मी मा.बो. करांच्या इच्छेनुसार मांडणीत बदल केला आहे.
वयाबरोबर पाठीने घेतला बाक आहे
प्रकृतीत आजारांना लाडाचा थाट आहे
पोटभरतीस औषधांचा आहार मुख्य आहे
चिंतलेल्या मनास धार्मिकतेचा आधार आहे.
जेष्ठ नागरीकत्वाची समाजात ठिगळ आहे
देणगी रुपातली चबुतर्यावर नावाची ओळ आहे
पुतळ्यालाही सढळ हस्ते दिल्यास वाव आहे.
सौभाग्यवती मृत होऊन भाग्यवान आहे
भोगयातना साहण्यास उरले जीवनमान आहे
मनोरंजनी नातवंडं शिल्लक समाधान आहे.
मुला-मुलींचा आपआपला संसार स्वतंत्र आहे.
इस्टेटीच्या वाट्यात मन मात्र एकत्र आहे.
मृत्युपत्र, सजीव होण्याच्या प्रतिक्षेत आहे
तुटपुंज्या पेन्शनमुळे थोडा मान स्थित आहे.
माझा अनुभव, त्यांच्या वर्तमान चालीत वाद आहे
कितीही झाले वाद तरी माघार मात्र माझीच आहे
कारण चार खांद्यांसाठी मला त्यांचाच आधार आहे
ही माझी जुनी मांडणी आहे.
नविन मांडणीसाठी मला काही मा.बो.करांचे सल्ले मिळाले त्याबद्दल धन्यवाद.
वयाबरोबर पाठीनेही बाक घेतला आहे
प्रकृतीने आजारांनाही लाडावले आहे
आहारा पेक्षा औषधच पोट भरत आहे
धार्मिक क्षेत्रात मन आता विसावत आहे
जेष्ठ नागरीक म्हणून समाजात ठिगळ आहे
देणगी देऊन चबुतर्यावर नाव कोरल आहे
सढळ हस्ते दिल्यास पुतळ्यालाही वाव आहे
सौभाग्यवती मृत होऊन भाग्यवान ठरली आहे
दु:खाचे भोग मी घडलेल्या पापांबरोबर भोगत आहे
नातवंड खेळवण्यात मनोरंजन उरले आहे
मुला-मुलींनी आपाअपले स्वतंत्र संसार थाटले आहेत
इस्टेटीच्या वाट्यात मात्र सगळ्यांचे मन एकत्र आहे
मृत्युपत्र, सजीव होण्याच्या प्रतिक्षेत आहे
तुटपुंज्या पेन्शनमुळे थोडा मान उरला आहे
माझा अनुभव, त्यांच्या वर्तमान चालीत वाद आहे
कितीही झाले वाद तरी माघार मात्र माझीच आहे
कारण चार खांद्यांसाठी मला त्यांचाच आधार आहे
मस्तच
मस्तच जागु! एकदम भिडली!
जागु,
जागु, माझ्या मनात भीति निर्माण केलीत तुम्ही. कविता चांगली आहे, पण दुवा करा की हे माझं मनोगत होऊ नये.
-मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com
एकदम
एकदम खास...मला वाटते हे आजचं वास्तव बनलयं. अगदी छान मांडलयं. तुमच्या कविता खरच अर्थपुर्ण असतात.............
--------------------------------------
प्रा.सतिश चौधरी
काव्यातुन ...हे जिवन फुले....
माझ्या कविता...इथे बघा..
http://www.destiny-kavyanjali.blogspot.com
----------------------------------->>
छान
छान
____________________________________________
मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/
डबल
डबल झाल्याने प्रतिक्रिया संपादित केली आहे.
____________________________________________
मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/
जागु छान
जागु छान आहे कविता. हल्लीच्या जीवनाचे वास्तव आहे हे.
*******************************************
बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते,व्याकुळ होते,तीळ तीळ तुटते,खोल कुठे गलबलते
विषय
विषय चान्गला, कवितेची माण्डणी अजुन लक्षवेधक करता आली अस्ती!
