हा कसला भेदाभेद आहे.

Submitted by Pratik jagannat... on 21 September, 2020 - 13:17

कुणी सांगेल का मला, हा कसला भेदाभेद आहे;
मुलास मिळतो जन्म इथे अन मुलीस मात्र मौत आहे.

नेहमीच श्रीमंतांसाठी हा देश खास आहे ;
गरिबांसाठी उरतो येथे, आजही वनवास आहे.

भरवतो पोट साऱ्या जनतेच ,माझा शेतकरी बाप;
तरी पदरात त्याच्या चटणी भाकरीचे दान आहे.

उभा आहे देश अपुला, बघा मजुरांच्या पायावरी;
तरी मात्र पायात त्यांच्या दारिद्र्याच्या बेड्या आहे.

खऱ्याखुऱ्या टॅलेंट्ची कदर , देशास आमुच्या नाही;
म्हणून कदाचित तरुण अमुचा पोसतो परदेस आहे.

प्रतिक वंदना वानखडे
744738567

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users