फटाक्यांची भीती

Submitted by मोरपिस on 4 October, 2020 - 05:20

काही लोकांना उंचावरून पाहण्याची, पाण्याची भीती वाटते पण मला लहानपणापासून फटाके आणि त्यांच्या आवाजाची खूप भीती वाटते. एका महिन्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या दिवसात तर जीव रडकुंडीला येते आणि. मी या भीतीमधून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दिवाळी किंवा लग्नाच्या वरतींमध्ये सर्वजण फटाके उडवत मजा करत असतात. तर मी दुसऱ्या बाजूला कानाला हेडफोन लावून बसलेली असते. खूप जण या विषयावरून माझी मस्करी करत असतात. जरा कुठे फटाके वाजले की माझ्या काळजात धडधड वाढते. इंटरनेटवर फटाक्यांची भीती नॉर्मल असल्याचे सांगतात पण प्रत्यक्षात मला खूप अपमानास्पद वाटत. ही भीती कमी करण्यासाठी कोणी मला उपाय सुचवू शकेल का?

Group content visibility: 
Use group defaults

फटाक्यांच्याच नाही तर कोणत्याच भीतीवर कोणताही इलाज आजवर सापडलेला नाही. आवाज येणार नाही असे बघा किंवा शांत जागी दिवाळीकाळात रहा.

मला पण आहे
लहानपणी माझ्या हातात एक पेन्सिल फुटली होती.
पण आता सगळेच पर्यावरण प्रेमी फटाके नको मोड मध्ये असल्याने फार फरक पडत नाही.अगदी फारच आग्रह झाला तर अनार किंवा भुईचक्र लावून येते.लक्ष्मी बॉम्ब वगैरे प्रकरणाची खूप भीती वाटते.बाहेर कोणी लावत असेल तर सर्वात आतल्या खोलीत जाऊन बसते.
अगदी फारच त्रास होत असेल तर प्रोफेशनल हेल्प घ्या.

तुम्ही नॉर्मल आहात. ज्यांना यातून आनंद मिळतो ते नॉर्मल नाही आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. एखादी कृती केवळ सर्वजण करतात म्हणून ती योग्य होत नाही. सुमधुर संगीताचा/आवाजाचा आनंद घेणे हे समजू शकतो. पण कानठळ्या बसवणाऱ्या आवाजातून किंवा स्फोटांतून "आनंद" ज्यांना मिळतो त्यांना खरे तर उपचारांची गरज असते. स्फोट झाल्याचे ऐकून मजा कशी काय येते? असा हा साधा प्रश्न आहे. त्यामुळे...

>> खूप जण या विषयावरून माझी मस्करी करत असतात.

अशा लोकांकडे थेट दुर्लक्ष मारा. तुमच्या आत्मविश्वासावर त्याचा कोणताही परिणाम होऊ देऊ नका.

आसपास चराचर सृष्टीत अनेक जीवांना याचा वास्तविक त्रासच होतो. अनेक दृष्टीने हे अनावश्यक प्रदूषण आहे. याबाबत चारपाच वर्षांपूर्वी लिहिलेल्या माझ्याच एका लेखाची आठवण झाली. हे आवाज खरे तर त्रासदायकच व्हायला हवेत सर्वाना. पण नाही. दुर्दैवाने ह्यात आनंद मानणाऱ्या व्यवस्थेत आपल्याला राहावे लागते व जबरदस्ती आनंद मानावा लागतो.

फक्त इतकेच आहे कि तुमच्यासाठी ते थोडे अधिक त्रासदायक होऊन fobia च्या हद्दीत गेलेत इतकेच. त्यामुळे, या आवाजाचा त्रास होणे हे सामान्यच असले तरी fobia मधून बाहेर येण्यासाठी तज्ञांची मदत घ्या, इतकेच मी म्हणेन.

