121clicks.com

Submitted by सामो on 5 October, 2020 - 07:54

https://121clicks.com/category/showcases

बाप रे फोटोग्राफी हे सौंदर्य काय किंवा कुरुपता काय दोन्ही प्रकट करण्याचे किती सामर्थ्यवान माध्यम आहे. काही फोटो सेन्श्युअल आहेत तर काही मेडीटेटिव्ह, कुठे ॲसर्टिव्ह महत्त्वाकांक्षा आहे तर एखाद्या फोटोत. कान किटवणारा अहंकार, कुठे मौन, कुठल्या फोटोत, मूकरुदन आहे, स्वप्ने आहेत तर काही फोटो निव्वळ सरीयल आहेत. ही साईट म्हणजे, काय अप्रतिम संग्रह आहे, शोकेस आहे.
फोटोग्राफर्स चे मनोगत, त्यांच्या कलाकृतीची प्रेरणा, तर निव्वळ गद्य कविता आहेत. व्हेरी पॉवरफुल स्टेटमेन्टस. प्रत्येक फोटोग्राफरने, त्याचा तुकडा काढून सुंदर रीत्या आपल्याला प्रेझेन्ट केलेला आहे.
कुठे हृदयभंगाचे दु:ख आहे तर कुठे संपूर्णत: भिन्न विश्वे एकत्र आलेली आहेत. हे सर्व फक्त कॅन यु बिलीव्ह फक्त एका कलेच्या माध्यमातनं - फोटोग्राफी. प्रत्येक फोटो काहीतरी इन्वोक करतो. तुमच्याशी बोलतो, गाणे गातो, संवाद साधतो. एखादा फोटो किंचाळतो. कुठे दिसते गतानुगतिकता, एका पीढीने दुसऱ्या पीढीला बहाल केलेले परंपरांचे ओझे तर कुठे दिसते नवीन पीढीने तेच झुगारुन दिलेले. काही फोटोंत गावकुसाबाहेरचे समाजाने वाळीत टाकलेले जीव दिसतात तर काही फोटो निव्वळ मुलायम, मखमली निसर्गाचे लेणे लेउन येतात. किती व्यक्तीगत संवाद एखादी कला साधू शकते, ...... जर कलाकार उत्कृष्ट असेल, जर तो सत-चिताशी ट्युनड असेल.
कुठे मैत्री आहे, कुठे करुणा, मानवता आहे तिथेच घृणा. काही फोटोग्राफर्स फक्त सौंदर्य टिपणारे आहेत तर काही दोन्ही टिपतात - सौंदर्यही व कुरुपताही. प्रकाशही, अंधारही. शिखरही, खाईही. कुठे भुर्रकन उडून गेलेला काळ तर कुठे काळाच्या अनंत अवकाशात सस्पेन्ड झालेला सुंदर, अवीट क्षण,
काहीजण म्हणतत प्रार्थना, शब्दांनी करायची असते, काही सांगतत, प्रार्थना मौनातही साधते. कोणी गानसाधनेतून प्रार्थना करतो तर कोणी चित्रकलेमधुन. या सर्व फोटोंमध्ये कुरुपता दाखविणारे, अंगावर येणारे फोटो सर्वात आवडले. व्हेरी फ्यु & फार बिटवीन. पण तसेही आहे त. सौंदर्याचा, मानवी भावनांचा, मूल्यांचा अथक शोध आहे. अतिशय फीअरलेस फोटो वाटले काही. फोटोग्राफरने, मनाचा तळ धुंडालून विषही आणलेले आहे, अमृतही. या फोटोंत मला 'उडान' दिसली पण याच काही फोटोंत निर्भया दिसली.
प्रत्येकाने वैयक्तिक रीत्या आस्वाद घेण्याची ही कला. एखादे छायाचित्र माझ्याशी जे बोलेल, तुमच्याशी वेगळे बोलेल, किती व्यक्तिगत अनुभव आहे. कम्प्लीटली लॉस्ट इन ट्रान्स्लेशन. द्वैतातील एकटेपण अधोरेखीत करणारा. रियली? अद्वैतामध्ये एकाकीपणा असह्य झाले, म्हणुन त्याचे द्वैतामध्ये एव्होल्युशन झाले. त्या द्वैताला तरी एकटेपण कुठे चुकले आहे?
________________________________
हाथरस प्रकरणामुळे, मन फार हळवं झालय, खरं तर हादरलय. कलेक्टिव्ह कॉन्शसनेसमध्ये भयंकर लचका पडलेला आहे. त्यामुळे मन बेचैन झालेले असेल नव्हे आहेच. त्यात या साईटवरील काही फोटो पाहून, हलून गेले आहे. कदाचित मन काही कारणांनी अति रिसेप्टिव्ह झालेले असेल. लेख लिहीताना, काही चुकलं असेल तर क्षमा करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलयं सामो..
फोटो ही सुंदर आहेत परत एकदा निवांतपणे पाहीन..

छान आहे. पण सामो धाग्याचं नाव बदला ना. नाव खूपच मोठं आहे त्यामुळे मोबाईल स्क्रीन लहान करायला लागते धागा वर आला की.