माझ्या लेखी

Submitted by अविनाश राजे on 15 September, 2020 - 21:56

माझ्या लेखी तर त्याला आता देवत्व लाभले आहे
त्याने बोलावे अन मी ऐकावे असे चालले आहे

कोठेही मजला हसतांना, कधी बुद्ध आढळला नाही
कोण जाणे, जगणे बरे कि येथे मरणे चांगले आहे

मानले शेवटी त्यांनी कि जीव माझाही जीवच आहे
वाटते मला कि एकदाचे माझे दैव जागले आहे

माणसांच्या या वस्त्यांवरती राज्य क्षुधेचे-तृष्णेचे
हे जीवन येथे बहुतांशी दुष्टपणे वागले आहे

ती भाळली स्वप्नांवर माझ्या, वरेलही निश्चित मजला
घर असणार आमचे तेथे, धरेला नभ लागले आहे

Group content visibility: 
Use group defaults