रिमोट हातोहात बदलले

Submitted by सुप्रिया जाधव. on 23 September, 2020 - 00:19

रिमोट हातोहात बदलले
हवे तेच गेले दाखवले

तुला वाटते संधी हुकली
मला वाटते दार उघडले

जमिन गझलची बदलेना का !
निव्वळ अस्सल शेर निपजले

मी केला जगण्याचा गुंता
काळाने जगणे विंचरले

योग्य सूत्र वापरले होते
सोडवताना पाढे चुकले

स्प्रिंगप्रमाणे दडपलेस तर
नकोस पाहू किती उसळले !

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users