काळानुसार आपण बदलायला नको का?

Submitted by इस्रो on 21 September, 2020 - 07:15

(ओळीसाठी श्री. भूषण कटककर "बेफिकीर" यांचे आभार)

जाचक रूढी प्रथांना, सोडायला नको का ?
काळानुसार आपण, बदलायला नको का ?

जर का समान असती, सारी मुले मुली तर
घरकाम मुलासही, शिकवायला नको का ?

म्हणशील रे कितीदा ? नुसतेच "येस सर" तू
अपुले विचार तूही, मांडायला नको का ?

आहे करायचे जर, शांघाय मुंबईचे
रस्त्यावरील खड्डे, बुजवायला नको को ?

चरख्याजवळ बसूनी, अभिनय उगा कशाला ?
गांधी विचार अंगी, बाणायला नको का ?

- नाहिद नालबन्द 'इसरो'

Group content visibility: 
Use group defaults