आमच्या टेरेस गार्डन मधल्या भाज्या

Submitted by नादिशा on 16 September, 2020 - 00:02
घरच्या भाज्या

आम्हाला दोघांना फुलांची जास्त आवड. त्यामुळे आजवर वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे च लावली.. यशस्वीरीत्या वाढवली. 250 कुंड्या झाल्या होत्या. यावर्षी जी double होती, ती काढून भाज्यांचा प्रयोग करायचे ठरवले.
आजवर एक - दोन भाज्या लावल्या होत्या, जमतेय असा विश्वास वाटला. त्यामुळे यंदा जास्त लावल्या, त्यांचेच हे फोटो.

भेंडी.. स्वयमची आवडती भाजी आहे, त्यामुळे तो जाम खुश आहे भेंड्या पाहून.

IMG-20200916-WA0004.jpg

दोडका.

IMG-20200916-WA0005.jpg

चवळी.. यांच्या मनसोक्त ओल्या शेंगा खाल्ल्या स्वयम ने.

IMG-20200814-WA0007.jpg

गवारी.. बुंध्याकडे छोट्याशा लागल्या आहेत.

IMG-20200916-WA0006_0.jpg

वांगे.. एक लागले आहे.

IMG-20200916-WA0009.jpg

कढीपत्ता

IMG-20200916-WA0007.jpg

गवती चहा

IMG-20200916-WA0008.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच . मी पण या लोकडाऊनमध्ये पहिल्यांदाच भाज्या लावल्यात. आत्ता दोडके 3 आलेत, अजून छोटे आहेत. घेवडा ,वांगी, दुधी भोपळे ( आत्तापर्यंत 3 मोठे दिलेत , अजून 2 लागलेत ) भेंडी , आता कांद्याची पात पण यायला सुरुवात झालीय. मेथी विशेष आली नाही. कोथिंबीर पण थोडीच आली. पुदिना, गवती चहा जोरात आलाय. साधना यांचा शहरी शेती म्हणून लेख आहे माबोवरच , मला लिंक देता येत नाही. तो लेख खूप छान आहे. या वेळी लाल भोपळा पण लावला होता आणलेल्या भोपळ्याच्या बिया पेरून , एकच वेल ठेवला , त्याला पण एक गोल भोपळा यायला सुरुवात झालीय. लोकडाऊनमध्ये डाऊन व्हायला झालेलं म्हणून हे सुरू केलं आणि खूप छान वाटलं .
त्या तुमच्या फोटोत पांढऱ्या - काळ्या पिशव्या आहेत ना त्या नुकत्याच मी ऑर्डर केल्यात. कुंड्यांपेक्षा ते बरं पडेल वाटतेय.

Va मस्तच की.
वर्णिता खूप छान केलेस.वेळ मस्त जातो.एवढ्या कुंडीत भाजी आली का? ग्रेट.

त्या तुमच्या फोटोत पांढऱ्या - काळ्या पिशव्या आहेत ना त्या नुकत्याच मी ऑर्डर केल्या >>>> कुठे ऑर्डर केल्या ते कळवाल का ?

