Submitted by VB on 21 September, 2020 - 07:23
हल्ली बहुतेक मुली लग्नानंतर नाव बदलत नाहीत. लग्नाआधी मधले नाव आडनाव वेगळे अन लग्नानंतर वेगळे असते. अश्यावेळी बाळाच्या जन्मदाखल्यात वडिलांचे नाव आडनाव कसे लावतात? हॉस्पिटलमध्ये जर सगळी कागदपत्रे लग्नाआधीच्या नावावर असली तरीही बाळाला वडिलांचे नाव अन आडनाव लावण्यासाठी काय करावे लागते. कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?
कृपया माहीत असल्यास सांगा.
तसेच, ऑनलाईन जन्मदाखला कसा मिळवायचा माहीत असेल तर तेही सांगा प्लिज.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझं लग्नानंतर आडनाव बदललेलं
माझं लग्नानंतर आडनाव बदललेलं नाही, पूर्वीचं नाव लावते.
.
बाळाच्या आई बाबांचं आधार कार्ड, आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे मुख्य कागदपत्र आहेत जे लागतातच ह्या कामासाठी
.
बाळाचा जन्म झाल्यानंतर दवाखान्यात नोंद होते, हे रेकॉर्ड दवाखान्याचे admin महापालिकेला पाठवतात आणि आपल्याला temporary receipt मिळते, जन्म दाखला म्हणून. ती महापालिकेत दाखवून original दाखला मिळवायचा असतो.
हो
हो
आईचे आडनाव भिन्न , वडिलांचे भिन्न तर मॅरेज सर्टिफिकेट लागेलच
आणि पोरालाही प्रत्येक वेळी हे तिन्ही डॉक्युमेंट्स लागतील
<<<बाळाचा जन्म झाल्यानंतर
<<<बाळाचा जन्म झाल्यानंतर दवाखान्यात नोंद होते, हे रेकॉर्ड दवाखान्याचे admin महापालिकेला पाठवतात आणि आपल्याला temporary receipt मिळते, जन्म दाखला म्हणून. ती महापालिकेत दाखवून original दाखला मिळवायचा असतो.>>> इथेव तर गोम आहे. हॉस्पिटलमध्ये सर्व कागदपत्रांवर आईचे लग्नाआधीचे नाव असेल तर काही प्रॉब्लेम होत नाही का? आधार कार्ड वर सुद्धा नाव वेगळेच असेल ना.
विवाह नोंदणी पत्र हवेच का? कोरोनामुळे ते मिळत नसल्यास काय करावे?
विवाह नोंदणीपत्र हवेच की
विवाह नोंदणीपत्र हवेच की
समजा आईच्या कागदावर माधुरी दीक्षित नाव आहे
बापाची कागदे श्रीराम नेने
आणि माधुरीला मुलगा झाला अर्जुन
आता अर्जुन श्रीराम नेने हे कागद मिळवायला माधुरी श्रीराम विवाह कागद लागणारच
नवर्याची कागदे उपलब्ध
नवर्याची कागदे उपलब्ध नसल्याने एका दुर्दैवी स्त्रीला पासपोर्ट मिळू शकला नाही , असे ऐकून आहे. नवरा मात्र देशोदेशी फिरत असतो म्हणे
पासपोर्टसाठी विवाह नोंदणी
पासपोर्टसाठी विवाह नोंदणी पत्र नसल्यास affidavit चालते.
(आम्ही तसे दोनदा वापरले आहे). तसे इथेही affidavit चालायला हवे, चौकशी करून बघा.
एफिडविट दोघांचे लागेल ना ?
एफिडविट दोघांचे लागेल ना ?
म्हणजे 1 मॅरेज सर्टिफिकेट उपलब्ध नाही म्हणून 2 लोकांनी एफीडवीट बनवायचे ना ?
हो, मग दोघे उपलब्ध नाहीत का
हो, मग दोघे उपलब्ध नाहीत का जन्मदाखल्यासाठी?
त्यांनाच माहीत
त्यांनाच माहीत
>> विवाह नोंदणी पत्र हवेच का?
>> विवाह नोंदणी पत्र हवेच का? कोरोनामुळे ते मिळत नसल्यास काय करावे?
