सावर

Submitted by shuma on 8 May, 2009 - 04:20

मोरपंखी घन कसा
उफाळत फुटू पाही
पसरुनी पंख मोर
त्याला उतराई होई
फिसकटे उन्हा कसा
सरींसह धावू पाही
हिरवळी वर दूर
पसरत निळी शाई
रेंगाळते एक छटा
उगा चुकार सोनेरी
मिसळते निळाईत
अबोलीशी पाठमोरी
चोरुनीया लालसर
ओलावल्या मेघकडा
आवरुन घेत जातो
सूर्य आपुला पसारा

शमा

गुलमोहर: 

सुंदर कविता!
======================================
पाचूच्या रानात झिम्मड पाऊस उनाड अल्लड वारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा

शमा सुरेख कविता....!अगदी एका क्षणात पुर्ण दिवसाचे flash back झाल्यासाखे....

निवड समितिचे व सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!

Pages