कितीही
कितीही झाले वाद तरी माघार मात्र माझीच आहे
कारण चार खांद्यांसाठी मला त्यांचाच आधार आहे...... या ओळी वास्तवतेच्या प्रखरतेने मनाला भिडतात..... रक्ताच्या नात्यामध्ये राग हा कधीतरी शांत होतोच...... हेही एक वास्तव आहे..... छान आहे कविता..... अजून खूप छान करता आली असती.......
सौ. धर्माधिकारी
<<तुटपुंज्य
<<तुटपुंज्या पेन्शनमुळे थोडा मान उरला आहे.
माझा अनुभव, त्यांच्या वर्तमान चालीत वाद आहे
कितीही झाले वाद तरी माघार मात्र माझीच आहे>>
हे माझेच वर्णन आहे. म्हणूनच मला आपली वानप्रस्थाश्रमाची कल्पना फार आवडते. पण जर मन अजून संसारातच असेल, मुला, नातवंडात, इस्टेटीत, चबुतर्यावरील नाव, पुतळा इ. त असेल तर कुठेहि गेलात तरी या गोष्टींचा क्लेश होणारच. कुठेहि न जाता जर यातून मन काढून घेता आले तरच खरा वानप्रस्थाश्रम.
अहो झक्की,
अहो झक्की, आणि समजा मन नाहीच काढून घेता आले, तर पुणेकर नि त्यान्च्या सवई, पुण्यातील रस्ते/दुर्गन्धी/खड्डे इत्यादी अनेक बाबीत लक्ष गुन्तवून बेधडक भाष्य करावे, असेच ना??????

म्हातारपण
म्हातारपणातील वास्तव दर्शन घडवलंस मित्रा
कुणाच्याहि नशीबात वास्तव मात्र घडुनये हिच इच्छा ...
लिंबू,
लिंबू, तिथेहि माघार घ्यावी लागते. लोक फट्टू म्हणतात.

व्वा
व्वा जागू..खुप छान लिहायला लागलीस तू..मस्त कविता..
*******************
सुमेधा पुनकर
*******************
मृत्युपत्
मृत्युपत्र, सजीव होण्याच्या प्रतिक्षेत आहे
तुटपुंज्या पेन्शनमुळे थोडा मान उरला आहे.
माझा अनुभव, त्यांच्या वर्तमान चालीत वाद आहे
कितीही झाले वाद तरी माघार मात्र माझीच आहे
कारण चार खांद्यांसाठी मला त्यांचाच आधार आहे
vaastavavaadi.
.सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..
शुमा,
शुमा, कर्णिकजी, सतिश्,विशाल, नुतन, लिंबु, कल्पना, झक्की, बाळू, सुमेधा, अलका तुमचे खुप खुप धन्यवाद. यापुढे अजुन लक्षवेधक करण्याचा प्रयत्न नक्की करेन. धन्यवाद.
बापरे!
बापरे! वास्तवाची आठवण करून दिलीत. छान मांडल आहे.
जागू, मी
जागू, मी काहीशी अशी शब्दरचना योजली अस्ती!
(अन ती चान्गलीच आहे असा माझा नाहि, केवळ एक प्रयोग)
(अशा प्रकारे कविला काही एक सुचवावे की नाही यावर मतभेद होऊ शकतील! तरीही..... सुचवावेसे वाटले, कविता आवडली म्हणून अजुन प्रयोग करुन बघावा वाटला, त्यामुळे ही पोस्ट)
वयाबरोबर पाठीनेही, बाक घेतला आहे
आजारांनीही आता, ठाण मान्डले आहे
आहारा पेक्षा औषधच, पोट भरत आहे
आताशीक कोठे, देवधर्म आठवत आहे
जेष्ठ म्हणवून समाजात, दूर्लक्षितच आहे
देणगी देऊन, चबुतर्यावरमात्र नाव आहे
हात ढिल्ला सोडला, तर पुतळ्यासही वाव आहे
कावळेचिमण्यान्ची, अजुन एक सोय आहे
ही गेली केव्हाच, भाग्यवान आहे
पाप तेवढे भोगायला, मी उरलो आहे
नातवंडे सम्भाळतो, पाळणाघराचे काम आहे
पोटचे गोळे मात्र, वेगळ्याच विश्वात रमले आहेत
पेन्शनमुळे थोडा तरी, मान उरला आहे
माझा अनुभव त्यांच्यासाठी, कालबाह्य ठरला आहे
इस्टेटीच्या वाटणीत, सगळ्यांचेच एकमत आहे
मृत्युपत्र? सजीव होण्याच्या प्रतिक्षेत आहे
कितीही झाले वाद, तरी माघार माझीच आहे
चार खांद्यांसाठी मला त्यांचाच आधार आहे
जागु, फार
जागु, फार छान विषय मांडलास. डबल प्रतिक्रिया द्यावी एवढी चांगली आहे.
