लेमन चिकन फ्राय रेसिपी

Submitted by mrunali.samad on 17 September, 2020 - 04:52
lemon chicken fry
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१.250ग्राम चिकन (शक्यतो बोनलेस)
२.दही- 1 मोठा चमचा
३.आले लसूण पेस्ट- 1.5 चमचा
४.लाल मिरची पावडर
५.हळद
६.तेल
7.मीठ
८.लिंबू-1
९.सजावटीसाठी कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

1.चिकन स्वच्छ धुवून घ्या
2.एका भांड्यात चिकन,दही, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट,लाल मिरची पावडर, जराशी हळद,थोडं मीठ लावून दोन तास मॅरीनेट करून घ्या.
3.दोन तासानंतर,गॅस स्टोव्ह चालू करा.
4.त्यावर फ्राईंग पॅन ठेवा, पॅनमधे एक चमचा तेल टाका
5.तेल गरम झाले की एक चमचा आले-लसूण पेस्ट टाका.
6.आले-लसूण पेस्ट छान परतून घ्या.
7.आता मॅरीनेट केलेले चिकन पॅनमधे टाका, फूल गॅस करून दोन मिनिटे चिकन परतून घ्या असं केल्याने चिकन ज्युसेस चिकनमधेच लॉक होतात.
8.दोन मिनटानंतर गॅस सिम करा, आणि चिकन झाकून निवांत शिजू द्या पाणी आटेपर्यंत.
9.मधे मधे बघा पाणी आटले का ते.
10.चिकनमधले पूर्ण पाणी आटल्यावर, मीठ आणि मिरची पावडर टाकून 10 मिनिटे परतून घ्या.
11.गॅस बंद करा. वरून एक लिंबू पिळून टाका.कोथिंबीर टाकून सजवा.
लेमन चिकन फ्राय तयार.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

स्टेप 10 मध्ये variation
- चिकनमधले पूर्ण पाणी आटल्यावर, मीठ आणि मिरची
पावडर, एक चमचा मीरे पावडर टाकून 10 मिनिटे परतून घ्या.
पेप्पर चिकन फ्राय तयार.
-चिकनमधले पूर्ण पाणी आटल्यावर, मीठ आणि मिरची
पावडर, पुदिन्याची पाने कापून टाका,10 मिनिटे परतून
मिन्ट चिकन फ्राय तयार.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच नानबा, वेळ पण कमी लागला असेल ना?
फोटो टाकायचा होता ना..
मी पण करून बघेन पनीर आणि भाज्या वापरून.
धन्यवाद.

धन्यवाद webmaster
लेखन 'पाककृती' मध्ये हलवल्याबद्दल.

थँक्स अमा..
हे चिकन 65 नाहीये, मला माहिती नाही ते कसं बनवतात.. रेडिमेड मसाला मिळतो माहित आहे पण कधी बनवलं नाहिए..

<<>घोंगुरा == आंबटचुका का?>>>

घोंगुरा == आंबाडी
हैदराबाद कडे याचे लोणचे पण करतात. अतिशय स्वादिष्ट लागते.

धन्यवाद निरू, सी, आदिती, धनवन्ति !

असं म्हणतेस सी, विचार करते मग Happy

@आदिती, ड्राय होत नाही.. दह्यामुळे ओलसर राहते.

एप्रिल फूलला मी खरंच फसले होते त्या चॅनल लिंकला..... बाकी कुणा थोर व्यक्तीने म्हणले आहे Wink - "पण ते च तर माणसाची शोकांतिका आहे,ज्या गोष्टी सतत स्मरणात ठेवायला हव्यात त्या गोष्टी मानव विसरून जातो आणि ज्या खरोखरीच विसरून जायला हव्यात त्यांच्या वरच मनातल्या मनात मंथन करीत बसतै.." Lol

Pages