त्या पिशव्यांना grow bags म्हणतात..ज्या खास झाडें लावण्यासाठी बनवलेल्या असतात. त्यांना आतल्या side ने black colour चे जे coating असते, त्यामुळे त्याच्यावर sunlight चा परिणाम होत नाही.
आम्ही मातीच्या कुंड्या वापरल्या पूर्वी, पण त्या खूप जड होतात टेरेस ला, उचलायला.
प्लास्टिक कुंड्या आणल्या, त्या छान हलक्या वाटत होत्या. मग भंगार च्या दुकानातून प्लास्टिक cans आणून, छान washing powder ने धुवून, वरची बाजू cut करून वापरले. त्याच्या बाहेरील side वर छान painting केले होते. खूप सुंदर दिसायचे सगळे एकसारखे. पण उन्हाळ्यात प्लास्टिक कुंड्या, कॅन तडकले. मग ते change करावे लागत.
मग या grow bags बद्दल समजले. शक्य तेवढा अभ्यास केला. मग त्या घेतल्या. Online मागवाव्या लागतात. Amazon वरून आम्ही मागवतो. वेगवेगळ्या sizes मध्ये मिळतात.. पालेभाज्यांची आडव्या, आयताकृती, फळभाज्यांसाठी मोठ्या, असे बरेच प्रकार आहेत त्यांचे.
त्या कलर्स मध्ये, designs मध्येही मिळतात. पण उन्हाने ते कलर्स, डिझाइन्स विटून जातात. त्यामुळे आम्ही white च मागवतो. कुंड्यांपेक्षा स्वस्त आणि टिकाऊ आहेत grow bags, आम्ही 3वर्षांपासून वापरतो आहोत. एकही grow बॅग अजून खराब नाही झाली. फक्त एकच तोटा आहे त्यांचा, त्या एका जागेवरून दुसरीकडे हलवता येत नाहीत किंवा हलवल्या, तरी झाडांची मुळे हलू शकतात.

थँक्स कविन, वर्णिता, srd, अन्जु, देवकी, गार्गी.
वर्णिता, छान वाटले तुमच्या भाज्यांबद्दल वाचून. वांगे, टोमॅटो, मिरची यांचे एकेक जरी झाड आले ना तरी एका family ची गरज आरामात भागते. दोडका, दुधी, कारले, भोपळा, काकडी, घोसाळे (गिलके )टेरेस गार्डन वर छान येऊ शकतात grow bags मध्ये.. आमच्या आल्या आहेत.
पालक, चाकवत, मेथी, कोथिंबीर, माठ, लिंबू यांसाठी आम्ही फळांचे कॅरेट्स वापरतो. अळू जुन्या मडक्यात लावले आहे. कॅन मध्ये बीट, गाजर, मुळा, कांदा, लसूण, हळद, आले लावले होते. पण आपले कष्ट आणि मिळणारे उत्पन्न यांचे प्रमाण व्यस्त होते. त्यामुळे यावर्षी नाही लावले.

वाव्ह. छान घरच्या घरी भाजीचा मळा. कधीकधी भाजी तोडणे जीवावर येते. पहायलाच बरे वाटते. झाडावरच छान दिसतात. पक्षांची सुद्धा आयतीच खायची सोय होते.

हो , देवकी, वेळ खरच मस्त जातो आणि नवीन फूल , फळ धरलं की ते मोठं होईपर्यंत रोज बघताना ही फ्रेश वाटतं. खरं तर आधी बरीच जागा होती. पण शेजारी मोकळे प्लॉटस बरेच आहेत , तिथे रान माजलय. मग पावसाळ्यात बिळात पाणी जातंय म्हणून आणि उन्हाळ्यात जमीन तापते म्हणून जनावरं निघतात आणि कम्पाउंड वरून आत येतात म्हणून सगळी फरशी घालून घेतली, कडेला थोडी आळी शिल्लक ठेवली , तिथे दुधी वगैरे लावला. बाकी कुंडीत. भाज्या येतात पण खूप स्लो येतात आणि वांगी ,वगैरे एका वेळी 2 , भेंड्या 7 ( 3 रोपांच्या मिळून ) अशा येतात. मग त्या मीठ लावून खातो नुसत्याच Lol : .
गार्गी , मी लोकल सांगलीतून लोकल नर्सरीतून मागवल्यात.

कडेला थोडी आळी शिल्लक ठेवली , तिथे दुधी वगैरे लावला. बाकी कुंडीत. >>>>> हे वाचल्यावर कळलंच.नाही तर रिनच्या अ‍ॅडसारखे वाटले.भला उसकी कुंडीमें मेरे कुंडीसे अधिक सब्जी क्यूं...

या पिशव्यांना grow bags म्हणतात......>>>>>> थँक्स नादिशा
अजुन एक प्रश्न ---- या grow bags मि ग्रिल मध्ये ठेवल्या तर चालतिल का?