दुसरा उपाय म्हणजे दिवाळीच्या काळात जिथे त्रास होणार नाही अशा दूर ठिकाणी जाऊन राहणे. माझ्या माहितीत अनेकजण हा त्रास टाळण्यासाठी दिवाळीच्या काळात पर्यटनाला जातात. पण यावर्षी मात्र कोरोना मुळे ते शक्य नाही. यावर्षी कोरोनामुळे अनेक सणांवर परिमाण झाला आहे. त्यामुळे चिंता नको. दिवाळीच्या फटाक्यांमुळे होणारे आवाज यावर्षी कमीच असतील.

मला पण आहे

पण आता सगळेच पर्यावरण प्रेमी फटाके नको मोड मध्ये असल्याने फार फरक पडत नाही.अगदी फारच आग्रह झाला तर अनार किंवा भुईचक्र लावून येते.लक्ष्मी बॉम्ब वगैरे प्रकरणाची खूप भीती वाटते.बाहेर कोणी लावत असेल तर सर्वात आतल्या खोलीत जाऊन बसते.
+11111

मला दिवाळीच्या काळात 4 लहान पोरं जमून काहीही करत असतील तर बॉम्ब लावणार आहेत असंच वाटतं
मग मी कान बंद करुन पळून जाते
रस्ता बदलते

आमच्या गावी तर कोणी वारले तर गावात ती बातमी कळण्यासाठी 3 वेळा फटाके वाजवतात,, आणि अंत्ययात्रेच्या समोरही वाजवत नेतात, त्या मुळे भिती वाटते ....

यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही. मुळात कानठळ्या बसवणारे आवाज आवडणे यात कसलेही भूषण नाही. जे मोठ्या तोंडाने
मोठ्याने आवाज करणारे फटाके फोडल्याचे सांगत मिरवतात, त्यांना शारिरीक पातळीवर त्रास होतच असणार, ते फक्त सांगत नाहीत, इज्जत का सवाल यू नो.
मला स्वत:ला लहानपणापासून फटाक्यांची भीती आहे. अंगणात फटाके लावत असतील तर मी घराच्या शेवटच्या खोलीत धावत जायचे आणि कान गच्च बंद करून घ्यायचे. आताही फारसा फरक पडलेला नाही. फक्त दार लावून काम भागतं. माझ्या लग्नाच्या वरातीत लोक फटाके वाजवत होते आणि मी तो फुलांचा अवजड हार सांभाळत कान बंद करून उभी होते. Uhoh

यावर्षी तरी कोरोनामुळे फटाक्यांचे प्रमाण कमी असेल असा अंदाज आहे. कारण बऱ्याच जणांचे गेलेले जॉब्स, कपात झालेला पगार, नात्यात / आसपास कोरोनामुळे गेलेले बळी इ.
तरीही एक उपाय सुचवतो. प्रत्यक्षात किती कामाला येईल माहित नाही.
Active Noise Cancellation Headphone घेऊन पहा. Amazon वर Rs. 3500/- पासून सुरु होत आहेत. भले त्यावर गाणे सुरु नाही केलेत तरी headphone सुरु करून त्यातील Active Noise Cancellation feature सुरु करून ठेवा. (अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे हा उपाय कितपत काम करेल माहित नाही. कारण मी प्रत्यक्ष कधीही Active Noise Cancellation headphone वापरला नाही. फक्त एकदा Croma मधील demo साठी ठेवलेला वापरून पाहिला आहे.)
https://www.amazon.in/s?k=active+noise+cancellation+headphones&s=relevan...

मला ही फटाक्यांची प्रचंड भीती वाटते . अगदी शोभेच्या फटाक्यांची ही.
मी जन्मात कधी ही फटाके वाजवलेले नाहीत. माझ्या वाटणीचे फटाके मी लहानपणी भावंडांना वाटून टाकत असे.
पुढे माझी मुलं खूप लहान असताना फुलबाज्या वगैरे उडवताना नवरा बरोबर असे . अंगात सुती साधे कपडे घालून सगळी काळजी घेऊन कार्यक्रम चाले फटाके उडवण्याचावा. मी मात्र घरातच असे.
मी फटाके नको हे त्यांच्या मनावर इतकं बिंबवलं होतं की थोडेच दिवसात त्यानी आपण हुन च बंद केलं उडवणं आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला.
गेली अनेक वर्षे दिवाळी जोरात साजरी होते घरी पण फटाके न आणता.
एक वर्ष लंडन ला होते दिवाळीत . फटाक्यांच्या आवाजाचा त्रास नाही होणार तिकडे ह्या विचाराने खुष होते . पण कसचं काय ! अगदी रात्री अपरात्री नाही पण आठ नऊ वाजेपर्यंत भरपूर आवाज येत होते फटाक्यांचे आणि छातीत धडकत होत.

