आय सपोर्ट सुनिल गावस्कर !

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 September, 2020 - 16:13

आयपीएल कॉमेंटरी दरम्यान केलेल्या एका वक्तव्याने सर सुनिल गावस्कर वादाच्या भोवरयात सापडले आहेत.

झाले असे की कोहलीची बॅट काही चालत नाहीये. त्यावर टिप्पणी करताना गावस्कर म्हणाले, 'ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने.."

मला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा गावस्कर यांना असे कोहलीच्या पत्नीबद्दल भले ती सेलिब्रेटी का असेना असे वक्तव्य करणे मला पटले नाही. गावस्कर आवडीचे खेळाडू. त्यांची कॉमेण्टरी आणि क्रिकेटबाबतची मतेही फार आवडतात. एका सच्च्या मुंबईकरासारखे ते बोलतात. प्रत्यक्ष भेटीचा योग आला नाही पण ज्यांना आलाय त्यांनी सांगितलेय की किती डाऊन टू अर्थ माणूस आहे. चुकून का होईना अशी त्यांची जीभ घसरायला नको होते असे वाटले. अर्थात मी ते काय नक्की बोलले आणि कश्या टोनमध्ये बोलले ऐकले नव्हते.

आज मात्र कॉमेण्टरीला ते असताना त्यांच्या सहसमालोचकाने पुन्हा तो विषय काढला तेव्हा गावस्कर यांनी सांगितले की विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक क्रिकेट खेळतानाचा विडिओ व्हायरल झाला होता. बहुधा त्यांनी स्वत:च केला असावा. त्यासंदर्भाने ते म्हणाले की लॉकडाऊनमुळे त्याव्यतीरीक्त कोहलीने जास्त सराव केला नसावा जे त्याच्या खेळाकडे पाहून जाणवतेय.

यात कसलीही टिका वा टोमणा नव्हता. जरी अनुष्काचा उल्लेख टाळता आला असता तरी तो ओघात झालाय. त्यात त्यांना धारेवर धरावे असे काही नाही असे मला वैयक्तिकरीत्या वाटते. खुद्द कोहली आणि अनुष्काला हे रुचले नाही तर नापसंती दर्शवणे हा त्यांचा हक्क आहे. मात्र ट्विटर फेसबूक या सोशलसाईटवर त्यांना ट्रोल करणे, त्यांच्या समालोचनावर टिका करणे, त्यांची क्रिकेटची अक्कल काढणे, ईतकेच नव्हे तर त्यांच्या कॉमेंटमधून डबल मिनिंग शोधणे वगैरे जे प्रकार चालू आहेत ते व्यथित करणारे आहेत.

बरे या अग्रेसिव्ह ट्रोलर्समध्ये बहुतांश लोकं तर ते असतात जे ईतरवेळी स्वत: अनुष्का विराट. दिपिका रणवीर, आलिया, सई, स्वप्निल. सचिन, शाहरूख, गेला बाजार अमिताभ अभिषेक बच्चन आदींना काहीतरी खुसपट काढून कसलासा अमंगळ आनंद मिळवायला ट्रोल करत असतात. जो अधिकार तेव्हाही यांना कोणी दिलेला नसतो. आणि आताही यांच्याकडे तो नाहीये.

आपले ट्रोल करणे जस्टीफाय करायला मग हे लोकं घडल्या घटनेला पदरची मीठ मिरची लावतात. गावस्कर यांनी आज स्पष्ट सांगितले की या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता मी काय बोललो ते स्वत: ऐका आणि मग ठरवा, मला मी काही वावगे बोललो आहे असे वाटत नाही.

थोडक्यात गावस्कर यांनी ट्रोलर्सना घाबरून माफी मागायला नकार दिला आहे. हे मला ईथे फार गरजेचे वाटते. अन्यथा हि ट्रोलर गॅंग आपल्याला काहीतरी पॉवर मिळाल्याच्या थाटात वावरेल. यांना फाट्यावर मारणे गरजेचे आहे जे गावस्कर करत असतील तर आय सपोर्ट गावस्कर !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॅरी सेजल सिनेमा पडला म्हणून कोणी विराटला दोष दिला होता का?
>>>
गावस्करांनी केलेल्या विधानात अनुष्काला दोष देणे नव्हते.
हा एक लोकांनी चुकीचा काढलेला अर्थ आहे.

