लोकरीचे रुमाल

Submitted by नादिशा on 13 September, 2020 - 07:19
मी बनवलेले लोकरीचे रुमाल

मला लोकरीचे विणकाम करायला खूप आवडते. फारसा मोकळा वेळ मिळत नाही. त्यामुळे छोटे छोटे items बनवते.

वरच्या रुमालाच्या डिझाईन मध्ये थोडासा बदल करून वेगळा रुमाल बनवला.

IMG-20160706-WA0007.jpg

हेच डिझाईन, फक्त वेगळे कलर कॉम्बिनेशन वापरून

IMG-20180920-WA0001.jpg

एक चौकोनी आकारात बनवला.
IMG_20180929_205809.jpg

एक नाजूक डिझाईन

IMG-20160706-WA0009.jpg

हा अजून एक रुमाल

IMG_20181003_153235.jpg

अजून एक variety

IMG_20180827_135032.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान बनवलेत रुमाल.

तो गुलाबाच्या फुलवाला रुमाल कोणे एके काळी खूप हिट आयटेम होता. आजूबाजूच्या सगळ्या आयाबाया विणत आणि सणासुदीला ताटांवर आच्छादन म्हणून वापरत. आमच्या मतोश्रींनीही दोन तीन विणले होते. शहरांतून आता हे सगळे लुप्त झाले असावे किंवा माझ्या संपर्कातील कोणी वापरत नसावेत. यंदा गणपती गावी साजरा करताना हे रुमाल घरोघरी परत दिसले.

थँक्स anu आणि shitalkrishna.
अहो, मला खूप आवडते विणकाम करायला, नवनवीन designs try करायला. व्यसन आहे, म्हणण्या इतपत आवडते. मग आपल्याच घरात बनवून किती ठेवणार ना ! त्यामुळे पूर्वी घ्यायचे मी ऑर्डर्स. पण खूप विणकाम केले, अगदी वेड्यासारखे विणले, त्यामुळे उजवा खांदा दुखायला लागला. तो आता मित्र च बनलाय जणू. विणकाम केले, की बेटा हजर च असतो. त्यामुळे आता खूप restrictions आल्यात विणकामावर.

नादिशा, खूप छान झाले आहेत रुमाल. फ्री पॅटर्न असेल तर त्याची लिंक देऊ शकाल का? मी पण बरंच क्रोशेचं विणकाम करते.

थँक्स कविता आणि शुगोल.
माझी opd MIDC विभागात आहे. इथे UP, MP, बिहार अशा बऱ्याच भागातून आलेले आहेत लोक. त्यांच्या लेडीज खूप छान विणकाम करतात. MP मध्ये तर प्रत्येक मुलीला विणकाम यावेच लागते. लग्नसमारंभ किंवा कोणताही कार्यक्रम असेल, तरी नवीन कपड्यांबरोबर ते प्रत्येकाला स्वेटर्स विणतात, अशी रंजक माहिती मला मिळाली. एकेका बाईने किमान 50तरी स्वेटर्स विणलेले असतात तिच्या आयुष्यात. मात्र त्यांना 2 सुयांवर विणता येते, जे मला येत नाही. मला पटकन विणून होणारे क्रोशाचे विणकाम आवडते. यांच्या अंगावरचे स्वेटर्स, खांद्यावरच्या शाली, पर्सेस पाहून मी फोटो काढून ठेवायचे आणि मग स्वतःचे डोके चालवून ते डिझाइन्स क्रोशात बसवायचे, असे सगळे विणकाम केले आहे मी.
त्यामुळे सॉरी शुगोल, मला कोणत्याही लिंक्स माहिती नाहीत, त्यामुळे इच्छा असूनही मी देऊ नाही शकणार.

मस्त.
आजही, वाण झाकायला आई आवडीने , तिनेच स्वतः विणलेले असे गुलाबवाले रुमाल घालते.
आई , कॉलेजात असताना खुपच फॅशन होती, मुलींमध्ये असे रुमाल विणायची.
माझी मुंबईला रहाणारी एक आत्या, तर इतकी पारंगत की, नोकरी वीटीला करायची तेव्हा, ट्रेन घ्यायची वीटीला, तर दादरला येइपर्यंत , रुमाल अर्धाअधिक व्हायचा. गोष्ट, १९६० वगैरेची आहे. ती, तर नॉयलाईनची रंगीत धाग्यापासून, पर्सेस सुद्धा बनवायाची ते आठवले. इतक्या डिजाईन्स सुंदर..
क्रोशाने करतात ना , नॉयलॉन पर्सेस ह्या लिंकमध्ये आहेत तश्या,
https://i.pinimg.com/474x/7a/d7/a8/7ad7a84d22f327bc18daf6ef2c803e6c--cro...

https://youtu.be/QyAgZaO6sb4

माझी लहानपणीची आठवण आणि आत्याची आठवण म्हणून त्यस पर्सेस जपल्या आहेत.

थँक्स अन्जु, sonalisl, प्राचीन आणि झम्पी. अहो, मी पण तोरण, पर्स, स्वेटर, गणपती, बाहुल्या असे सगळे प्रकार विणले आहेत. खूप आनंद मिळतो अशी नवनवीन निर्मिती करायला. सवडीने जूने फोटो शोधून अपलोड करेन.

मी बनवलेल्या लोकरीच्या रुमालांचे अजून काही फोटो सापडले. ते अपलोड करते आहे.

IMG_20170131_201656.jpg

हा डेलिया च्या फुलासारखा दिसतो.

IMG_20171219_120550.jpg

हा पारंपरिक षट्कोनी आकाराचा.

IMG-20170218-WA0013.jpg

हा तसाच, पण वेगळी रंगसंगती वापरून.

IMG_20171219_120618.jpg

हा पारंपरिक वर्तुळाकार रुमाल.

IMG-20181002-WA0027.jpg

हा माझ्या एका स्टुडन्ट ने बनवलेला रुमाल.

IMG-20181026-WA0018.jpg

हा माझ्या छोट्या बहिणीने बनवलेला रुमाल.

IMG-20181026-WA0017.jpg