ऑनलाईन प्रयत्न केला का?
पुण्यासाठी
https://www.pmc.gov.in/
आणि
ऑनलाईन सेवा -> विवाह प्रमाणपत्र
हे ट्राय करून पहा. (विवाह प्रमाणपत्र मी स्वत: ट्राय नाही केले पण जन्मदाखला मिळाला होता मला इथून)
विवाह केल्यावर नवरा, बायको ,
विवाह केल्यावर नवरा, बायको , भटजी , कार्यालयवाला व अजून 2 साक्षेदार जाऊन , लग्नपत्रिका व फोटो देऊन स्वतःच नोंदणी करावी लागते, मग एक दोन दिवसात सर्टिफिकेट मिळते
ह्यांच्याकडे नाही , म्हणजे बहुदा हे त्यांनी केलेलेच नसावे , मग ऑनलाइन कॉपी कशी मिळेल ?
ह्याला पर्याय म्हणून दोघांचे एफिडविट केले तरी दोन साक्षीदार व लग्नपत्रिका लागेलच, त्यापेक्षा लग्न झाल्याझाल्या मॅरेज सर्टिफिकेट काढून ठेवणे कधीही चांगले
त्या वरच्या साईटवर हि सगळी
त्या वरच्या साईटवर हि सगळी डॉक्युमेंट अपलोड करून विवाह नोंदणी करता येते असे दिसते (दोघांचे फोटो, लग्नाचे फोटो, आमंत्र पत्रिका अशी अनेक डॉक्युमेंटस व माहिती अपलोड करायला सांगितलेली दिसत आहेत त्या फॉर्मवर) पण नोंदणी झल्यावर पुढे काय प्रोसेस आहे कधी उपलब्ध होते प्रमाणपत्र वगैरे माहित नाही. प्रयत्न करायला हरकत नाही.
दोन साक्षीदार व लग्नपत्रिका
दोन साक्षीदार व लग्नपत्रिका लागेलच >> याची गरज नाही. पण affidavit, notarized करावे लागते.
अतुल विवाह नोंदणी पत्रासाठी
अतुल विवाह नोंदणी पत्रासाठी प्रत्यक्षात जाऊन रजिस्ट्रार समोर, दोघांनी व दोन साक्षीदारांनी सह्या कराव्या लागतात.
त्यालाही साक्षीदार लागतो
एफिटवीतलाही साक्षीदार लागतो
>> अतुल विवाह नोंदणी
>> अतुल विवाह नोंदणी पत्रासाठी प्रत्यक्षात जाऊन रजिस्ट्रार समोर, दोघांनी व दोन साक्षीदारांनी सह्या कराव्या लागतात.
सगळी डॉक्युमेंट अपलोड करून ऑनलाइन विवाह नोंदणी केल्यानंतर म्हणताय का?
<<<बाळाचा जन्म झाल्यानंतर
<<<बाळाचा जन्म झाल्यानंतर दवाखान्यात नोंद होते, हे रेकॉर्ड दवाखान्याचे admin महापालिकेला पाठवतात आणि आपल्याला temporary receipt मिळते, जन्म दाखला म्हणून. ती महापालिकेत दाखवून original दाखला मिळवायचा असतो.>>> इथेव तर गोम आहे. हॉस्पिटलमध्ये सर्व कागदपत्रांवर आईचे लग्नाआधीचे नाव असेल तर काही प्रॉब्लेम होत नाही का? आधार कार्ड वर सुद्धा नाव वेगळेच असेल ना.>>> मला जर याबाबत माहिती मिळाली तर बरे होईल.
किल्ली, तुम्ही काही सांगू शकता का,?
सगळी डॉक्युमेंट अपलोड करून
सगळी डॉक्युमेंट अपलोड करून ऑनलाइन विवाह नोंदणी केल्यानंतर म्हणताय का? >> हो, सगळी डॉक्युमेंट्स अपलोड करून अर्ज केल्यावर तारीख, वेळ देतात तेव्हा तिथे जावे लागते, ओरिजिनलस घेऊन, साक्षीदार घेऊन. (निदान तेलंगणात असे आहे, पण हे भारतात सगळीकडेच असावे.)