म्हणजे बाहेर पोरं छेड काढतात मुली तू घरीच बस मेंटलिटी झाली...
>>>>

सेलिब्रेटीपद म्हणजे काटेरी मुकुट असतो. मुकुट मिरवायचा असल्यास काटे टोचणार. आणि काटे टोचणे नको म्हणताय तर मग मुकुटच घालू नका.

मला वाटते हायझेनबर्ग यांनी या परीस्थितीवर भाष्य केले आहे. न की अनुष्का आणि विराटला पर्सनली काही सल्ला दिलाय.
आणि तसेही कोणी हितचिंतक बनून सल्ला देत असेल तर तो आदर्शवादीच हवा हा हट्ट कश्याला. प्रॅक्टीकलही असू शकतो ना..
बाहेर कुत्रे पिसाळलेत. कुत्र्यांचा बंदोबस्त करायलाच हवा. पण जोपर्यंत तो होत नाही तोपर्यंत ते ज्याच्या जीवावर ऊठण्याची शक्यता आहे त्याने घरीच बसणे योग्य नाही का..

आय सपोर्ट गावस्कर ते अनुष्काच्या विरोधात नाही. तिला गावस्करच्या कॉमेंटवर त्यांना भलेबुरे सुनवायचा हक्क आहेच.
पण जी सोशलसाईटवरची ट्रोलरगॅंग असते जी स्वत:च पुरावे गोळा (तयार!) करते आणि स्वत:च न्यायाधीश बनते ती सोकावू नये म्हणून सपोर्ट आहे.

व्हिडीओ पाहिल्यावर गावसकर ची कॉमेंट खोडसाळ नव्हती असं जरी कळलं, तरी अनुष्का चा उल्लेख अनावश्यक वाटला. >>>
सहमत. पण समजा लॉकडाऊनमध्ये विराट अनुष्का ऐवजी कुण्या शेजाऱ्यासोबत (जो क्रिकेटपटू नाही) खेळला असता आणि गावस्करने अनुष्का ऐवजी त्याचा उल्लेख केला असता तरी जेवढी अनावश्यक वाटली असती तेवढीच.
अनुष्काचं नाव पाहून खोडसाळपणे वेगळे वळण दिल्या गेले आणि केवळ म्हणुन त्याकडे लक्ष वेधले जातेय, अन्यथा लक्षातही आले नसते.

आपण एका अनादरमय जमान्यात जगतोय असे एक मूळ इंग्लीश वाक्य आहे. हे खरे आहे. सोशल मीडीया आल्यापासून कुणीही कुणालाही धारेवर धरतंय. अनेकांना संधी हवी होती , ती मिळतेय. हे झालं सामान्य जनतेचं.

पण नव्याने जे खेळाडू सेलेब्रिटी होताहेत त्यांची पोझिशन ही इंद्रदेवाच्याही वर आहे. स्वतः सुनील गावसकर नवा असताना त्याची इमेज काही अशी नव्हती. त्या वेळचे खेळाडू हे हौशी होते. ते कुठेतरी नोकरी करून क्रिकेट खेळत. त्यांचा पोटापाण्याचा मुख्य धंदा क्रिकेट नव्हता. त्यांचे मालक त्यांना क्रिकेटसाठी रजा देत. भारतीय रेल्वे, पोलीस आणि एलआयसी ला रजा द्यायला प्रॉब्लेम नव्हता. जे खासगी कंपन्यात काम करत त्यांना रजा मिळवताना बीसीसीआयला मध्यस्थी करावी लागत असे. ही पार्श्वभूमी सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे. कपिलदेव पण निमसरकारी आस्थापनेत कामाला होता.

याच मंडळींनी १९८३ ला विश्वचषक मिळवून दिला आणि भारतीय क्रिकेटला जाहीरातींचा ओघ सुरू झाला. ओन्ली विमलने प्रायोकत्व स्विकारले. मग एमआरएफ टायर्स आणि असे मोठमोठे प्रायोजक आले. त्या वेळी कपिलदेव हा सर्वात मोठा स्टार होता. त्याच्या खालोखाल संदीप पाटील, श्रीकांत हे स्टार खेळाडू असत. सुनील गावसकर हा एक क्लासिक खेळाडू होता. ज्याला त्याचा खेळ समजला त्याला समजला. उचलून फटके मारणा-यातला तो नव्हता. त्या वेळची गरजही तशीच होती. तंत्रशुद्ध खेळाचे उदाहरण देण्यासाठी जगभरात सुनील गावसकर आणि दिलीप वेंगसरकर चे नाव घेतले जाई. दिलीपचे मोठे कट आउट्स लॉर्डस वर आहेत.

