्यू ढासळते तेंव्हाच खरे तर फायदा होतो

कारण तुमच्या पैशात जास्त युनिट बसतात व पुढे मार्केट वाढले की तेच फायदा देऊन जातात

पण ती वेळ साधणं कसं जमेल? मार्केट नक्की कधी पडणार, यापुढे आणखी पडणार नाही अशी वेळ कशी साधणार?

गेल्या एका वर्षात निफ्टी ६१.५१ % वधारला. या काळात सगळ्यात जास्त वाढलेले निफ्टीपैकी शेअर्स JSW Steel 349.73 % ,
Tata Steel 345.73 % , Tata Motors 288.29 % , Hindalco 263.62 %
या चार च शेअर्सच्या किंमती तिपटीपेक्षा अधिक झाल्या.

मी गेल्या एका वर्षांतल्या क्लोजिंग प्राइसे सच्या सरासरीची तुलना त्या वर्षीच्या आधीच्या वर्षीच्या (११.०५ .२०१९ ते १०.०५.२०२०) सरासरीशी केली . निफ्टी ची सरासरी ११.५३% वाढली. JSW Steel ४२.३७% , Tata Steel 33.46 % , Hindalco 24.80 %

या निकषावर हे शेअर्स अनुक्रमे ८ . १० , १८ व्या क्रमांकावर आहे. सरासरीत सगळ्यात जास्त वाढ नोंदवणारे शेअर्स निफ्टीत आताच आलेत. टाटा कन्झ्युमरस आणि डिव्हिज लॅब. मग डॉ रेड्डीज आणि सिप्ला

म्हणजे मेटल सेक्टरमधली वाढ तुलनेने आताची आहे. नक्की कधीपासून आउट पर्फॉर्मन्स सुरू झाला तेही पाहता येईल.
म्युच्युअल फंडांच्या ताज्या पोर्टफोलियोत मेटल सेक्टरचे प्रमाण पुन्हा पाहेन. हे पोर्टफोलियो एकेका महिन्याने जाहीर केले जातात.

इंडेक्स मधले अंडर परफॉर्मर बाहेर काढतात व नवीन एड करतात

मला वाटते आल्या आल्या दिवशी फक्त टीसीएस इंडेक्स मध्ये आला होता

>>मी mutual fund diversified equity fund बद्दल बोलतोय.>> तो मॅनेज्ड फंड आहे की इंडेक्स फंड. त्याची स्टाईल काय आहे? ग्रोथ, वॅल्यू की ब्लेंड?

निफ्टि आणि त्यातल्या तीन मेटल स्टॉक्सची गेल्या एका वर्षासाठी तुलनाmetal.png
तीनही स्टॉक्सनी निफ्टीच्या तुलनेत वर्षभर सतत सरस कामगिरी केली आहे. नोव्हेंबरपासून निफ्टीच्या बरीच पुढची झेप घेतली.
निफ्टीमध्ये मेटल सेक्टरचं वेटेज ३.६५ % आहे. (या तीन कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशनची आकडेवारी पाहिलेली नाही)

माझ्या पोर्टफोलियोचा इक्विटी भाग ७४.६६% आहे. त्यातले सेक्टर फंड बाजूला केले तर उरलेल्या इक्विटीत १.४३% मेटल सेक्टरमध्ये आहे.
माझ्याकडे दोन असेट अलोकेशन फंड, एक लार्ज कॅप, एक फ्लेक्झि कॅप आणि एक थीमॅटिक (एम एन सी) असे डायव्ह्र्सिफाइड इक्विटी फंड्स आहेत. या प्रत्येक फंडाने त्या त्या कॅटेगरी त ल्या सगळ्या फंडांच्या तुलनेत मेटल सेक्टरमध्ये कमी गुंतवणूक केली आहे.
तरीही प्रत्येक फंडाने गेल्या एका वर्षात कॅटेगरीच्या तुलनेत थोडे अधिक रिटर्न दिले आहेत. त्यामुळे फंड मॅनेजरांनी मेटक सेक्टरकडे दुर्लक्ष केलं असलं तरी रिटर्नच्या बाबतीत तक्रारीला फार वाव नाही.

आता पडलेले नवे प्रश्न

म्हणजे मेटल सेक्टर हा नगण्य सेक्टर मानावा का? की निफ्टीपेक्षा अधिक ब्रॉड बेस्ड इंडेक्समध्ये मेटल सेक्टरचे प्रमाण पाहावे?