.............................................................................
किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तुते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते (मर्ढेकर)
जागु, खूप
जागु, खूप छान गं. आता पुढची पायरी म्हणजे मांडणी अधिक सुबक करण्याकडे लक्ष दे.
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
विषय
विषय निराशावादी आहे. म्हणजे चांगला की वाईट, ते माहिती नाही.
मांडणी मुळ कवितेपेक्षा लिंबूच्या कवितेची चांगली वाटली. पण मांडणी चांगली म्हणून कविता चांगली की वाईट ते कळत नाही. कळते तेवढे सांगितले.
--
उत्कट-बित्कट होऊ नये.. भांडू नये-तंडू नये;
असे वाटते आजकाल, नवे काही मांडू नये..!
प्रखर
प्रखर ऊन्हाच्या झळा शब्दातून फेकणं कडक जमलय !
एक गंमत सांगू ? ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला घ्यायला नेमल्या दिवशीं कार्यालयात गेलो. संबंधित
कारकूनाने शिपायाला तारस्वरांत फर्मान सोडले " अरे, ती म्हातार्ड्यांची फाईल आणरे ". दाखला
घेवून मीं त्या महोदयाना म्हटल " घरीं वडिलाना जेवायला कसे बोलवता ? बाबा, जेवायला येता
ना ? किं, म्हातारड्या, चल हापसायला ? आपलं कुतूहल म्हणून सहज विचारलं " ....
.. "ज्येष्ठ नागरिक म्हणून समाजात ठीगळ आहे' !
जागु, कविते
जागु,
कवितेला छान कसं म्हणु?
मांडणी चांगली केली आहेस.
साजिर्या,
साजिर्या, वास्तव मान्डले, म्हणजेच निराशावादी असे नसते! तर वास्तवामुळे, भविष्याबाबत जो कुशन्का घेतो, तो निराशावादी!
मान्डणी चान्गली हवीच, पण आशयही तितकाच महत्वाचा! मान्डणी चान्गली असेल पण आशय अगदीच कुचकामी असेल तर चालणार नाही! कविला जे काय "लोकांस" सान्गायचे आहे, त्याची आशयघनता जर वाचकास भिडणारी असेल, तर ती कविता मान्यता पावते! पण कवितेत विशेष असा आशयच नसेल, केवळ र ला ट अन फ जोडत कविता केलेली असेल, तर माण्डणी कितीही चान्गली असेल, यमक अनुप्रासादिक बाबी असतील तरी वाचकास कविता भावणार नाही!
बाकि मायबोलीवर सद्ध्या चालू असलेल्या चर्चेनिमित्ताने (एप्रिल कविता) अजुन एक लक्षात घे, मी स्वयम्पाक केला, माझ्या आत्मानन्दासाठी, मी तो वाढून घेतला व गिळलो, माझ्या क्षुधाशान्तीसाठी, अन समजा त्यात काही तिखटमीठ वगैरे कमीजास्त पडले तरी, त्यास मीच जबाबदार व भोगणाराही मीच!


)
अगदी तसेच कवी व त्याच्या कवितान्चे अस्ते! जोवर कवि त्याच्या आत्मानन्दासाठि कविता करतो, व कदाचित स्वतःच पुन्हापुन्हा वाचतो, तोवर ती कविता, काय, कशी याची जबाबदारी पूर्णपणे त्याचीच अस्ते!