सुनील गावस्कर तेव्हांही किमान चुका करणारा खेळाडू आणि वक्ता म्हणून प्रसिद्ध होता. क्रिकेट खेळताना लूज बॉलवर तो टोलेबाजी करत असे तशीच टोलेबाजी मुलाखती देताना करत असे. त्याने आदर कमवायला कित्येक वर्षांची क्रिकेट सेवा केली. आजचं क्रिकेट हे या खेळाडूंची देण आहे. आज पैसा मिळतो तो यांच्यामुळे.

पण याच पैशामुळे आजचे स्टार क्रिकेटर्स जमिनीवर नाहीत. ते स्वतःला भगवान समजतात. सामान्य जनते पेक्षा वेगळे समजतात. पूर्वी सीनीयर, निवृत्त खेळाडूंचा आदर केला जात असे. वयाचा मान ठेवला जात असे. त्यांच्या चुकीच्या आरोपांवरही मान ठेवूनच बोलले जात असे. आत्ताच्या खेळाडूंना आम्ही एव्हढे महान हे कोण माजी लागून गेले असा अ‍ॅटीट्यूड आहे.

हीच विचारसरणी त्यांच्या फॅन्सचीही आहे.

लता मंगेशकर, सुनील गावसकर, अमिताभ बच्चन, कपिलदेव हे एके काळचे दिग्गज आताच्या पिढीच्या दृष्टीने सॉफ्ट टार्गेट्स आहेत. यातल्या अनेकांना यांच्या कामगिरीचाही गंध नसतो.

सहजराव सहमत आहे
सचिन द्रविड लक्ष्मण अश्या जंटलमॅन लोकांचा काळही आता संपला आहे. असे खेळाडू नाहीयेत असे नाही, पण त्यांचे प्राबल्य नाहीये. एखाद्या सचिन द्रविडचे चाहते चुकीचे वागले तर ते स्वत: त्यांना अपील करतील की स्टॉप धिस नॉनसेन्स

हॅरी सेजल सिनेमा पडला म्हणून कोणी विराटला दोष दिला होता का? >>> विराट कोहली अनुष्कासोबत अभिनय अभिनय खेळत असता तर शार्प सेन्स ऑफ ह्युमर असलेल्या एखाद्याने त्यावर एखादी कमेण्ट केली असती. ह्युमर न कळणा-यांनी मग त्याचा बाऊ केला असता.
पत्नीच्या अपयशाला पती जबबदार का असाही टाहो रेम्याडोक्या रॅशनलिस्टकडून फोडला गेला असता. आम्ही रॅशनॅलिस्टस आहोत हे सिद्ध करणे हा ही आपले खासगी व्हिडीओ पब्लीक करण्याइतकाच गंभीर आजार आहे.

व्हिडीओ तर व्हायरल व्हायला पाहीजेत आणि त्यावर प्रतिक्रिया नकोत हे २०२० मधे कसे काय शक्य आहे ? ज्याने कुणी विनापरवनागी व्हिडीओ काढला त्याच्या विरोधात हे जोडपे बोललेले दिसत नाही. असे का ?

ते विरुष्काला पसिद्धी माध्यमात सतत चर्चीले जाणे फार जरुरी आहे. कारण त्यांचे बरेचसे उत्पन्न हे सोशल मीडिया प्रोमोशन्स मधून मिळते. जर चर्चाच झाली नाही तर कोण जाणार आहे त्यांच्या पेज वर. म्हणून मग थोड्या थोड्या दिवसांनी काही तरी काडी करून चर्चेत येतात. कुठे रस्त्यावर कचरा फेकला म्हणून कुणाला तरी झाप आणि त्याचा व्हिडीओ वायरल कर, रिपोर्टरशी पंगा घे असले धेडगुजरी उपद्व्याप करत असतात. गावसकर वगैरे मंडळी हे वेगळ्या लीग मधले आहेत, त्यांनी ह्या प्रसिद्धीजीवी लोकांना फार थारा देऊ नये.

यातही तथ्य आहे झम्पू दामलू
अगदी गॉड ऑफ क्रिकेट सचिनपासून कॅप्टन कूल धोनी ते सुपर व्ही किंग कोहली पर्यंत प्रत्येक जनरेशनचा एक सुपर्रस्टार पकडून ब्रांडींग चालतेच.

Pages