वर्णिता, मस्त.
गार्गी, ठेवू शकता तुम्ही grill मध्येही. तुम्ही search करा amazon वर, तुम्हाला हव्या त्या sizes मध्ये मिळतील grow bags.

खुप छान, मस्त आहे गार्डन तुमचं, कढीपत्ता किती छान वाढला आहे. माझा सुकून चाललाय.

आपल्या घरच्या भाज्या बघून होणारा आनंद अवर्णनीय आहे.

मी पण बरेच शेतीचे प्रयोग केले यावर्षी गच्चीवरती #UrbanFarming
वांगी, मिरची, मेथी, कोथिंबीर, शेपू, कारलं, पुदिना एवढं तरी आहे भाज्यांमध्ये आत्ता.

मेथी आणि कोथिंबीर भरभरून मिळाली. खूप वेळा लावली. संक्रांतीचे सुगड्या असतात त्याला कलर करून त्यात पण लावलेली वेगवेगळ्या बॅचेस मधे, म्हणजे कधी कोथिम्बीरी वाचून अडायला नको Lol
मागच्या महिन्यात कोबीच्या बिया टाकल्या होत्या तर आत्ता छान रोपं झालीयेत आत्ता (2 आलीयेत खरं तर )

खूप सारे प्रयोग फसले पण. पालक लावला होता , कधी काढायचा हे ठरवेपर्यंत फुलं आली त्याला Lol

अक्षता म्हणून id आहे मायबोली वर त्यांचा लेख वाचून लेट्युस चे बी लावले, पण आलेच नाहीत. मे बी बियाणांचा काही ISSUE असेल Sad

ब्रोकोली पण try केलं, पण तेही फसलंच..... अजून दोन तीनदा फसले प्रयोग.

पण खरं तर या सगळ्यात वेळ फार छान गेला माझा.सकाळी लवकर उठायला एक खूप छान कारण मिळालं. नाही तर वर्क फ्रॉम होम चे पहिले काही दिवस सकाळी उठून डायरेक्ट scrum जॉईन करायचे Lol

(सॉरी, प्रतिसाद खूप मोठा झाला, पण या विषयावर मी कितीही बोलू शकते )

https://www.maayboli.com/node/52986

साधना यांचा शहरी शेती म्हणून लेख आहे माबोवरच>> हो मी पण वाचलं ते, वरती लिंक आहे. त्यांचं वाचून शेवगा लावावासा वाटतोय.

मस्त गार्डन आहे तुमचं..
मीही 100 कुंड्यांमध्ये फुलवली आहे बाग, टेरेसवर..
वांगी,मिरच्या,टोमॅटो,लिंबू तर 12 महिने येत असतात.. औषधी झाडं तर आहेतच..
बागकाम करण्याचा खूप उपयोग होतो,स्वयंपाकात आणि मन फ्रेश ठेवायला..

पुरेसे ऊन मिळाले तर शेवगा मस्त होतो कुंडीत. माझ्या शेवग्याने भरपूर शेंगा दिल्या. मी त्याची पाने कोथिंबीरिसरखी वापरते जेवणात. शेवगा खूपच चांगला आहे आरोग्यासाठी. सगळ्यांनी लावाच असे मी म्हणेन.

लेखातील भाजीपाला बघून जीव सुखावला पण इतर सगळ्यांचे फोटो बघूनही छान वाटले.

साधना, तुमचा शहरी शेती हा लेख मी पूर्वी वाचला होता. तेव्हा वाचनमात्र होते. शेवगा कुंडीत ही येऊ शकेल का याबद्दल जरा साशंक होते. मलाही खूप आवडतो. आता लावून बघेन.
तेजो , लतांकुर >> वा ! छान फुलवलाय की भाजी मळा. फोटो टाका न जमलं तर. : )

गार्गी >> माझ्या एका मैत्रिणीने या पत्यावरून मागवल्यात. क्वालिटी सेम आहे आणि किंमत पण 30 रु , 15 रु पर बॅग अशा आहेत. मलाच जरा महाग मिळाल्या. मी जाहिरात करत नाहीये. चुकीचे असेल तर काढून टाकते.
20200917_194530_compress43.jpg

पुरेसे ऊन मिळाले तर शेवगा मस्त होतो कुंडीत >> जमल्यास कुंडीचा फोटो मिळेल का साधना?

