न वाजलेली टिमकी

Submitted by राजश्रेणू on 19 September, 2020 - 03:18

न वाजलेली टिमकी

इतर अनेक सणांसारखा तोही एक सण "होळी " आपल्यासोबतचे सर्वजण खूप आपल्यासारखेच खूप उत्साहात एक तर सुट्टीचा दिवस आणि गोडधोड खाण्याचा. आपले मित्र नवीन टिमकी घेऊन जीव तोडून ती बेताल वाजवत असतात त्या बेताल वाजवण्याचा मनमुराद आनंद लुटत असतात .तेच बघून आपलेही बालमन बालहट्टावर करत आपल्यालापण हवी अशी टिमकी जीव तोडून वाजवण्यासाठी तो छोटासा आनंद लुटण्यासाठी

"आणूया, पण आत्ता सणाच्या आसपासच्या दिवसात,खूप महाग असते !" वडिलांचे उद्गगार

आत्ता आपल्यालाही मिळणार तोच आनंद , आपल्या मित्रांसारखा…..

'आपण टिमकी वाजवत गल्लीतून मित्रांसोबत फिरत आहोत ......', हे चित्र डोळ्यासमोर आणि निरागस हसू गालावर घेऊन सगळ्या होळीच्या सुट्टीचा दिवस आनंदाला पारावार उरत नाही.

टिमकी येते होळीच्या दुसरे दिवशी,सगळ्या गल्लीमध्ये सणाच्या दिवशी वाजलेल्या टिमकीच्या नादाचे पडसाद पण उरलेले नसतात तोपर्यंत ....... वाजवण्याचा सण संपलेला असतो

पण आपली नवीन पहिली टिमकी म्हणून आनंद ओसरुनही उरलेला असतो.पुढच्या वर्षीसाठी तरी झाली.मग पुन्हा पुढच्या वर्षीच्या होळीला आपल्या हातात वाजणारी आपल्या टिमकीचे चित्र रंगवत ती जपून बांधून ठेवली जाते.

नवीन वर्ष उजाडते पुन्हा होळीचा दिवस जवळ येऊ लागतो पुन्हा वेध लागतात ते टिमकीचे

आत्ता सर्वांच्या मित्रांसोबत वाजवण्यासाठी अगदी होळीच्याआधीपासून टिमकी.

लहानपणी आपल्यासारखं बहुतेक आपलं आकाशपण छोटं असावं कारण तो एवढासा आनंद गगनात मावत नव्हता ........

नाचत नाचत टिमकी काढली वाजवण्यासाठी, ठेवून ठेवून ती थंड झाली होती इतकी की कोणताही उपाय केला तरी ती पुन्हा वाजणार नव्हती. मन खट्टू झालं बालमन होत तरी त्याला हट्ट करून रडणं माहिती नव्हतं त्यामुळे त्या आनंदावरपडलेलं विरजण म्हणजे ती थंड झालेली टिमकी कडे पाहिलं आणि हे आपल्यासाठी नव्हतंच हे मानाने पक्के केलं .......

हो लहानपणीची ती एक आठवण मनात कुठेतरी लपून बसलेली माझ्याही नकळत. आज अचानक समोर आली कारण,खूप सोपं होत काही गोष्टी मिळून सुद्धा आनंद देत नाहीत कारण त्या वेळेत मिळणंच खूप गरजेचं असत. वेळेत नाही मिळालं तरी इतरांसारखा का आपलेपण मन दुःखी होत नाही? हा माझ्या मानाने मला केलेला प्रश्नाचं उत्तर म्हणजे लहानपणीचा हा प्रसंग आहे

त्यानेच शिकवलं होत, 'काहीतरी मिळालं नाही म्हणून दुःखी होणं, हा उपाय नाही!!' -रेणू

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहीले आहे. रिलेट करता आले :-
लहानपणी मी प्रदर्शनात, बेडकाचा एक फोन पाहीलेला होता. हिरवागार गटाण्या डोळ्याचा बेडुक त्याच्या डोक्यावरती क्रॅडल वगैरे. पण तेव्हा महाग असल्याने तो घेतला गेला नाही.
गंमत म्हणजे तोच फोन लहानपणी नवर्‍याकडे मात्र होता. Lol
असो तर सांगायची गोष्ट ही की आम्ही दोघं त्या फोनबद्दल इमोशनल होउन बोलतो. क्वचित अँटिक शॉपमध्ये मिळेल परत वगैरे स्वप्न रंगवतो Happy

@सामो हो काही गोष्टी छोट्या असतात त्याच्या संबंधित आठवणीही छोट्या असतात पण त्यामागच्या भावनेसची खोली खूप जास्त असते. बरं वाटलं कोणाच्यातरी मनापर्यंत पोचल्याचा आनंद मिळाला

छान लिहिले आहे. खरेच तेव्हाच्या इच्छा सोप्याच आणि छोट्याच असतात. पण त्यामागचा आनंद मोठा असतो.