मला भीति नाही पण लाउड आवाज आजि बात आवडत नाहीत. त्यामुळे आवाजी फटाके रुल्ड आउट. शोभेच्या फटाक्यांनी प्रदुष ण होते म्हणून ते ही बरोबर वाटत नाहीत. प्लस चाइल्ड लेबर वापरले जाते म्हणजे सर्वतोपरी ही पद्धत घातकच वाटते. माझी दिवाळी म्हण जे एक फुलबाजीची पेटी व रंगीत काडेपेट्या हिरवी एक व लाल एक. आई स्वयंपाक करत असताना एक फुलबाजी गॅसवरच पेटवायची.

मग एक पणती लावुन घेउन त्यात फुलबाजी लावायची. नीट बघितलेत तर नुकती हवेत सुरू झालेली थंडी, तो गारवा, ती थरथरणारी पणतीची ज्योत व त्यात नुकती लागू पाहणारी फुलबाजी हे व्हिजुअल व क्षण म्हणजे दिवाळी आली हे जाणवणे. काड्यांचे फूल करून ते पेटवायचे. इतपतच. पेन्सिल वायर एक दोन पेट्या.

पण घर लकडीपुलाच्या व कर्वेरोड जंक्षन वर असल्याने अक्ख्या पुण्यातले फटाके दिसत व ऐकू येत. शिवाजी नगर ला फटाके मार्केट होते त्याला आग लागली होती. बॅक इन द अर्ली ७०ज ती घरातूनहि दिसली होती. ती मेन भीती अजून आहे. कोणतेही स्वप्न पडले व अचाट डिस्ट्रक्षन होणार अशी प्रिमोनिशन असली की त्या घरातली ती खिडकी व त्यातून बाहेर दूर दिसणारी ती आग व इतर भयात्कारी स्वप्न एलिमेंट दिसतात.
वराती व इतर ढोल ताशे सेलिब्रेशन असले की पुलावर एकदा जोरात वाजवणे व पूल ओलांडून घरासमोर आले की निवांत वाजवत बसणे फटाके इत्यादी हे अनेक वेळा व्हायचे त्यामुळे झोपेचे खोबरे व आवाजी त्रास. त्यामुळे एक प्रकार चा तिरस्कार मनात बसला आहे.

हैद्राबादला तर हाइट व्हायची समोर शेजारी बिहारी अगरवाल. प्रत्येक बाबतीत नाक खुपसणारे. हे आता मुंबईत राहून अजूनच विचि त्र वाट्टे. ते दुकानातून पूजा करून रात्री येत व दोन तीन वाजता फटाके वाजवायला सुरुवात करत. ते ही माळा लाउड फटाके वगैरे. व बेल वाजवून आम्हाला तुम्ही पण खाली या म्हणत. सो अनॉइन्ग. इट वॉज.

ह्या निमित्ताने मला आमच्या मूळ गावातील ...... नावाचा एक व्यक्ती आठवला. त्याचे वडील गावच्या पाटलांपैकी एक असे मानवाईक व्यक्ती होते, त्यामुळे ...... लाही गावात खूप मान मिळाला असता पण त्याला फटाक्यांची मुलखाची भीती आणि तो सार्या परिसरात हास्याचा विषय आहे.
कुणाला आमच्या गावचे नाव सांगितले तर अच्छा तुम्ही फटाक्याच्या गावचे दिसता असे लोकांचे उद्गार निघतात.