मी पण करते काही फोटो शेअर थोडया वेळात Happy

लतांकुर, मी आता गावी आहे त्यामुळे फोटो देता येणार नाही. तरी बघते, जुना असेल काढलेला तर शोधते.

5-10 लिटर रंगाचा डब्बा असतो ना, तो वापरला मी कुंडी म्हणून. त्याला खाली चाळणीसारखी भोके केली व बाजूनेही भोके केली.

हा 2016 चा फोटो आहे. डब्बा दिसतोय अर्धवट. साधारण 2 फूट उंच असेल. आताही तोच डब्बा आहे, पण शेवग्याचा आता गगनावरी वेलू गेला...

Screenshot_20200918-073859~2.png

हे हल्लीचे फोटो आहेत. भरभर वाढून वर छताच्या बाहेर गेला. पण पानगळीच्या दिवसात तो वरून सुकायला लागल्यासारखे वाटले म्हणून मी वरून 3 फूट कापला. याला खूप लांब शेंगा येतात, अंगठ्याइतक्या जाड होईतो कोवळ्या राहतात. चवीला गोड असतात. हा जातीचा फरक असावा. मी अंधेरीला भरलेल्या एका प्रदर्शनातून घेतला होता, तिने तेव्हा काहीतरी नाव सांगितले होते जे आता लक्षात नाही.

Screenshot_20200918-074902~2.png

अजून एक फोटो. लॉकडाऊनमध्ये मला बऱ्यापैकी शेंगा मिळाल्या.

Screenshot_20200918-080353.png

मस्त मस्त फोटो आहेत सगळ्यांच्या फळझाडांचे.
घरी पिकवलेल्या भाज्यांची चव पण छानच असेल ना..
मी स्वतः कधी लावली नाहीएत पण माझ्या भावाला आवड आहे, त्यानेही त्यांच्या टेरेस मधे कोथिंबीर, पुदिना, कडीपत्ता, मिरच्या लावल्या आहेत.

टेरेसमध्ये काही भाज्या सहज येतात, टोमॅटो मिरची वांगी यांना काहीही मेहनत लागत नाही. पण यामुळे मुलांची निसर्गाशी ओळख होते, आपण रोज थोडा वेळ घालवतो, मुलेही सोबत असतात. झाडाला लागलेली फळे बघून त्यांना गम्मत वाटते, तेही काळजी घेऊ लागतात.

नुसते तोंडाने झाडे वाचवा-झाडे जगवा बोलून काही उपयोग नाही. आपल्या पुढच्या पिढीला निसर्गाचे महत्व आपण जाणवू दिले तरच यापुढे होणारी हानी वाचेल. आणि हे महत्व त्यांना तेव्हाच कळणार जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर निसर्ग फुलणार. अगदी लहानपणापासून घरात हा निसर्ग आपण त्यांना दाखवू शकतो. झाडाला फळ धरते व आपल्या डोळ्यासमोर मोठे झालेले फळ आपल्याला अजून गोड लागते हे मुलांच्या लक्षात येते व त्यामुळे मुले निसर्गाच्या प्रेमात पडतात. त्यांनी वाढवलेली रोपे तोडायला मुले तयार होत नाहीत. उद्या बाहेरच्या झाडांबद्दलही प्रेम वाटू लागणार.

घरात एखादी तरी कुंडी ठेऊन त्यात एक रोप लावा व मुलांच्या ताब्यात द्या. डोळ्यासमोर रोप मोठे होतानाचा आनंद त्यांना घेऊ द्या.

Pages