पण ज्याक्षणी तो त्याची कविता जनान्समोर उघड करतो, त्याक्षणी, तिखटमीठ कमीजास्त झाल्यामुळे, करपल्यामुळे वा कच्चे राहिल्यामुळे स्वयम्पाकास जशी गिळणारा अन्य कोणी, नावे ठेविल, त्याच पद्धतीने कविता जर समजली/उमजली नाही, आशयघनता भिडली नाही, माण्डणी पटली नाही तर वाचक एकतर त्यास बरावाईट प्रतिसाद देईल वा अनुल्लेख करेल! वाचकाच्या नेमक्या या स्वातन्त्र्यावरच सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातय, कदाचित तशी फ्याशन असावी!
शिवाय, एखादे अन्नछत्र असेल, तर माणूस जेवेलही तिथे कदाचित, पण पाचपन्चवीस अन्नछत्रे उघडलेली असल्यावर बकासुराचा अवतार जरी आला, तरी तो सर्व ठि़काणी गिळू शकणार नाही, तद्वतच, पाचपन्नास अन्नछत्रे उघडल्याप्रमाणे कवितान्चा ओघ धो धो असेल, तर वाचक, सगळ्याच कविता वाचायच्या भानगडीत देखिल पडणार नाही! पण बरेच जणांस, हेच अमान्य आहे, कदाचित याचीही फ्याशन असावी!
असो
बरच विषयान्तर केल, माफी असावी!
(मी मात्र आता क्यान्टीनचे गिळून येतो, मी शिव्या घातल्यास, त्या खायची जबाबदारी मात्र त्याची
...;
***** या राष्ट्रास निधर्मी म्हणून घोषित करणे व पुरुषासारख्या पुरुषाने स्वतःस हिजडा म्हणवुन घेऊन तसे वागणे या दोन्हीत अर्थाअर्थी, मला तरि फरक वाटत नाही! ****
लिंबूदादा,
लिंबूदादा, तुझी पोस्ट थोडी कळली. कळली तेवढी चांगली वाटली.
(मला कळते तेवढेच बोलतो. उगाच कशाला फाफटपसारा?)
--
उत्कट-बित्कट होऊ नये.. भांडू नये-तंडू नये;
असे वाटते आजकाल, नवे काही मांडू नये..!
आर्च, उमेश,
आर्च, उमेश, अश्विनी, साजीरा, भाऊ, दक्षीणा, धन्यवाद.
लिंबूदा तुमची मांडणी आवडली.
ह्यापुढे मी मांडणी चांगली करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे मला खुप काही शिकायला मिळत आहे. धन्यवाद.
जागु
जागु वास्तववादी विषय छान मांडलायस
हा विषय
हा विषय निराशावादी नक्कीच नाहिये... कारण मनोगत व्यक्त करणार्या व्यक्तीच्या प्रत्येक वाक्यात 'आहे' असा शब्द आहे... आणी तो फक्त एवढंच सूचित करतोय की वास्तवाचं भान बाळगा... आपल्याला सर्व काही ठाऊक आहे आणी आपण खूप बरोबर वागतो आहोत असं आपल्याला वाटतंच असतं... पण प्रत्यक्षात परीस्थिती 'ह्या कवितेतल्या व्यक्तीसारखी' असते... मला कविता भावली... आवडली सुद्धा !!!
'लिंबूटिंबू'जींनी जे काही वर्णिलंय त्यालाही माझं अनुमोदन आहे ...
जागू,
जागू, खर्या विषयावर कविता आहे. Nothing imaginary. आशय भावला, कारण तो बराचसा खरा आहे.
ह्या वेगाने माझ्या आणि माझ्या मुलीच्या विचारसरणीत किती फरक पडेल आणि माझ्या म्हातारपणी मी किती "कुचकामी, श्रीमंत" ठरेन अशी भीती वाटली.
मला लिंबू आणि तुझ्या कवितेच्या "मधली" मांडणी आवडली असती, पण हे झालं माझं कुंपणावरचे मत!
जागु,
जागु, कविता विचार करायला लावणारी आहे.
................................................................................................................
तुझमे रब्ब दिखता है यारा मै क्या करु, सजदे सर झुकता है यारा मै क्या करु
वार्याची
वार्याची बात !
वार्यावरची नाही !! ---
" हुरहूर लावणारी. "
Pages