>> बाळाच्या जन्मदाखल्यात
>> बाळाच्या जन्मदाखल्यात वडिलांचे नाव आडनाव कसे लावतात? हॉस्पिटलमध्ये जर सगळी कागदपत्रे लग्नाआधीच्या नावावर असली तरीही बाळाला वडिलांचे नाव अन आडनाव लावण्यासाठी काय करावे लागते.
मुलाच्या जन्मदाखल्यात:
आईचे पूर्ण नाव, वडिलांचे पूर्ण नाव, बाळाचे नाव, आईवडिलांचा पत्ता... अशा नोंदी आढळतात.
मुलाचे पूर्ण नाव, मुलाचे आडनाव... अशा नोंदी त्यात कुठेही आढळत नाहीत.
>> हो, सगळी डॉक्युमेंट्स
>> हो, सगळी डॉक्युमेंट्स अपलोड करून अर्ज केल्यावर तारीख, वेळ देतात तेव्हा तिथे जावे लागते... ...भारतात सगळीकडेच असावे.)
ओह अच्छा
आमचे लगीन लहान गावात झाले ,
आमचे लगीन लहान गावात झाले , अशा गावात कागद व सगळी वरात नेली की काम होते, साक्षीदार , भटजीही जवळच असतात
मोठ्या शहरात रोज भरपूर लग्ने लागत असणार म्हणून ऑनलाइन अपॉइंटमेंट वगैरे असणार
मी असे म्हणेन की जर लग्नानंतर
मी असे म्हणेन की जर लग्नानंतर नाव बदलले नाही तर वडिलांचे नाव न लावता आईचेच नाव ठेवा की जन्म दाखल्यावर. नंतर अमुक नाव असलेले बाळ हा माझा मुलगा असुन मी त्याचा वडिल आहे असे अॅफिडेविट करुन घ्या.
ऑनलाइन विवाह नोंदणीची सोय
ऑनलाइन विवाह नोंदणीची सोय त्यांनी अलीकडच्या काळात दिलेली आहे. मानव म्हणतात त्यानुसार हे सगळे करून प्रत्यक्ष तिथे गेल्याने गोष्टी जलद होत होत असतील हाच काय तो फायदा.
पण मूळ प्रश्नात:
>> हल्ली बहुतेक मुली लग्नानंतर नाव बदलत नाहीत. लग्नाआधी मधले नाव आडनाव वेगळे अन लग्नानंतर वेगळे असते.
यामुळे काही समस्या येत असेल असे वाटत नाही. जन्मदाखल्यावर मुलाच्या आईचे पूर्ण नाव लग्नाआधीचे येईल इतकेच. मुलाच्या वडिलांचे पूर्ण नाव व तर असणार आहेच. त्यामुळे...
<<<बाळाचा जन्म झाल्यानंतर दवाखान्यात नोंद होते, हे रेकॉर्ड दवाखान्याचे admin महापालिकेला पाठवतात आणि आपल्याला temporary receipt मिळते, जन्म दाखला म्हणून. ती महापालिकेत दाखवून original दाखला मिळवायचा असतो.>>> इथेव तर गोम आहे. हॉस्पिटलमध्ये सर्व कागदपत्रांवर आईचे लग्नाआधीचे नाव असेल तर काही प्रॉब्लेम होत नाही का?
या प्रोसेसनुसार जन्मदाखला तयार झाला असेल तरी काही प्रॉब्लेम येईल असे वाटत नाही.