भरत सर तुम्ही एका वर्षाचा डेटा विचारात घेताय. फंड मॅनेजर किमान मागच्या दहा पंधरा वर्षाचा परफॉर्मन्स बघत असावेत. comp.JPG

चर्निंग पण करत असतीलच ना.
आता माझ्या फंडस नी त्यांच्या कॅटेगरीपेक्षा मेटल सेक्टरला कमी वेटेज ठेवलंय. म्हणजे काही फंड जास्त वेटेजही देतच असतील. अगदी १०-१५% नको पण निफ्टीत आहे तेवढं किंवा त्यापेक्षा थोडं जास्त.
एनीवे. एक मेटल शेअर घेतला आहे. त्यात चांगले रिटर्न्स आहेत.

भरत,
तुलना करताना निफ्टीची कामगिरी आणि आपण निवड केलेल्या मेटल सेक्टर मधल्या ३ स्टॉक्सची कामगिरी अशी नाही करायची. तुलना करताना मेट्ल सेक्टर मधले इतर कंपन्यांच्या तुलनेने या तीन स्टॉक्सची कामगिरी असे बघायचे.
ब्रॉड बेस्ड इंडेक्स बद्दल बोलायचे तर माझ्याकडे इथला ५०० इंडेक्स फंड आहे. त्यात मार्केट वेटेजपेक्षा .२५ -.३५% कमी वेटेज बेसिक मटेरियल्स(देशात मेटल) आहे. म्हणजे मार्केट वेटेजच्या आसापास आहे. मात्र मॅनेज्ड फंड आहेत त्यात गुंतवणूकीची पद्धत आणि मॅनेजर स्टाईल नुसार फरक आहे. एक जुन्या पद्धतीचा वॅल्यू फंड आहे. त्या प्रकारच्या फंडात बेसिक मटेरियल्सचे जेवढे वेटेज असते त्या पेक्षा कमी (जवळ जवळ १/३) या फंडात वेटेज आहे. हा मॅनेज्ड फंड आहे आणि त्यांची तीच स्टाईल आहे. अजून एक असाच जुन्या पद्धतीचा ग्रोथ फंड आहे . ते बेसिक मटेरियल्स मधे गुंतवणूक करतच नाहीत. पुन्हा मॅनेजर स्टाईल. तीनही फंड्स माझ्याकडे २०+ वर्षे आहेत.

FAMA's Performance attribution

जर आपण बेंचमार्क सोबत तुलना करत असू तर मग ती दोन प्रकारे करायला हवी.

बेंचमार्क मधले (सेक्टरल) अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन विरुद्ध पोर्टफोलिओ (सेक्टरल) अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन:-
यामधे कळते की पोर्टफोलिओ मधील आणि बेंचमार्क मधील सेक्टरल वेटेज मधील फरका मुळे माझ्या पोर्टफोलिओ वर किती परिणाम झाला.

बेंचमार्क मधले (सेक्टरल) अ‍ॅसेट रिटर्न विरुद्ध पोर्टफोलिओ (सेक्टरल) अ‍ॅसेट रिटर्न:-
यामधे कळते की पोर्टफोलिओ मधील आणि बेंचमार्क मधील स्टॉक सिलेक्शन मधील फरका मुळे माझ्या पोर्टफोलिओ वर किती परिणाम झाला.

मी https://www.rupeevest.com/Mutual-Fund-Holdings/100470 ईथे पाहिलं तर टाटा स्टील मधे गेल्या जानेवारी ते मार्च मधे म्युच्युअल फंडची गुंतवणूक वाढली आहे असे दिसत आहे. ११,५२,१३,३१९ वरुन १३,५६,६३ ,८११, म्हणजे २०% तरी वाढ आहे.

ईथे https://www.screener.in/company/TATASTEEL/consolidated/#shareholding पाहिल्यास मागच्या ३ महिन्यात फक्त FII ने त्यांची गुंतवणूक वाढवलेली दिसत आहे. मागच्या सहा महिन्यात त्यांचे होल्डिंग ११.४५% वरुन १८.५६% वर गेलेले दिसत आहे आणि DII २९.८७ वरुन २६.१६ वर आले आहेत. पब्लिकचे शेअर्स पण कमी झाले आहेत.