तो रस्त्याने जात असला कि टवाळखोर मुले (अगदी छोटी मुलेही) आणू का रे फटाका म्हणून चिडवतात. दिवाळीत आणि लग्नसराईत तर त्याची बिकट परिस्थिती होते. दिवाळीत चारपाच दिवस दारखिडक्या बंद करून पांघरुणात लपून बसलेला असतो. माझे बाबा सांगतात की तो आधी तर धान्य साठवून ठेवण्याच्या ढोलीत लपत असे. नातेवाइकांखेरीज ईतर कुणाच्याही लग्नाला जातच नाही. जेव्हा कधी गेला तर मंगलाष्टके आटोपून वधू-वर स्थिरसावर होईस्तोवर मंडपाजवळही फिरकत नाही. गावात लग्न असल्यास शेतावर जाऊन वेळ घालवतो आणि एकदम जेवणाच्या पंगतीतच दिसतो.

आई-वडिलांनी, नातेवाईकांनी व परिचितांनी त्याची भीती घालवायचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. कदाचित वडिलांच्या अकाली मृत्यूमुळेही मनावर परिणाम झाला असावा (गावात अंतिमसंस्काराच्या वेळी फटाके वाजवायची पद्धत आहे, मृत व्यक्तीला देवाघरी बोलावणे आले म्हणून फटाके वाजवून आनंद व्यक्त केला जातो). त्यामुळे त्याच्या वडिलांच्या मयतावेळीही लपून होता, थोरला असल्याने लोकांनी शेवटी त्याला पकडून आणून त्याच्याकरवी वडिलांवर अंतिमसंस्कार केले. आजच्या घडीला ..... हा ५०-५५ वर्षांचा आहे, तरीही ह्या वयातही फटाक्यांची भीती अजूनही तसूभर कमी झाली नाही.

फटाक्यांच्या भीतीमुळे तो लग्न करण्यासाठी अजिबात तयार नव्हता. आई जख्खड म्हातारी झाली तरी तिला घरची सगळी कामे करावी लागत. शेवटी कसातरी लग्नास तयार झाला पण मुलींकडून सातत्याने नकार येत असत. शेवटी कसेबसे लग्न जमले, पण लग्नात कुणीही फटाके फोडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त होता. स्वतः त्याच्याभोवती चार पोलिसांचा पहारा असे. बायको व पुढे मुले झाल्यावरही त्याची भीती अजूनही कमी झाली नाही. दिवाळीत घरात लपून राहतोच आणि लग्नांना जाणे टाळतो. आता त्याची भीती घालवायचा कुणीही प्रयत्न करत नाही. त्याचा पाठचा भाऊ (४५-५० वर्षे) व त्याची मुले-पुतणे ह्यांना मात्र फटाक्यांची मुळीच भीती नाही.

इंटरनेटवर फटाक्यांची भीती नॉर्मल असल्याचे सांगतात पण प्रत्यक्षात मला खूप अपमानास्पद वाटत. ही भीती कमी करण्यासाठी कोणी मला उपाय सुचवू शकेल का?
सगळ्यात पहिले यात अपमानास्पद वाटुन घेणे बन्द करा. भिती कुठल्याही गोष्टीची असु शकते. ती कमी करण्यासठी ईतर कुणी नाही तर आपल्याला आपल्याच मनाची साथ हवी असते. जर हळू हळू मनाची समजुत घतली तर यात फरक पडतो. पण पुर्ण भिती जाइलच असे नाही. ईतर काही म्हणोत त्या कडे दुर्लक्ष करा.

हो अंत्ययात्रेच्या वेळच्या फटाक्यांमुळे आमच्या गावातल्या एका मुलीलाही फटाक्यांची खूप भीती बसली होती. बिचारीचे वडील असेच अकाली आणि अचानक गेले. खरं म्हणजे जख्खड म्हातारे होऊन किंवा खूप वर्षे आजारपण काढून गेलेल्यांंच्या अंत्ययात्रेतच फटाके वाजवायची पद्धत आहे गावात. पण तेव्हा कुणी तरी चुकीने वाजवले. ती बिचारी त्यामुळे खूप घाबरायची फटाक्यांना. फटाक्यांनाच असं नाही, पावसाळ्यात ढग जोरात गडगडायला लागले तरी घरात लपून बसायची Sad