माझ्या जन्म दाखळ्यात माझे नाव
माझ्या जन्म दाखळ्यात माझे नाव आहे,
नंतर वडिलांचे पूर्ण नाव आहे ,
डॉकटरचे नाव आहे
आईचे नावच नाही
सन 1977
हॉस्पिटल नगरपालिकेला कळवताना आई वडील , कळवत असेल
पण जन्म दाखळ्यात बाप व आजाचे नाव येते व आडनाव येते
---------
आज ह्यांनी जरी नवर्याचे नाव आडनाव लावले नसेल , तरी ह्यांच्याही नावात वडील व त्यांचेच आडनाव असणार आहे , आईचे , आजीचे नाही , म्हणजे ह्यांचा स्वतःचा जन्म दाखलाही कदाचीत असाच दिला गेला असणार
VB, एखादीने लग्नांनातर नाव न
VB, एखादीने लग्नांनातर नाव न बदलल्यास कायद्याने काहीही फरक पडत नाही. डॉक्टर/ नर्स वगैरेंच्या मेंटलिटी मुळे फरक पडू शकतो पण आपण ठामपणे 'मी नाव बदलले नाही' हे सांगायचे. काही लोकं तुक टाकतील , त्यांना डबल तुक टाकायचे. मी नावापुढे कुठलीही (सौ.कु.चि. श्रीमती वगैरे) गाडी जोडत नाही म्हणून मला अनेकदा हर कटाक्ष मिळतात, मी त्यांना 'ज्या कामासाठी आला आहात/ मी आले आहे ते काम करा आणि फुटा' वाला कटाक्ष देते.
माझ्या मते भारतात मॅरेज सर्टिफिकेट अनेक कारणांमुळे must to have doccument आहे. मला घर लीज करताना सुद्धा मागितलं होतं. ते असो!
पण बाळाचे आई बाबा हे married आहेत हे prove करायचा हा एकमेव कायदेशीर मार्ग आहे. त्यामुळे ते असायला हवे. विभक्त असतील तर माझ्यामते ते ही docs लागत असतील.
अनौरस मुलांच्या बाबतीत वडील माहीत नाहीत हा एक रकाना असतो बहुदा. अविवाहित जोडप्यांना आपल्या समाजात स्थान नाही त्यामुळे ते काय करत असतील देव जाणे.
जन्मदाखल्याचा मूळ प्रश्न
जन्मदाखल्याचा मूळ प्रश्न लग्नदाखल्यात कसा परिवर्तित झाला? की जन्मदाखला काढायची वेळ आली तेव्हा लग्नदाखला नाही हे लक्षात आले ??
Also बाळाच्या नावा आडनावाशी
Also बाळाच्या नावा आडनावाशी आई वडिलांच्या नावा आडनावाचा संबंध नाही.
माझ्या मैत्रिणीने तिच्या मुलीचं नाव - मुलीचं नाव - देशाचं नाव (भारत) - आजीचं नाव (लकिली दोन्ही आजींचं नाव सेम होतं) असं लावलेलं त्यामुळे हे मला नक्की माहीत आहे
माझ्या दोन्ही मुलांच्या वेळी
माझ्या दोन्ही मुलांच्या वेळी आम्ही फक्त दवाखान्यात एक फॉर्म भरून दिला, त्यांनी एक रिसीट दिली. पंधरा दिवसांनंतर बर्थ सर्टिफिकेट मिळाले.(अनुक्रमे पुणे आणि सांगली)
कोरोनामुळे लग्नदाखला मिळत
कोरोनामुळे लग्नदाखला मिळत नाहीये, अन त्यामुळे सगळे अडकले आहे. आताही बाळाच्या जन्मापर्यंत मिळेल असे वाटत नाहीये. ऑनलाईन साठी सुद्धा प्रॉब्लेम होतोय.
लग्नदाखला नसल्याने इन्शुरन्स चा प्रॉब्लेम जन्मदाखला प्रॉब्लेम झालाय.
मुख्य म्हणजे नीट माहिती कुठूनच मिळत नाहीये. हॉस्पिटलमध्ये सांगितले की इकडे जर लग्नाआधीचे नाव असेल तर जन्मदाखल्याला प्रॉब्लेम येईल.
>> बाळाचा जन्म झाल्यानंतर
>> बाळाचा जन्म झाल्यानंतर दवाखान्यात नोंद होते, हे रेकॉर्ड दवाखान्याचे admin महापालिकेला पाठवतात
यानुसार हॉस्पिटलने जन्माची नोंद केली असेल तर केवळ जन्म तारखेवरून ऑनलाईन बघता येईल जन्मदाखला. ती वरची साईट पण भन्नाटच डिजाईन केली आहे. नुसती तारीख टाकली कि त्या दिवशी पुण्यात जन्म नोंद झालेल्या सर्व मुलांचे बर्थ सर्टिफिकेट दिसतात
Pages