मागच्या ६ महिन्यात फक्त FII नी जोरदार खरेदी केली बहुतेक. Happy

अतरंगी, मला काय विचारायचं आहे, हे तुम्हांला नेमकं कळलं. तसंच मानलं तुमच्या अभ्यासाला . तुमच्या शेवटच्या प्रतिसादांत दिलेली माहिती बातम्यां च्या रूपात वाचायला , ऐकायला मिळते. ती कशी शोधायची हे माहीत नव्हतं, खरं तर आपल्यालाही शोधता येईल असा विचारच केला नव्हता.

आता बाकीच्यांसाठी माझा प्रश्न थोडा वेगळ्या रूपात. प्रश्न आहे म्हणजे मला उत्तर हवंय असं नाही. ते अतरंगी यांनी दिलं आहे. प्रश्नाचा रोख अतरंगी यांनी मूळ लेखात मांडले ल्या मुद्द्यांना धरून आहे. त्या मुद्द्यांचं प्रत्यक्षातलं उदाहरण .

मी लघु- मध्यम अवधीसाठी निफ्टीतलेच शेअर्स घेणं पसंत करतो. त्यासाठी निवड करताना लक्षात आलं की मेटल सेक्टरमधले शेअर्स खूपच वधारताहेत. खूप म्हणजे किती ते आधीच्या एका प्रतिसादात आलंय.

एन एस ईचे सेक्टर इंडायसेस पाहिले तर बाकीच्या सेक्टर्सनी गेल्या वर्षात २७% ते ८८% इतके रिटर्न्स दिलेत. तिथे मेटल सेक्टरने २००$ रिटर्न दिलेत. आता हे ढळढळीत दिसत असूनही (मी गुंतवणूक केलेल्या) फंड मॅनेजर्सनी मेटल सेक्टरचं वेटेज का वाढवलं नसावं?
यामागे काही फंडामेंटल्स आहेत का हा मुद्दा पुढे.

या निमित्ताने आपण घेतलेल्या फंड्सची कामगिरी कशी जोखायची हे मला आणखी सूक्ष्मात कळलं. आतापर्यंत फक्त रिटर्न्स, बेंचमार्क, कॅटेगरीशी तुलना यापलीकडे विचार केला नव्हता. धन्यवाद अतरंगी.

त्यांना माझ्यापेक्षा जास्त समजावं अशी अपेक्षा असते म्हणूनच त्यांच्याकडे पैसे देतो . आणि मला आज जे समजलंय ते त्यांतल्या अनेकांना अजूनही समजल्याचं दिसत नाही.

मानलं तुमच्या अभ्यासाला>>>> +१११११
त्यांना माझ्यापेक्षा जास्त समजावं अशी अपेक्षा असते म्हणूनच त्यांच्याकडे पैसे देतो>>>> सुरवातीला हा प्रश्न मलाही पडायचा. म्हणजे जे कॉल देतात कि अमुक तमुक शेअर घ्या ते एवढे एक्सपर्ट असतात तर ते शेअर मार्केटमध्ये जॉब का करतात. म्हणजे घरीच बसून ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट का नाही करत.
रच्याकने ईद तर आज आहे मग मार्केटला काल का सुट्टी होती?

कोविडचा पेशन्ट जगणार की मरणार , हे दोक्तरला जितके समजते,
व्हेक्सींन किती टक्के गुणकारी आहे , हे पुनावाल्याला किती समजते,

तितकेच , फंड तज्ञांला फंडबद्दल आधी समजत असते, कुणालाच 100 % समजत नाही

बेंचमार्क मधले (सेक्टरल) अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन विरुद्ध पोर्टफोलिओ (सेक्टरल) अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन:-
यामधे कळते की पोर्टफोलिओ मधील आणि बेंचमार्क मधील सेक्टरल वेटेज मधील फरका मुळे माझ्या पोर्टफोलिओ वर किती परिणाम झाला.

बेंचमार्क मधले (सेक्टरल) अ‍ॅसेट रिटर्न विरुद्ध पोर्टफोलिओ (सेक्टरल) अ‍ॅसेट रिटर्न:-
यामधे कळते की पोर्टफोलिओ मधील आणि बेंचमार्क मधील स्टॉक सिलेक्शन मधील फरका मुळे माझ्या पोर्टफोलिओ वर किती परिणाम झाला.>>>>>>>>>>>>>

हे करण्याची पद्धत.

Wb= weight of sector in benchmark
Rb=return of sector in bechmark
Wp= weight of sector in MF/portfolio
Rp=return of sector in MF/portfolio

Bechmark returns= summation of Wb*Rb for each sector

MF/portfolio return= summation of Wp*Rp for each sector

excess return generated by fund/portfolio= summation of (Wp*Rp) for each sector - summation of (Wb*Rb) for each sector

if we solve the equation above.

excess return generated by fund/portfolio= summation of ((Wp-Wb)*Rb) + summation of ((Rp-Rb)*Wp) for each sector.

in above equation
summation of (Wp-Wb)*Rb) will tell you the effect of sectoral allocation on your MF/portfolio return

summation of (Rp-Rb)*Wp) will tell you the effect of selection of stock from that particular sector on your MF/portfolio return.

म्हणजे जर,

बेंचमार्क मधे मेटल सेक्टर ५% आहे. आणि बेंचमार्क मधील मेटल सेक्टर चा रिटर्न ३.५% आहे.
फंड मधे मेटल सेक्टर ४% आहे. आणि फंडमधे मधील मेटल सेक्टर चा रिटर्न ४% आहे.

म्हणजे माझ्या फंडने मेटल सेक्टर मधे बेंचमार्क पेक्षा (४*४)- (५*३.५)= -१.५% मिळवले आहेत. ही संख्या ऊणे आली म्हणजे कमी कमविले आहेत. पण मग माझा रिटर्न सेक्टरल अ‍ॅलोकेशन मुळे कमी आला की स्टॉक सिलेक्शन मुळे?

तर वरिल ईक्वेशन प्रमाणे,

(४-५ )*३.५= -३.५ म्हणजे माझ्या सेक्टरल अ‍ॅलोकेशन चे रिटर्न बेंचमार्क पेक्षा कमी आहे.

(४-३.५)* ४= २ म्हणजे माझे स्टॉक सिलेक्शन चे रिटर्न बेंचमार्क पेक्षा चांगले आहे.

त्यामुळे जर मला बेंचमार्क पेक्षा जास्त रिटर्न कमवायचे असतील तर मला फक्त माझे सेक्टरल अ‍ॅलोकेशन वाढवायचे आहे. माझे स्टॉक सिलेक्शन बेंचमार्क पेक्षा चांगले आहे.

हे जर प्रत्येक सेक्टर साठी केले तर मग फंड सेक्टरल अ‍ॅलोकेशन मुळे अंडर परफॉर्म करत आहे की स्टॉक सिलेक्शन मुळे हे कळते.

>>नवीन Submitted by अतरंगी on 14 May, 2021 - 06:18>> किती छान सोपे करुन सांगितलेत! धन्यवाद.

भरत,
>>फंड मॅनेजर्सनी मेटल सेक्टरचं वेटेज का वाढवलं नसावं?>>
एखाद्या सेक्टरची जोखीम आणि मिळणारा परतावा याच्याशी त्या फंड मॅनेजरची गुंतवणूकीची फिलॉसॉफी मेळ खात नसेल तर केवळ थोड्या कालावधीच्या परताव्यासाठी वेटेज नाही वाढवणार. म्हणजे ग्राहक म्हणून मला तरी असे एकदम वेटेज वाढ्वून त्या फंडची मला अपेक्षित आहे त्या पेक्षा जास्त जोखीम आवडणार नाही. मला त्यांनी जोखिम सांभाळत फिलॉसॉफीला साजेश्या वेटेजमधे योग्य कंपनीत गुंतवणूक करुन चांगला परतावा देणे अपेक्षित आहे. अर्थात काही वेळा अंदाज चुकल्याने संधी गमावली असेही होवू शकतेच.

अतरंगी, तुमचा शेवटचा प्रतिसाद वाचला. वेळ मिळाला तर करून पाहेन.
मेटल सेक्टर जास्तच हाय बीटा दिसतोय. कदाचित यामुळे फंड मॅनेजर दूर राहत असतील.
माझ्या स्टॉकला स्टॉप लॉस लागला. एक महिना संपायला दोन दिवस कमी असताना ९.५% नेट रिटर्न. स्टॉप लॉस लावायला आळस केला नसता तर २०%+ मिळू शकला असता.

ICICI AMC has launched ETF on Nifty FMCG index. NFO period:- 20th July to 2nd August.

लाँग टर्म मधे Nifty FMCG index चा परतावा चांगला आहे. भारतात अजुन FMCG, consumer सेक्टरला वाव आहे.

Nifty FMCG index चा सर्वात महत्वाचा drawback म्हणजे, त्यात ५०% वेटेज हिंदुस्तान युनिलिव्हर आणि ITC या दोन स्टॉकचेच आहे. या दोन स्टॉक्सच्या परताव्याचा Nifty FMCG index वर मोठा परिणाम असणार आहे.
शिवाय सेक्टरल गुंतवणूक असल्याने त्याचाही विचार करायला हवा.

मी कल सेक्टरल गुंतवणूकीकडे फारच कमी आहे. पण मी या NFO ला अप्लाय केलं आहे.

कोटक ने निफ्टी अल्फा ५० ह्या ईंडेक्स वर आधारीत ETF लाँच केला आहे.

जे स्मार्ट बीटा ईंडेक्स फॉलो करतात त्यातील अनेक जण कित्येक या ईंडेक्स वरील ETF/index fund ची आतुरतेने वाट पहात होते. या ईंडेक्स चे पास्ट रिटर्न चांगले आहेत. खालील नंबर्स पुरेसे बोलके आहेत. कित्येक चांगले चांगले म्युच्युअल फंड्स याच्या जवळपास सुद्धा येत नाहीत.

Screenshot 2021-12-01 at 8.19.49 PM.pngScreenshot 2021-12-01 at 8.27.31 PM.png

ही ईंडेक्स मार्केट च्या तुलनेत बरीच वर खाली होते. त्यामुळे ज्यांना short term मधे drawdowns आले तरी चालण्यासारखे आहेत त्यांनी यात गुंतवणूक करायला हरकत नाही.

अधिक माहिती:- https://www.kotakmf.com/Products/nfo/etf-funds/Kotak-Nifty-Alpha-50-ETF/...

कोटक ने या ETF वर आधारित FOF साठी ड्राफ्ट फाईल केला आहे पण अजून पुढे काही झाले नाही. ज्यांना ETF मधे एक रकमी पैसे टाकयचे नसतील किंवा Liquidity विषयी शंका असेल त्यांना FOF साठी वाट पहावी लागेल.

मी आताच सहा महीन्यापुर्वी नोकरी सोडली आहे. मला मिळालेल्या पैशातुन मी काही पैसे इंडेक्स फंड मध्ये गुंतवु शकते का?. जर हो तर कसे एकरकमी की सिप. क्रुपया मार्गदर्शन करावे

मार्केट मधे एक रकमी पैसे गुंतवणे धोकादायक आहे. जर आपण पैसे गुंतवल्यावर मार्केट मधे करेक्शन आले किंवा मार्केट साईडवेज गेले तर आपल्या गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळायला फार वाट पहावी लागू शकते. आणि आत्ता तर मार्केट All time high च्या जवळच आहे.

सिप करत राहणे चांगले.

पण मार्केट अधून मधून करेक्शन देत असते त्यात आत्ता पर्यंत तरी एक साधारण पॅटर्न दिसत आहे.

Picture 1.jpg

हा निफ्टीचा ड्रॉडाऊन चार्ट आहे. यात निफ्टी ५० ईंडेक्स त्याच्या All time high पासून किती खाली आली हे पाहता येते.

काही मोजकी वर्षे सोडली तर मागील २५ वर्षात मार्केटने दर वर्षी १०% पेक्षा जास्त करेक्शन दिले आहे. शिवाय २०-३०-४०% करेक्शन पण ठराविक कालावधीने येत आहेत. पुढील काळात पण हेच असेच होईल असे नाही. आणि बर्‍याच स्मार्ट बीटा इंडेक्सचा ड्रॉडाऊन हा निफ्टी पेक्षा वेगळा आहे, हे पण लक्षात ठेवावे.

पण हिस्टरी रिपिट व्हायचे चान्सेस जास्त आहेत असे मानले आणि जर याचा फायदा करुन घ्यायचे ठरवले तर आपली सिप चालू ठेऊन, मार्केट जेव्हा जेव्हा करेक्शन देईल, तेव्हा थोडे जास्त पैसे गुंतवावे. कदाचित जास्त परतावा मिळू शकेल.

जो पर्यंत मार्केट करेक्शन देत नाही तो पर्यंत लिक्विड फंड्स, चांगल्या Debt Funds मधे पैसे पार्क करुन ठेवता येतील.

त्यासाठी भारत बाँड सिरिज हा पर्यात पहावा. चांगला आहे.

Pages